आरबीआय कडून शंभर रुपयांचे नाणे चलनात येणारदोनशे रुपयांची नवीन नोट आणल्यानंतर आता केंद्र सरकारने शंभर रुपयांचे नाणे चलनात आणण्याचा निर्णय घेतला आहे. 


तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि ‘अण्णाद्रमुक’ पक्षाचे संस्थापक एम.जी रामचंद्रन यांच्या जन्मशताब्दी निमित्त सरकारने शंभर आणि पाच रुपयाचे नवे नाणे आणण्याची घोषणा केली.

यातील शंभर रुपयाच्या नाण्याचे वजन ३५ ग्रॅम तर ५ रुपयाच्या नाण्याचे वजन ५ ग्रॅम असेल. नाण्यात ५० टक्के चांदी, ४० टक्के कॉपर, ५ टक्के निकेल आणि ५ टक्के झिंक या धातूंचा वापर करण्यात येईल.

एम.जी. रामचंद्रन (एमजीआर) यांनी १९७२ मध्ये ‘द्रविड मुन्नेतत्र कळघम’ (द्रमुक) या पक्षातून फुटून अ.भा. अण्णाद्रविड मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) या पक्षाची स्थापना केली होती. 

तसेच एमजीआर यांनी १९७७, १९८० तसेच १९८४ मध्ये मुख्यमंत्रिपद भूषवले होते. १९८९ मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.



गृहमंत्र्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये स्थिरता आणण्यासाठी धोरण जाहीर केले
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी भारत सरकार जम्मू-काश्मीरमध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी तेथील समस्यांचे 5-C तत्वाच्या आधारावर निराकरण करणार असल्याची घोषणा केली.

5-C तत्व म्हणजे भरपाई (Compensation), संवाद (Communication), सहअस्तित्व (Coexistence), आत्मविश्वास (Confidence) आणि स्थिरता (Consistency).

केंद्र सरकारने युद्धविराम उल्लंघनाच्या घटनेदरम्यान मारल्या गेलेल्या लोकांना दिल्या जाणार्‍या मदत निधीत एक लाख रूपयांची वाढ करून ती ५ लाख रूपये केली आहे. तसेच ५०% हून अधिक दिव्यांग प्राप्त झालेल्या व्यक्तींना देखील ५ लाख रूपये दिले जातील.



मार्टिना हिंगिसचे २५वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदमार्टिना हिंगिसने तैवानच्या चॅन युंग-जॅन सह खेळताना अमेरिकन खुल्या टेसिन स्पध्रेतील महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले. स्वित्झर्लंड च्या या ३७ वर्षीय खेळाडूचे कारकीर्दीतील २५ वे ग्रॅण्डस्लॅम जेतेपद आहे. 

हिंगिस व युंग-जॅन यांनी अंतिम फेरीत चेक प्रजासत्ताकच्या ल्युसी हॅराडेका आणि कॅटेरिना सिनिआकोव्हा यांच्यावर ६-३, ६-२ असा सहज विजय मिळवला.

हिंगिसने महिला दुहेरीतील १३, महिला एकेरीत पाच आणि मिश्र दुहेरीत ७ ग्रॅण्डस्लॅम नावावर केले आहेत. 

मार्टिना हिंगिसने १९९७ मध्ये अमेरिकन, ऑस्ट्रेलियन आणि विम्बल्डन स्पध्रेतील एकेरीचे जेतेपद पटकावले होते. त्यानंतर तिने १९९८ आाणि १९९९ मध्ये ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत याची पुनरावृत्ती केली. 

या हंगामातील हिंगिसचे हे तिसरे ग्रॅण्डस्लॅम जेतेपद आहे. तिने विम्बल्डन आणि अमेरिकन खुल्या स्पध्रेतील मिश्र दुहेरीचे जेतेपद नावावर केले आहे. तसेच यंदा सहा डब्लूटीए दुहेरी विजेतेपदही तिच्या नावावर आहेत.



प्रकाश पदुकोण यांना जीवनगौरव पुरस्कार
भारतीय बॅडमिंटन महासंघातर्फे यंदापासून जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार असून त्याचा पहिला मान ऑल इंग्लंड स्पर्धा विजेते पहिले भारतीय खेळाडू प्रकाश पदुकोण यांना मिळाला आहे. 

नवी दिल्ली येथे लवकरच एका समारंभात हा पुरस्कार दिला जाईल, महासंघाचे अध्यक्ष हिमंता बिस्वा शर्मा यांनी ही माहिती दिली. 
बंगळुरू येथे महासंघाच्या झालेल्या कार्यकारिणीत जीवनगौरव पुरस्कार सुरू करण्याचा ठराव संमत करण्यात आला. 

प्रकाश पदुकोण यांनी १९८० मध्ये ऑल इंग्लंड स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते. अशी कामगिरी करणारे ते पहिलेच भारतीय होते. 

तसेच १९७८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्यांना सुवर्णपदक मिळाले होते, तर १९८३ मध्ये कोपनहेगन येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत त्यांनी कांस्यपदक मिळविले होते.



भारत-बेलारुसमध्ये १० करारांवर स्वाक्षऱ्या
भारत व बेलारुसने आज विविध क्षेत्रांत परस्पर सहकार्य वाढविण्यासंदर्भात दहा करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. संरक्षण क्षेत्राचा संयुक्त विकास करण्याबाबतच्या एका सामंजस्य करारावरही उभय देशांमध्ये एकमत झाले.

बेलारुसचे अध्यक्ष ए. जी. लुकाशेंको दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून, आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. दोन देशांमध्ये आर्थिक भागीदारी वाढविण्यावर भर देणे, हा या चर्चेतील महत्त्वाचा मुद्दा होता. 

या वेळी उभय देशांत संरक्षण, व्यापार, गुंतवणूक, तेल व गॅस, शिक्षण तसेच क्रीडा क्षेत्रात सहकार्य वाढविण्याविषयी १० करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.



गुजरातमध्ये १२ वी भारत-जपान वार्षिक परिषद आयोजित

१४ सप्टेंबर २०१७ रोजी गांधीनगर, गुजरात येथे १२ वी भारत-जपान वार्षिक परिषद आयोजित करण्यात आली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून जापानचे पंतप्रधान शिंजो अबे १३-१४ सप्टेंबर २०१७ रोजी भारत दौर्‍यावर येणार आहेत. मोदी आणि अबे यांच्या दरम्यान होणारी ही चौथी वार्षिक शिखर संवाद परिषद असणार आहे.

या वेळी पंतप्रधान मोदी यांनी शिंजो आबे यांच्यासोबत अहमदाबादमधील प्रसिद्ध सिद्दी सय्यद मस्जिदला भेट दिली. 

यावेळी अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रोजेक्टचे भूमिपूजन करण्यात आले. 



भारत, अफगाणिस्तान यांच्यात चार करारांवर स्वाक्षर्‍या
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या द्वैपक्षीय धोरणात्मक भागीदारी करार २०११ च्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या योजनाबद्ध भागीदारी परिषदेची दुसरी बैठक ११ सप्टेंबर २०१७ रोजी नवी दिल्लीत यशस्वीपणे पार पडली.

बैठकीदरम्यान चार दस्तऐवजांवर स्वाक्षर्‍या आणि त्यांचे आदानप्रदान करण्यात आले. 
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री सलाहुद्दीन रब्बानी हे प्रतिनिधीमंडळासोबत तीन दिवसीय भारत भेटीवर आले आहेत.



ब्रिटन संसदेने ईयू विथड्रॉवल विधेयक मंजूर केले
ब्रिटनच्या संसदेने ‘युरोपियन युनियन विथड्रॉवल विधेयक’ मंजूर केले आहे.
ब्रेक्जिटसाठी युरोपिय संघ कायद्यामधून बाहेर पाडण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये ब्रिटनच्या सरकारने आपले हे पहिले संसदीय विधेयक मंजूर केले.

हा विधेयक ब्रिटनमधील युरोपिय संघाच्या १९७२ युरोपियन कम्युनिटीज अॅक्ट या कायद्याची मक्तेदारी संपुष्टात आणणार. तसेच विधेयक सध्याच्या सर्व युरोपिय संघाच्या कायद्यांना ब्रिटनच्या कायद्यांमध्ये बदलणार. 



प्लुटोच्या दोन पर्वतरांगांना तेनझिंग नोर्गे, एडमंड हिलरी यांची नावे देण्यात आली
इंटरनॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल यूनियन (IAU) ने पर्वतारोही भारतीय-नेपाळी तेनझिंग नोर्गे (१९१४-१९८६) आणि न्यूझीलंडचा पर्वतारोही एडमंड हिलरी (१९१९-२००८) यांच्या नावावरून प्लूटोवरील दोन पर्वतरांगांचे नामकरण केले आहे.

त्या पर्वतरांगांना ‘तेनझिंग मॉन्ट्स’ आणि ‘हिलरी मॉन्ट्स’ असे नाव देण्यात आले आहे. तेनझिंग नोर्गे आणि एडमंड हिलरी या दोघांनीही सर्वात प्रथम माऊंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचले होते आणि सुरक्षितपणे परतले होते.

IAU चे वर्किंग ग्रुप फॉर प्लॅनेटरी सिस्टम नॉमेंक्लेचर हे अंतराळामधील बाबींच्या आणि त्याच्या पृष्टभागावर असलेल्या वैशिष्ट्यांचे नामकरण करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त प्राधिकरण आहे. 

यावेळी प्रथमच IAU च्या वर्किंग ग्रुप फॉर प्लॅनेटरी सिस्टम नॉमेंक्लेचर मंडळाकडून प्लूटो ग्रहावरील १४ वैशिष्ट्यांचे नामकरण मंजूर केले गेले आहे.

न्यू होरीझोन्स मोहीम ही प्लूटो ग्रह आणि त्याचा सर्वात मोठा चंद्र चेरॉन यांच्या पृष्टभागावर जवळून दृष्टिक्षेप टाकण्यासाठी नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिसट्रेशन (NASA) ने आयोजित केलेली मोहीम आहे. 

या मोहिमेंतर्गत 2015 साली प्लूटो ग्रहाचा आणि एक किंवा अधिक क्युपर बेल्ट ऑब्जेक्ट (KBO) चा अभ्यास करण्यासाठी न्यू होरीझोन्स हे अंतराळयान पाठवण्यात आले.