वारा (भौगोलिक संज्ञा) – भाग २

वाऱ्याचे वहन कार्य

०१. निलंबन
सूक्ष्म असे धुळीचे कण कोणताही आधार न घेता हवेत तरंगत असतात.

०२. उत्परिवर्तन 
सूक्ष्म कण उड्या मारत उडत जातात.

०३. पृष्ठघसर 
पृष्ठभागाशी घासत घरंगळत पुढे जातात.

वाऱ्याचे संचयन कार्य

वालुकागिरी (Sand Dust) वाळूचे मोठे मोठे ढीग उंची जास्तीत जास्त २० ते ३० मी काही ३०० मी असू शकते.
लांबी ६ किमी थरच्या वाळवंटात उंची ७० मीसहारा व इराण २०० मीकोलोरॅडो ३०० मी वाऱ्याची निश्चित दिशा असावी.
मोठ्या प्रमाणात वाळू साठा असावा. अडथळा नसावा. वाळूकागिरीचे स्थलांतर वार्षिक सरासरी ३० मीवैगनाल्ड या भूगर्भ शास्त्रज्ञाने वालुकागीरीचे बारखान व सिफू या २ प्रकारात वर्गीकरण केले आहे.
हैक याने १९४१ अरिझोना प्रांतातील वालुकागिरीचे अनुप्रस्थ, अनुदौर्य अनुध्येर्य आणि परीवरीय या ३ प्रकरात वर्गीकरण केले.

वाळूकागिरीचे स्थानावरून प्रकार

०१. वाळवंटीय वालुकागिरीवाळवंटी प्रदेशात आढळतात.
अरबस्थान,सहारा

०२. सागर किनारी वालुकागिरी

पुळण वर आढळतात.
उदा. ओरिसा किनारपट्टी,कच्छ् परिसर.

०३. नदीकाठीय वालुकागिरी 
उदा. गंगा,यमुना आणि कच्छ्

वाळूकागिरीचे आकारानुसार प्रकार

०१. अणुलंब वालुकागिरी किंवा वातानुवर्ती वाऱ्याच्या दिशेने निर्मिता यांना Self Dunes असेही म्हणतात.
उंची १०० मी पर्यंत असते. ८० किमी पर्यंत लांबी .
उदा. राजस्थान राहागट पश्चिमेस सहारा.

०२. अनुप्रस्थ वालुकागिरी 
वाऱ्याला काटकोणाच्या स्वरुपात निर्मिती लांबी जास्त रुंदी कमी

०३. बारखन किंवा अर्धचंद्राकृती (BARKHAN) 
तुर्कस्थानामधील अर्धचंद्रकृती टेकड्यानां बारखन म्हणतात. फुगीरभाग तयार होतो. काटकोनासारखा अर्धचंद्रकृती भाग तयार होतो.

बारखनची उंची सुमारे ३० मी पर्यंत असते विस्तार लाही किमी पर्यंत इराण व सहारात उंची २२० ते ३०० मी पर्यंत व लांबी ६ किमी पर्यंत
उदा. राजस्थान मधील बारनेर, बारखनमुळे हिरवळीच्या जागा नष्ट होतात.

४. ताराकृती टेकड्या 

काही कारणास्तव तापमान वाढल्याने दाब कमी होतो. त्यामुळे सगळ्या बाजूने वारा वाहत असतो.
ताऱ्याचा आकार प्राप्त होतो. पिरॉमिडसारखी रचना दिसते. मधल्या भागाची उंची ९० मी

लोएस मैदान

वाऱ्यासोबत वाहणाऱ्या ०.०२ ते ०.८मिमी व्यासाच्या सूक्ष्म कणाना लोएस म्हणतात. यांचा रंग फिकट पिवळा असतो.

लोएस मातीत सिलिका फेल्ड्स्पार अभ्र,क्वाटर्स, अल्युमिनियम इ. मूल द्रव्य असतात. यांच्या निक्षेपनाची जाडी सुमारे ३० ते ९० मी असते.

अत्यंत सुपीक माती या माती मध्ये सछिद्रता आहे. लोएस हे नाव जर्मनीतील आल्सेस प्रांतातील लोएस नावाच्या खेड्यावरून पडलेला आहे .

उत्तर चीन मध्ये सर्वात जास्त क्षेत्रफळ, उत्तर चीन मधिल लोएस मैदानाचा विस्तार चार लाख चौ.किमी क्षेत्रफळ
जाडी १०० ते ३०० मी अमेरिकेतील मिसिसिपी नदी, मिसुरी नदी, जर्मनीतील आल्सेस प्रांत, बेल्जियम लोएस मैदान वाळवंटी भागाच्या दूर आढळतात.

उर्मीचिन्हे (Ripple Marks)

वाळवंटी प्रदेशात सागरी लाटा गेल्या सारख्या दिसतात. उंची २.५ सेमी पेक्षा कमी वाऱ्यानुसार बदलतात म्हणून अस्थायी स्वरूपाचे असतात.

वाळूतट 

तट टाकल्यासारखे दिसतात लांबी १६० किमीवाऱ्याच्या दिशेने समांतर असे सपाट पृष्ठाचे. रुंदी ३ किमी
उदा. सहारा वाळवंटात मोठ्या प्रमाणात

वालुकास्तर / समतलप्राय वाळवंट  (Desert Painplain)एकदम सपाट असा बिन आकाराचा प्रारूप वारा आणि पाणी यांच्या संयुक्त परीमाणातून निर्माण होणारी भूरूपे.

०१. दुर्भूमी 
दऱ्या खोऱ्यानी युक्त बनलेल्या प्रदेशाला दुर्भूमी म्हणतात.

०२. बोल्सन 
मैदानी भाग असतो.

०३. प्लाया (लवणपटल)

टेकड्या खोऱ्यात लहान लहान नद्या मिळून वाहत आणताना सोबत आणलेले नदीने खनिज युक्त क्षार सरोवरात साठवतात. बाष्पीभवनाने हे पाणी उडते व खाली पांढरा क्षारयुक्त प्रदेश दिसतो.

-त्यालाच लवणक्षार पटल म्हणतात. भारतात राजस्थानमधील जैसेलमेरच्या उत्तरेस अनेक प्लाया सरोवर आहेत.

०४. बजदा 

वाळवंटी प्रदेशात जे डोंगर असतात. जलोड पंखांची निर्मिती होते. या अनेक अशा जलोड पंखाना एकत्र करून जो काही गाळाचा भाग निर्माण होते.

आफ्रिका खंडातील लिबिया मध्ये बजदा पहावयास मिळतात.

०५. पद्भूमी किंवा शिलापद 

पर्वताच्या पायथ्याशी फक्त क्षरण कार्यामुळे
उदा. चिखल युक्त गाळाचे मैदाने
उदा. कॅलिफोर्निया राज्यातील SAN BERNUR DINO पर्वताचा पायथ्याचा भाग