गायींना लवकरच मिळणार ‘हेल्थ कार्ड’

गायींच्या आरोग्याची नोंद ठेवण्यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या ‘पशुधन संजीवनी’ योजनेंतर्गत १५ लाखांहून अधिक गायींचे लवकरच हेल्थ कार्ड बनवले जाणार आहे. 

यामध्ये या जनावरांना आधार क्रमांकाप्रमाणे 12 आकडी क्रमांक देण्यात येणार आहेत. केंद्राच्या पशुधन योजनेंतर्गत प्रत्येक गायी आणि म्हशींची प्रजनन क्षमतेची नोंद ठेवली जाणार आहे. 

ही योजना राबणारे झारखंड हे पहिल राज्य असल्याचे Jharkhand State Implement Agency for Cattle and Buffalo (JSIACB) चे मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद प्रसाद यांनी सांगितले.

या पशुधन संजीवनी योजनेसाठी केंद्र सरकारने यापूर्वी १.५७ कोटी रुपयांची तरतुद केली होती.
तर झारखंड सरकारने या योजनेसाठी 1.04 कोटी रुपये दिले आहेत. नवी दिल्लीत ४८ वी राज्यपालांची परिषद संपन्न
१३ ऑक्टोबर २०१७ रोजी नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात आयोजित दोन दिवसीय ४८ वी राज्यपालांची परिषद संपन्न झाली.

भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय महत्त्व असलेल्या विषयांवर विचारांची देवाणघेवाण करण्यात आली.

१९४९ साली राष्ट्रपती भवन येथे राज्यपालांची पहिली परिषद भरविण्यात आली होती. ही परिषद तत्कालीन गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया सी. राजगोपालाचारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. IIT मद्रास येथे जगातील सर्वात मोठे कम्बशन रिसर्च सेंटर उघडण्यात आले
भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास येथे ‘नॅशनल सेंटर फॉर कम्बशन रिसर्च अँड डेव्हलपमेंट (NCCRD)’ हे कम्बशन (ज्वलन) विषयावरील जगातील सर्वात मोठे संशोधन केंद्र उघडण्यात आले आहे.

या केंद्राचे उद्घाटन NITI आयोगाचे व्ही. के. सारस्वत यांच्या हस्ते करण्यात आले. ‘पर्यायी ऊर्जा आणि पर्यावरण संरक्षण’ या विषयात संशोधनास या केंद्राची मदत होईल.देशी ‘INS किल्तन’ जहाज भारतीय नौदलात नियुक्त केले जाणार
१६ ऑक्टोबर २०१७ रोजी विशाखापट्टणम येथे संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून भारतीय नौदलात देशातच विकसित पाणबुडी-विरोधी युद्धसामुग्रीने सुसज्जित ‘INS किल्तन’ जहाज नियुक्त केले जाणार आहे.

‘INS किल्तन’ हे तयार केल्या जात असलेल्या चार कामोर्ता-श्रेणीचे तिसरे जहाज आहे. जहाजाची संरचना नौदलाच्या नाविक संरचना संचलनालयाने तयार केली आणि कोलकातामधील गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स (GRSE) यांनी बांधणी केली.

‘INS किल्तन’ जहाज वजनी टॉर्पीडोज, ASW रॉकेट्स, 76MM आणि 30MM कॅलिबर बंदुकींनी सुसज्जित आहे. याशिवाय यात अत्याधुनिक उपकरणे जसे SONAR आणि हवाई पाळतीसाठी ‘रडार रेवथी’ बसविण्यात आलेली आहेत.चेन्नईमधील IISF मध्ये जीवशास्त्राचा सर्वात मोठा वर्ग घेतल्याची गिनीज नोंद
चेन्नईमधील अन्ना विद्यापीठाच्या परिसरात आयोजित ‘भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF)’ दरम्यान जीवशास्त्राविषयी सर्वात मोठा वर्ग घेण्याचा नवा गिनीज विश्वविक्रम बनविण्यात आला.

या वर्गाला १०४९ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. २० स्थानिक शाळांमधून इयत्ता ९ आणि इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचा यामध्ये भाग होता. हा तास शंकर सीनियर सेकंडरी स्‍कूलच्या शिक्षिका लक्ष्मी प्रभू यांनी घेतला.

गायक टी. एम. क्रिष्णा यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता सन्मान
कर्नाटक गायक टी. एम. क्रिष्णा यांना वर्ष २०१५ आणि २०१६ साठी ३० व्या इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

रॅमन मॅगसेसे प्राप्तकर्ते टी. एम. क्रिष्णा यांना हा पुरस्कार ३१ ऑक्टोबर रोजी इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते दिला जाईल.

टी. एम. क्रिष्णा हे भारतीय शास्त्रीय संगीतात कर्नाटक परंपरा जपणारे एक प्रमुख गायक आहेत, तसेच संगीत क्षेत्रात सर्वांना जागा मिळवून देण्यासाठी झटणारे एक कार्यकर्ता देखील आहेत. ते युद्धग्रस्त श्रीलंकेत शास्त्रीय संगीताच्या परंपरा पुन्हा एकदा रुजविण्यासाठी चालविलेल्या चळवळीचा भाग देखील होते.

१९८५ साली काँग्रेस पक्षाद्वारा इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्काराची स्थापना करण्यात आली. प्रशस्तीपत्र आणि १० लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. भारताच्या विविध समाज आणि संस्कृतींमध्ये राष्ट्रीय एकात्मता, समज आणि सहभाग वाढविण्यासाठी योगदान देणार्‍या व्यक्तीला/संस्थेला दरवर्षी ३१ ऑक्टोबरला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.पुणे येथे भारत-श्रीलंका यांच्यात ‘मित्र शक्ती २०१७’ सराव 
१३ ऑक्टोबर २०१७ रोजी पुणे येथे भारत-श्रीलंका यांच्यात ‘मित्र शक्ती २०१७’ संयुक्त सरावाला सुरूवात झालेली आहे. हा कार्यक्रम २६ ऑक्टोबर २०१७ पर्यंत चालणार आहे.

सरावात दहशतवादाविरोधी मोहिमा आणि सैनिक दल या विषयावर भर देण्यात आला आहे. ‘मित्र शक्ती’ सराव मालिकेची ही पाचवी आवृत्ती आहे.

२०१३ सालापासून भारत-श्रीलंका यांच्यात ‘मित्र शक्ती’ या संयुक्त सैनिकी सराव मालिकेला सुरुवात झाली. सरावादरम्यान देशाच्या संरक्षणात्मक मुद्द्यांवर चर्चा केली जाते आणि एकमेकांच्या अनुभवाचे आदानप्रदान केले जाते.13 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिवस साजरा
यावर्षी १३ ऑक्टोबरला ‘होम सेफ होम: रिड्युसींग एक्सपोजर, रिड्युसींग डिसप्लेसमेंट’ या संकल्पनेखाली आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिवस (International Day for Disaster Reduction) साजरा झाला.

आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिवसाची स्थापना १९८९ साली करण्यात आली. सुरूवातीला हा दिवस प्रत्येक ऑक्टोबर च्या दुसर्‍या बुधवारी साजरा केला जात होता. त्यानंतर २००९ सालापासून संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने १३ ऑक्टोबरला हा दिवस साजरा करण्याचे मान्य केले.ऑड्रे एझोले UNESCO च्या पुढील प्रमुख
संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) च्या कार्यकारी मंडळाचे पुढील नवीन प्रमुख म्हणून फ्रान्सच्या माजी सांस्कृतिक मंत्री ऑड्रे एझोले यांची निवड करण्यात आली आहे.

आठ वर्षांचा नियुक्ती कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर महानिदेशक पदावरील बल्गेरियाचे इरीना बोकोवा यांच्याकडून एझोले पदाचा कारभार घेतील.

संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही पॅरिसमधील संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संघटना आहे. या संघटनेचे १९५ सदस्य आणि दहा सहयोगी सदस्य आहेत. याची स्थापना १६ नोव्हेंबर १९४५ रोजी झाली.आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस १५ ऑक्टोबर 
दरवर्षी १५ ऑक्टोबर या तारखेला ‘आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस’ साजरा करण्यात येतो.

यावर्षी हा दिवस ‘चॅलेंजेस अँड ऑपर्चुनिटीज इन क्लायमेट-रेझीलंस अॅग्रिकल्चरल फॉर जेंडर इक्वेलिटी अँड द एमपॉवरमेंट ऑफ रूरल विमेन अँड गर्ल्स’ या संकल्पनेखाली साजरा करण्यात आला आहे.