देशातील उत्कृष्ट पत्रकारांचा गौरव समारंभ 
देशातील २७ उत्कृष्ट पत्रकारांचा ‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नलिझम अवॉर्डस २०१६’ ने गौरव करण्यात आला. या पुरस्कारांचे हे बारावे वर्ष आहे. 


नवी दिल्लीत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सोहळा पार पडला. यासाठी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

एक्स्प्रेस वृत्तसमूहाकडून त्यांचे संस्थापक रामनाथ गोएंका यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ २००६ साली या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली.

मानचिन्ह आणि प्रत्येकी १ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या ७ तर ‘लोकसत्ता’च्या १ महिला पत्रकाराने या पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली.

यंदा या पुरस्कारासाठी विजेत्यांची निवड करण्याचे काम सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी.एन. श्रीकृष्ण, एचडीएफसी लि.चे अध्यक्ष दीपक पारेख, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय. कुरेशी आणि वरिष्ठ पत्रकार पामेला फिलिपोज यांसारख्या नावाजलेल्या परीक्षकांनी पार पाडले.जगातील स्थलांतरितांत भारत प्रथम 
परदेशातील स्थलांतरितांच्या संख्येत भारत पहिल्या क्रमांकावर असून एकूण १.७ कोटी भारतीय लोक परदेशात वास्तव्य करीत आहेत. त्यातील पन्नास लाख लोकांचे सध्याचे वास्तव्य आखातात आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे.

मेक्सिको, रशिया, चीन, बांगलादेश, सीरिया, पाकिस्तान, युक्रेन या देशांचे लोक त्या खालोखाल मोठय़ा प्रमाणात स्थलांतरित म्हणून परदेशात आहेत. त्यांची संख्या ०.६ ते १.१ कोटी आहे, असे २०१७ च्या आंतरराष्ट्रीय स्थलांतर अहवालात म्हटले आहे. भारताखालोखाल मेक्सिकोचे १.३ कोटी लोक परदेशात स्थलांतरित म्हणून राहात आहेत.

रशियाचे १.१ कोटी, चीनचे १ कोटी, बांगलादेशचे ०.७ कोटी, सीरियाचे ०.७ कोटी, पाकिस्तान व युक्रेनचे प्रत्येकी ०.६ कोटी लोक परदेशात स्थलांतरित म्हणून वास्तव्यास आहेत.भारतात सर्वाधिक महिला वैमानिक आहेत
केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयापासून प्राप्त महितीनुसार, जगात भारतामध्ये सर्वाधिक महिला वैमानिक आहेत. यात एयर इंडिया आणि भारतीय वायुदल या दोन्हीचा समावेश आहे.

१९ डिसेंबर २०१७ रोजी नवी दिल्लीत ‘भारत महिला वैमानिक संघटना (IWPA)’ च्या सुवर्ण महोत्सवी समारंभ आयोजित केले गेले होते.

सरला ठकराल (१९१४-२००८) या विमान उडविणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या. १९३६ साली वयाच्या २१ व्या वर्षी त्यांना विमानचालनासाठी वैमानिकाचा परवाना मिळाला आणि त्यांनी ‘जिप्सी मोथ सोलो’ हे विमान उडवले होते. 

भारतीय वायुदलात नियुक्त प्रथम लढाऊ विमानाच्या (मिग-21) महिला वैमानिक – भावना कंठ, मोहना सिंह आणि अवनी चतुर्वेदी. 
नौदलातली पहिली महिला वैमानिक – शुभांगी स्वरूप.

NGT चे अध्यक्षीय न्यायमूर्ती स्वतंत्र कुमार निवृत्त
राष्ट्रीय हरित प्राधिकरण (NGT) चे अध्यक्षीय न्यायमूर्ती स्वतंत्र कुमार यांचा कार्यकाळ १९ डिसेंबर २०१८ रोजी संपला.

२० डिसेंबर २०१२ रोजी स्वतंत्र कुमार यांच्या पाच वर्षांच्या काळासाठी NGT च्या अध्यक्षपदी नेमणूक केली गेली होती. ते त्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश होते.

राष्ट्रीय हरित प्राधिकरण (NGT) हे राष्ट्रीय हरित प्राधिकरण अधिनियम-२०१० अंतर्गत स्थापन करण्यात आले आहे. पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन या संबंधित कोणत्याही कायदेशीर अधिकाराच्या अंमलबजावणीसह इतर नैसर्गिक स्रोतांच्या संरक्षणाशी संबंधित प्रकरणांची प्रभावीपणे आणि वेगाने विल्हेवाट लावण्यासाह पर्यावरणविषयक वाद हाताळण्यासाठी आवश्यक कौशल्य असलेले हे एक विशेष मंडळ आहे.


राजस्थानमध्ये ‘हमेशा विजयी’ लष्करी सरावाला सुरुवात
भारतीय लष्कराच्या दक्षिण आदेशाने १६ ते २२ डिसेंबर २०१७ या काळात राजस्थानमध्ये ‘हमेशा विजयी’ हा युद्धाभ्यास आयोजित केला आहे.
या युद्धाभ्यासाचा उद्देश्य म्हणजे भू-वायु अश्या एकीकृत रूपाने प्रतिद्वंदीच्या क्षेत्रात आतमध्ये जाण्याच्या सशस्त्र दलाच्या क्षमतेचे मूल्यांकन करणे आहे.भारतातल्या पहिल्या ‘राष्ट्रीय रेल व परिवहन विद्यापीठ’ च्या स्थापनेस मंजूरी
केंद्रीय मंत्रिमंडळाने गुजरातच्या वडोदरामध्ये देशातले पहिले ‘राष्‍ट्रीय रेल व परिवहन विद्यापीठ (NRTU)’ स्‍थापित करण्यास मंजूरी दिली आहे.
रेल आणि परिवहन क्षेत्रात अभ्यासक्रम चालविणारे हे विद्यापीठ UGC (विद्यापीठ मानित संस्‍था) विनियमन-२०१६ अंतर्गत मानित विद्यापीठाच्या रूपात स्थापन केले जाईल. जुलै २०१८ मध्ये प्रथम शैक्षणिक सत्र सुरू होण्याचे अपेक्षित आहे.

रेल्वे मंत्रालयाअंतर्गत एका ना-नफा कंपनीच्या माध्यमातून याला वित्‍तीय व संरचनासंबंधी पाठबळ दिले जाणार आणि कुलगुरू व प्रति-कुलगुरू पदाची नियुक्ती करणार. विद्यापीठासाठी वडोदरामधील ‘भारतीय रेल्वेची राष्‍ट्रीय प्रबोधिनी (NAIR)’ चा वर्तमान परिसर आणि पायाभूत सुविधांचा वापर केला जाणार आहे.भारतीय आणि ओमान नौदलांमधील ‘नसीम-अल-बहार’ सरावाला सुरुवात
भारत आणि ओमान यांच्या नौदलांमधील ‘नसीम-अल-बहार’ किंवा ‘सी ब्रीज’ या द्विपक्षीय सरावाला ओमानमध्ये सुरुवात झाली आहे.

१९९३ सालापासून आयोजित करण्यात येणार्‍या द्वैवार्षिक सराव मालिकेमधील सरावाची ही ११ वी आवृत्ती आहे. भारतीय नौदलाची INS त्रिकांड आणि INS तेग ही जहाजे ही मस्कटमध्ये दाखल झाली आहेत.जेरुसलेमप्रकरणी राष्ट्रसंघात अमेरिका एकाकी 
जेरुसलेम शहराला इस्राईलची राजधानी म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली मान्यता मागे घेण्याची मागणी करणाऱ्या ठरावाला अमेरिका वगळता संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीमधील इतर सर्व १४ सदस्यांनी पाठिंबा दिला आहे. अमेरिकेने या ठरावासाठी व्हेटो अधिकाराचा वापर केला आहे. 

जेरुसलेमवरील इस्राईलच्या हक्काबाबत जागतिक पातळीवर वाद असताना अमेरिकेने काही दिवसांपूर्वी जेरुसलेम इस्राईलची राजधानी म्हणून मान्य असल्याची एकतर्फी घोषणा केली होती. यामुळे अरब देशांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती, तर इतर अनेक देशांनीही या घोषणेला विरोध केला होता. याचे पडसाद सुरक्षा समितीमध्येही पडले.

इजिप्तने मांडलेल्या ठरावामध्ये अमेरिकेचे नाव न घेता त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. जेरुसलेमचा दर्जा केवळ इस्राईल आणि पॅलेस्टाइन यांच्यामधील थेट चर्चेनंतरच निश्‍चित व्हावा, या १९६७ मधील ठरावाप्रमाणेच इतर देशांनी वागले पाहिजे, असे मत ब्रिटन आणि फ्रान्स यांनी मांडले

संयुक्त राष्ट्राच्या आमसभेतही याविषयी मतदान घेण्यात आले. येथेही अमेरिका १२८ विरुद्ध ९ अशा मतांनी एकाकी पडला. तर ३४ सदस्य यावेळी तठस्थ राहिले.