राष्ट्रीय आरोग्य धोरण १९८३
या कृतीदलाच्या शिफारशींवर आधारित  १९८३ चे राष्ट्रीय आरोग्य धोरण जागतिक स्तरावरील सुधारणांना विचारात घेऊन भारताच्या आरोग्य धोरणांना सुधारणा सुचविल्या. राष्ट्रीय आरोग्य धोरण २००० 
उद्देश : सर्वाना आरोग्य सेवा देणे.  व आरोग्यसेवेचे वैश्विकरण करणे. 

इतर उद्दिष्टे

०१. आरोग्य सेवेचे विकेंद्रीकरण करणे.
०२. देशातील पारंपारिक उपचारपद्धतीचा विकास व वापर वाढवणे.
०३. अन्नसुलभता व आरोग्य विषयक ज्ञान देणे.


काही प्रमुख लक्ष्य

०१. पोलिओ उच्चाटन २००५ 
०२. कृष्ठरोग उच्चाटन २००५ 
०३. काला आजार २०१० 
०४. हत्तीपाय उच्चाटन २०१५ 


शासनाचा आरोग्यावरील खर्च २०१० पर्यंत २ % पर्यंत निधी.राष्ट्रीय आरोग्य अभियान
१ मे २०१३ 

उद्दिष्टे
०१. गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देणे.
०२. आरोग्य यंत्रणेतील व सेवेतील त्रुटी दूर करणे.
०३. आरोग्य क्षेत्रातील विकेंद्रीकरण सुकर करणे.
०४. पेयजल स्वच्छता शिक्षण,पोषण यांसाठी प्रयत्न करणे.


या अभियानात प्रजनन,माता,नवजात शिशु,बालक व किशोरवयीन आरोग्य 
RMNCH (Reproductive Maternal Newborn Child Audoscent Health) हा दृष्टिकोन अवलंबला जातो.


या अंतर्गत खालील उपयोजना आहेत.

प्रजनन व बालआरोग्य कार्यक्रम
(Reproductive and Child Health Programme)

पहिला टप्पा : १५ ऑक्टोबर १९९७ 
दुसरा टप्पा : १ एप्रिल २००५ 


हा कार्यक्रम कुटुंबकल्याणाच्या विविध योजना व धोरणांच्या अंमलबजावनीसाठी.
वंदे मातरम 

९ फेब्रुवारी २००४ 
माता मृत्यू दर कमी करताना शासकीय यंत्रणेसोबतच खाजगी आरोग्य यंत्रणेचा सहभाग मिळण्याच्या उद्देशाने.


या मध्ये गर्भवती मातांची तपासणी.


सल्ला व मार्गदर्शन.
जननी सुरक्षा योजना

२००५-२००६ 
प्रमुख उद्देश


संस्थात्मक प्रसूती वाढवणे.

या अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील,अनुसूचित जाती जामातीतील मातांना प्रत्यक्ष आरोग्यसेवा व आर्थिक मदत पुरवली जाते.
प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना २००९-१०

मुख्य उद्देश – आरोग्य सेवेतील प्रादेशिक असमतोल दूर करणे व वैदकीय शिक्षणात गुणात्मक सुधारणा करणे.


या अंतर्गत AIIMS (All India Institute of Medical Sciences) सारख्या संस्था स्थापन करण्यात येत आहेत.
जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम

१ जून २०११ 


गरोदर माता व आजारी असणाऱ्या नवजात (३० दिवसापर्यंतच्या)


अभ्रकांना मोफत आरोग्य सुविधा पुरविणे.


ही योजना आरोग्याच्या निर्देशांकात मागे पडलेल्या २१ राज्यामधील २६४ जिल्ह्यांना विशेष लक्ष्य करण्यात आले.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य

६ फेब्रुवारी २०१३ 
उद्देश : ० ते १८ वर्ष वयोगटातील बालक व विद्यार्थ्यांना एकात्मिक पद्धतीने वर्धित आरोग्य सेवा देणे.


या अंतर्गत

०१. ० ते १८ वर्ष वयोगटाची वैश्विक छाननी करणे.

०२. गरजू बालकांना त्वरित उपचार करून बालमृत्यू टाळणे,आजाराचा पार्दुभाव टाळणे.व अपंगत्व टाळणे.राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम

(National Adolescent Health Programme)
हा कार्यक्रम १० ते २१ वर्ष या वयोगटातील मुलांसाठी.


सुरुवात : ७ जानेवारी २०१४ 


मुख्य तत्व

०१. किशोरवयीन गटाचा सहभाग 
०२. नेतृत्व समानता तसेच या गटाला आरोग्य व चांगल्या राहणीमानाची क्षमता विकसित करणे.


उद्दिष्टे:-

०१. पोषणमान सुधारणे.
०२. मानसिक आरोग्य सुधारणे.
०३. इजा व हिंसा टाळणे.
०४. व्यसनाधीनता दूर करणे.


या कार्यक्रमाला On Population Fund ही संस्था मदत करते.

नवजात बालक कृती आराखडा
(India Newborn Action Plan)


सुरुवात : जून २०१४ WHO ने जाहीर केलेल्या आराखड्यानंतर भारतातही असा आराखडा तयार केला गेला.

बालमृत्यू टाळणे. 
म्हणजे मृत बालक जन्माला येऊ नये यावर विशेष लक्ष.


सहा आधारस्तंभ:-

०१. गर्भारपणातील संगोपन 
०२. प्रसुतीदरम्यान व बालकाच्या जन्मावेळचे संगोपन.
०३. नवजात बालकांचे त्वरित संगोपन.
०४. सशक्त बालकांचे संगोपन.
०५. अशक्त व आजारी बालकांचे संगोपन .
०६. नवजात बालकांच्या टिकावानंतरचे संगोपन.


राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वरील योजनांप्रमाणे काही संस्थात्मक प्रयत्न

०१. प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र उभारणे.
०२. वर्षभर आरोग्य सेवा पुरविणे.
०३. जास्तीचे डॉक्टर्स किंवा नर्स पुरवणे.
०४. ऑपरेशन थिएटर तसेच औषधी पुरवणे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानात ‘आशा’ स्वयंसेविका (ASHA) (Accredited Social Health Activity)
पात्रता :-
२५ ते ४५ वर्ष वय.
गावातील स्त्री असावी
किमान १० वी. उत्तीर्ण.


कार्य:-

०१. वैश्विक लसीकरणास मदत.
०२. संस्थात्मक गोष्टीस प्रोत्साहन.
०३. गर्भारपानाची चाचणी इत्यादी.
०४. स्वच्छताग्रह उभारण्यास प्रोत्साहन.
०५. स्तनदा मातांना मार्गदर्शन.
०६. कुटुंबनियोजनास प्रोत्साहन.
०७. किशोरवयीन मुलींचे समुपदेशन.राष्ट्रीय आयुष मिशन 
सुरुवात : १५ सप्टेंबर २०१४ 

A – Ayurveda 

Y – Yoga and Naturopathy
U – Unani
S – Siddhi
H – Homeopathy

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना 
सुरुवात : २१ जून २०१३ 

उद्देश : दारिद्र्यरेषेखालील तसेच दारिद्र्यरेषेवरील पांढरी शिधापत्रिकाधारक वगळता अधिकाधिक लोकांना उच्च प्रतीची व अत्याधुनिक वैदकीय सेवा उपलब्ध करून देणे.


ही योजना ९७२ प्रकारच्या शस्त्रक्रिया तसेच १२१ प्रकारच्या फेरतपासण्यासाठी १.५ लाख रुपयापर्यंतची मदत.