दुसरी पंचवार्षिक योजना

अध्यक्ष : पंडित जवाहरलाल नेहरू
उपाध्यक्ष : व्ही.टी. कृष्णम्माचारी
प्रतिमाबंध : डॉ. पी. सी. महालनोबिस (१९२८ च्या रशियातील फेल्डमनच्या प्रतिमानावर आधारित)
कालावधी : १ एप्रिल १९५६ ते ३१ मार्च १९६१
प्राधान्य : अवजड व पायाभूत उद्योग

वैशिष्ट्ये

या योजनेत ४.५ विकासदराचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात ४.२१% पर्यंत विकासदर वाढविण्यात यश आले.

या योजनेचा प्रस्तावित खर्च  ४८०० कोटी रु. इतका होता. मात्र वास्तविक खर्च ४६०० कोटी रु. इतकाच झाला.

समाजवादी समाजारचनेचे ध्येय निश्चित केले व माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू मानण्यात आला.

ही एक महत्त्वाकांक्षी योजना होती. यात सार्वजनिक व खाजगी उद्योग असे विभाजन करण्यात आले होते.

भांडवली वस्तुंची मोठ्या प्रमाणावर आयात करण्यात आली.

असमतोल वृध्दी हा दुस-या योजनेचा डावपेच होता.
औद्योगिक व दळणवळण योजना म्हणून ही योजना ओळखतात.
या योजनेच्या वित्तीय तरतुदीबाबत बी. आर. शेणॉय यांनी टीका केली होती.
अपेक्षित सीमांत भांडवल उत्पादन गुणोत्तर २:१ असे होते. प्रत्यक्षात ४:१ साध्य झाले.
वित्तीय साधन सामुग्रीचे सर्वांत मोठे साधन – तुटीचा अर्थभरणा (९४८ कोटी रु. )

या योजनेत उत्पन्न व संपत्तीची विषमता कमी करणे हे उद्दिष्ट होते.या योजनेत पुढील लोहपोलाद प्रकल्प सुरु केले.

या योजनाकाळात सुएझ कालव्याचा प्रश्न, मोसमी पावसाने दिलेला दगा, परकीय गंगाजळीतघट, तांदूळ उत्पादनात घट इ. समस्या निर्माण झाल्या.

दुसऱ्या योजनेपासून भारतात सतत भाववाढ होत आहे.

योजनेचे परिणाम

दुसरीयोजना अयशस्वी ठरली पण योजनेच्या अखेर भारतीय अर्थव्यस्था उड्डाण अवस्थेतआली होती. उड्डाण अवस्थेचा सिध्दांत प्रा. रोस्ट्रोव्ह यांनी मांडला.

या योजना काळात किंमत निर्देशांक ३०% ने वाढला.
समाजवादी समाजरचनेचे तत्व हे आर्थिक नीतिचे लक्ष्य महणून स्वीकारण्यात आली.महत्वाचे प्रकल्प१९५९ – भिलाई (छत्तीसगड) पोलाद प्रकल्प (रशियाच्या मदतीने)

१९५९ – रुरकेला (ओरिसा) पोलाद प्रकल्प (जर्मनीच्या मदतीने)१९६२ – दुर्गापूर (पश्चिम बंगाल) पोलाद प्रकल्प (ब्रिटनच्या मदतीने)

१९६२ – BHEL (Bharat Heavy Electricals Ltd.)  (भोपाळ)

नानगल (पंजाब) व रुरकेला (ओडिशा) खत कारखाने.

विशेष घटनाक्रम

०१. ३० एप्रिल १९५६ रोजी भारताचे दुसरे औद्योगिक धोरण १९५६ जाहीर.

०२. १ सप्टेंबर १९५६ रोजी LIC (Life Insurance Corporation) ची स्थापना करण्यात आली.

०३. Intensive Agriculture district Programme (1960)

०४. नॅशनल ऑरगॅनिक केमिकल
०५. कुटुंब नियोजनाचे कुटुंब कल्याण असे नामकरण

०६. बलवंत रॉय मेहता आयोगाची स्थापना. 

०७. ३१ ऑगस्ट १९५७ रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची अधिकृत घोषणा

विविध क्षेत्रावर  खर्च

वाहतूक – २८%
उद्योग – २४%
कृषी – २०%
सामाजिक सेवा – १८%
ऊर्जा – १०%