वीजनिर्मितीत महाराष्ट्राचा देशात सहावा क्रमांक
राज्यात दिवसेंदिवस वीजनिर्मितीत वाढ होत आहे. २०१४-१५ मध्ये राज्यात देशातील सर्वाधिक वीजनिर्मिती झाली.  परंतु दरडोई वीजनिर्मितीत राज्याचा क्रमांक सहावा आहे. 


वीजनिर्मितीत हिमाचल प्रदेश सध्या आघाडीवर आहे. त्याखालोखाल गुजरात, छत्तीसगड, पंजाब आणि हरियानाचा क्रमांक लागतो.

महाराष्ट्रात एकूण वीजनिर्मितीत ‘महानिर्मिती’चा वाटा ४१.९ टक्के असून, त्याखालोखाल अदानी पॉवर कंपनीचा वाटा १७.६ टक्के, नवीकरणीय ऊर्जा ७.६ टक्के, जेएसडब्ल्यू एनर्जी ७.४ टक्के, टाटा पॉवर ७.१ टक्के, रतन इंडिया पॉवर ५.४ टक्के, व्हीआयपी बुटीबोरी व एम्को पॉवर प्रत्येकी ३.५ टक्के आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्‍चर ३.१ टक्के व इतर २.९ टक्के असा होता.राज्यात प्रथमच होणार ‘व्हीव्हीपीएटी’ यंत्राचा वापर
राज्यात पहिल्यांदाच नांदेड महापालिका निवडणुकीत ‘व्होटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल-व्हीव्हीपीएटी’ यंत्र वापरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 

ही यंत्रे खरेदी करण्यासाठी निवडणूक आयोगास अग्रीमही मंजूर केला आहे. या यंत्रामुळे आपण ज्या उमेदवाराला मतदान केले आहे, त्याच्याच खात्यात ते पडले आहे याची खात्री मतदाराला आता होणार आहे. 

नांदेड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक ऑक्‍टोबरमध्ये होत आहे. या निवडणुकीत या यंत्राचा प्रायोगिक तत्त्वावर वापर होणार आहे. त्यासाठी ३५० यंत्रे खरेदी करण्यात येणार असून, त्यासाठी ९२ लाख रुपयांचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला आहे.विवेक गोयंका – प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI) चे नवे चेअरमन
एक्स्प्रेस समूहाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक विवेक गोयंका यांची प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI) चे नवे चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच द हिंदू डेलीचे माजी संपादक एन. रवी यांची PTI चे वाइस-चेअरमन पदावर निवड झाली आहे.

६० वर्षीय गोयंका यांची रियाद मॅथ्यू यांच्याजागी तर ६९ वर्षीय एन. रवी यांची गोएंका यांच्याजागी निवड करण्यात आलेली आहे.

प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI) ही भारतामधील सर्वात मोठी वृत्तसंस्था आहे. याचे नवी दिल्लीत मुख्यालय आहे आणि ५०० पेक्षा जास्त भारतीय वृत्तपत्रांना सहकार्य करते. 

याची स्थापना २७ ऑगस्ट १९४७ रोजी झाली. PTI ने १९४७ साली स्वातंत्र्यानंतर रूटर्स कडून ‘असोसिएटेड प्रेस ऑफ इंडिया’ चा कारभार हाती घेतला.स्वच्छथॉन १.०: भारताचे पहिले-वहिले स्वच्छ भारत हॅकेथॉन
पेयजल व स्वच्छता मंत्रालयाद्वारा पहिल्यांदाच ‘स्वच्छथॉन १.०’ या नावाचे स्वच्छ भारत हॅकेथॉन जन सामूहिक समाधानाच्या माध्यमातून आयोजित केले गेले होते.

मंत्रालयाने ६ आव्हानांवर उपाय शोधण्याकरिता शाळा, कॉलेज, संस्था, स्टार्ट-अप आणि अन्य समूहांकडून अभिनव कल्पना असलेल्यांना आमंत्रित केले होते. निवडक उमेदवारांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

शौचालयांच्या वापरावर निगरानी ठेवणे, मानसिकतेत बदल करणे, दुर्गम क्षेत्रात शौचालय तंत्रज्ञान आणणे, शालेय शौचालयांच्या देखरेखीसाठी कार्यकारी समाधान देणे, मासिक पाळीत निर्माण होणार्‍या कचर्‍याची सुरक्षित विल्हेवाट लावण्याकरिता तांत्रिक समाधान देणे, मलमूत्राच्या जलद विघटनासाठी समाधान देणे, ही ६ आव्हाने मंत्रालयापुढे आहेत.नवाजुद्दीन सिद्दीकीचे आत्मचरित्र – “अॅन ऑर्डिनरी लाइफ: ए मेमॉयर”
भारताच्या बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने आपले आत्मचरित्र लिहिलेले आहे आणि त्या पुस्तकाला “अॅन ऑर्डिनरी लाइफ: ए मेमॉयर” असे शीर्षक दिले आहे.

पेंग्विन इंडियाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे आणि या पुस्तकाचे सह-लेखक ज्येष्ठ पत्रकार रितुपर्णा चटर्जी या आहेत.

उत्तर प्रदेशातल्या मुझफ्फरनगरमधील बुढाना गावात जन्मलेल्या नवाजुद्दीनचा चित्रपटसृष्टीपर्यंतचा प्रवास यात वर्णन केला आहे.सप्टेंबरला जगभरात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा
आज ८ सप्टेंबरला जगभरात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा केला गेला. या ५१ व्या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनी संयुक्त राष्ट्रसंघ शिक्षण, वैज्ञानिक आणि संस्कृतिक संघटना (United Nations Educational, Scientific and Cultural Organization – UNESCO) द्वारा घोषित ‘लिट्रेसी इन ए डिजिटल वर्ल्ड’ या संकल्पनेखाली जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या दिनी सक्रियपणे आंतरराष्ट्रीय समुदायांना एकत्र आणणे आणि व्यक्ती, समुदाय आणि संघटना यांना सक्षम बनवण्यासाठी एक साधन म्हणून साक्षरतेला प्रोत्साहन दिले जाते. शिवाय शिक्षणाचा प्रचार करण्यामध्ये सर्वश्रेष्ठ योगदान देणार्‍यांना साक्षरता पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. 

नवीनतम जनगणना २०११ च्या अहवालानुसार, भारतात निरक्षरता दर २२% आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार, केरळ हे ९३.९१% ने सर्वात जास्त साक्षरता असलेले राज्य ठरले आहे. त्यानंतर ९२.२८ % ने लक्षद्वीप, ९१.५८% ने मिझोराम, ८७.७५% ने त्रिपुरा आणि ८७.४०% ने गोवा साक्षर आहे.

बिहार आणि तेलंगणा मध्ये अनुक्रमे ६३.८२% आणि ६६.५०% याप्रमाणे सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण आढळले आहे.विक्रमी अवकाशयात्री पेगी व्हिटसन पृथ्वीवर परतणार
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात २८८ दिवसांचे विक्रमी वास्तव्य करणारी नासाची महिला अवकाशयात्री पेगी व्हिटसन आता पृथ्वीवर परतण्याच्या तयारीत आहे. या काळात तिने पृथ्वीभोवती ४६२३ प्रदक्षिणा मारल्या आहेत.

उड्डाण अभियंता जॅक फिशर व रशियाच्या रॉसकॉसमॉस अवकाश संस्थेचे कमांडर फ्योदोर युरीशिखिन यांच्यासह ती सोयूझ एमएस ०४ या अवकाश यानाने परत येत असून ते कझाकस्तानमध्ये उतरणार आहे. 

नोव्हेंबर २०१६ पासून ती अवकाशात होती. तिचे हे अवकाशातील तिसरे प्रदीर्घ वास्तव्य होते. 
तिने कारकीर्दीत ६६५ दिवस अवकाश वास्तव्य केले असून कुठल्याही अमेरिकी अवकाशवीरापेक्षा हा काळ अधिक आहे. जागतिक पातळीवर तिचे आठवे स्थान आहे.

युरीशिखिन व फिशर हे एप्रिलमध्ये अवकाश स्थानकात गेले होते. त्यांनी अवकाशात १३६ दिवस पूर्ण केले आहेत. या अवकाश मोहिमेत पेगी व्हिटसन, फिशर व युरीशिखिन यांनी जैवतंत्रज्ञान, भौतिकशास्त्र, पृथ्वी विज्ञानातील अनेक प्रयोग केले आहेत.

युरीशिखिन याचे अवकाशात पाच मोहिमात मिळून ६७३ दिवस वास्तव्य झाले आहे. तो जागतिक क्रमवारीत सातवा आहे.अमेरिकेमधील पाकिस्तानची ‘हबीब बँक’ बंद करण्यात आली
अमेरिकेच्या वित्तीय सेवा विभाग (DFS) या बँकिंग नियामकाने न्यूयॉर्कमधील कार्यालय बंद करण्यास ‘हबीब बँक’ या पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या खाजगी बँकेला आदेश दिले आहेत. 

दहशतवादाला होणारा वित्तीय पुरवठा आणि काळ्यापैश्या संदर्भात संभाव्य समस्यांना हाताळण्यास अयशस्वी ठरल्यानंतर हा आदेश काढण्यात आला. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा एखाद्या बँकेला अमेरिकेत बँक बंद करण्याचे आदेश दिले गेले. शिवाय बँकेला USD २२.५ कोटीचा दंड देखील ठोठावला आहे.

१९७८ सालापासून अमेरिकेत कार्यरत हबीब बँकेने सऊदीमधील अल राझी बँक या खाजगी बँकेसोबत व्यवहार करून कोट्यावधी डॉलर्सची मदत केली आणि याचा अतिरेकी संघटना अल-कायदाशी संबंध होता, असा आरोप करण्यात आलेला आहे.