‘आधार’ ठरला ‘हिंदी वर्ड ऑफ द इयर’ 
जगभरात प्रसिद्ध असलेला इंग्रजी शब्दकोश अर्थात ऑक्सफोर्ड डिक्शनरी दरवर्षी ‘इंग्रजी वर्ड ऑफ दि इयर’ घोषित करते. 


त्याचप्रमाणे ऑक्सफोर्डने यंदा पहिल्यांदाच ‘हिंदी वर्ड ऑफ दि इयर घोषित’ केला असून २०१७ सालासाठी हा मान ‘आधार’ या शब्दाला मिळाला आहे. 

राजस्थानात सुरु असलेल्या जयपूर साहित्य संमेलनात (जेएलएफ) ऑक्सफोर्ड डिक्शनरीकडून ही घोषणा करण्यात आली. 

या कार्यक्रमात हिंदीतील प्रसिद्ध कवी अशोक वाजपेयी, ज्येष्ठ साहित्यिक चित्रा मुद्गल आणि वरिष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचा सहभाग होता.


निवड समितीसमोर नोटबंदी, स्वच्छ, आधार, योग, विकास, बाहुबली असे अनेक पर्यायी शब्द होते. अखेर यांमधून ‘आधार’ या शब्दाची निवड करण्यात आली. ‘मैत्री यात्रा’ – जम्मू-काश्मीर विद्यार्थी विनिमय कार्यक्रमाचा समारोप
‘मैत्री यात्रा’ नावाच्या जम्मू-काश्मीर विद्यार्थी विनिमय कार्यक्रमाचे आयोजन नवी दिल्लीत राष्ट्रीय बाल भवन येथे केले गेले होते.

कार्यक्रमाचे आयोजन मनुष्यबळ विकास मंत्रालयाद्वारे जम्मू-काश्मीरच्या तरुणाईला भारताच्या विविध भागांमधील संस्कृती, भाषा आणि विकास याबाबत जाणून घेण्याकरिता आयोजित केले गेले होते. विद्यार्थ्यांना माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम होता.

जम्मू-काश्मीरमधील इयत्ता ९ ते १२ वी पर्यंतच्या वर्गामधील ५०० विद्यार्थ्यांनी १८ जानेवारी २०१८ रोजी दिल्लीमध्ये प्रवेश केला होता. त्यांना दिल्ली दर्शनासह सांस्कृतिक कार्यक्रमांचे दर्शन घडविले गेले.प्रसिद्ध बांग्ला अभिनेत्री सुप्रिया देवी यांचे निधन
प्रसिद्ध जेष्ठ बांग्ला अभिनेत्री सुप्रिया देवी यांचे निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या.

दिग्दर्शक ऋत्विक घटक यांच्या ‘मेघे ढाका तारा’ चित्रपटामधील भूमिकेनंतर त्यांना प्रसिद्धी प्राप्त झाली. पद्मश्री प्राप्त सुप्रिया देवी यांना पश्चिम बंगाल शासनातर्फे राज्याच्या ‘बंग विभूषण’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवांकीत केले गेले होते. 

त्यांचा अभिनय कार्यकाळ जवळपास ५० वर्षांचा होता. ‘बसु परिवार’ (१९५२) हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यांच्या नावावर ‘चौरंगी’, ‘बाग बांदी खेला’ यासारखे चित्रपट आहेत.ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धात वोझ्नियाकी विजेती
जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानाबरोबरच ग्रँड स्लॅम विजेतेपदावर मोहोर नोंदवण्याचे स्वप्न सिमोना हॅलेपला साकार करता आले नाही. 

उत्कंठापूर्ण लढतीत कॅरोलीन वोझ्नियाकी या डॅनिश खेळाडूने तिला 7-6 (7-2), 3-6, 6-4 असे हरवले आणि पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपदाचे ध्येय साकार केले.

बाबास आणि म्लाडेनोविक या जोडीने ऑस्ट्रेलियन टेनिस ओपनचे विजेतेपद पटकावले 

मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या ‘ऑस्ट्रेलियन ओपन २०१८’ या टेनिस स्पर्धेत हंगेरीची टिमिया बाबोस आणि फ्रांसची क्रिस्टिना म्लाडेनोविक या जोडीने महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे.

बाबोस-म्लाडेनोविक या जोडीने अंतिम खेळीत इलेना वेसनिना आणि इकॅटरिना माकारोवा या जोडीचा पराभव केला. बाबोसचा हा पहिला ग्रँड स्लॅम किताब आहे.

‘ऑस्ट्रेलियन ओपन’ ही ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये जानेवारी महिन्यात दरवर्षी आयोजित होणारी एक टेनिस स्पर्धा आहे. ही स्पर्धा पहिल्यांदा १९०५ साली खेळली गेली होती. ही वर्षात खेळल्या जाणार्‍या चार ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धांमधील प्रथम स्पर्धा आहे. अन्य तीन – फ्रेंच ओपन, विंबल्डन आणि यूएस ओपन.


जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट सज्ज
नासा जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेटला अंतराळ प्रक्षेपित करणारी प्रणाली (एसएलएस) विकसित करत आहे. नुकतेच जगातील सर्वात मोठ्या व शक्तिशाली रॉकेटचे इंजिन आरएस-25 चे यशस्वी परीक्षण करण्यात आले आहे. 

सर्व कसोट्यांतून बाहेर पडून हे अत्याधुनिक प्रणालीयुक्त रॉकेट साकारले आहे. सर्वकाही ठीक राहिल्यास पुढील वर्षी मानवाला अंतराळ घेऊन जाणाऱ्या ओरियन यानासोबत या रॉकेटलादेखील पाठवण्यात येणार आहे. 

ही मोहीम मानवरहित असेल. या एक वर्षाच्या कार्यकाळात संशोधक रॉकेटचे वजन व खर्च कमी करण्यासाठी 3-डी मुद्रित सुटे भाग लावून मोहीम पूर्ण करणार आहेत.

रॉकेटच्या साहाय्याने संशोधकांना पुन्हा चंद्रावर पाठवले जाईल. एस्टॉरॉइड मोहिमेतही रॉकेटचा वापर केला जाणार आहे. 
हे रॉकेट ७७ टन वजनासह उड्डाण करण्यास सक्षम आहे. ही क्षमता नंतर वाढवून ११५ टन केली जाईल.

रॉकेटचे वजन ८००० एलबीएस आहे. 
लांबी १४ मीटर व रुंदी ८ मीटर आहे. तापमान ४२३ ते ६ हजार फॅरनहाइटपर्यंत.

इंजिनात इंधन तसेच ऑक्सिजन दोन्हींचे मिश्रण उपयोगात आणले जाऊ शकते.

डिझाइन कॅलिफोर्नियात तयार झाले आहे. मिसिसिपी शहरात त्याचे परीक्षण झाले आहे.लुसियानामध्ये ही प्रणाली विकसित केली. 

एसएलएस सुरू करण्यात आले होते. तेव्हा 4 आरएस-25 इंजिन सातत्याने ८.५ मिनिटांपर्यंत चालू ठेवण्यात आले होते.आरएस-२५ इंजिनातून निघणारा वायू, ध्वनीच्या १३ पट अधिक वेगाने उत्सर्जित होतो.

लॉस एंजलिस ते न्यूयॉर्क शहराचे अंतर केवळ १५ मिनिटांत पूर्ण करता येऊ शकते.९२२ वर्षांच्या इतिहासात प्रथमच प्रवेशपात्र विद्यार्थिनींची संख्या अधिक
जगातील सहाव्या क्रमांकाचे सर्वश्रेष्ठ विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या ऑक्सफर्डमध्ये पहिल्यांदाच प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींची संख्या अधिक आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ९२२ वर्षांच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. 

यंदा पदवी अभ्यासक्रमाला १०२५ विद्यार्थी व १०६० विद्यार्थिनींनी प्रवेश घेतल्याचे ब्रिटन युनिव्हर्सिटी अँड कॉलेज अॅडमिशन मंडळाकडून सांगण्यात आले. 

ऑक्सफर्ड विद्यापीठ १०९६ पासून अस्तित्वात आहे. येथून एकूण २९ नोबेल पारितोषिक विजेते आणि २७ ब्रिटिश पंतप्रधान उत्तीर्ण झाले आहेत. भारतीय वंशाचे वकिल पार्थिव पटेल यांना न्यू जर्सी बारमध्ये स्थान मिळाले
पार्थिव पटेल या भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या वकिलाचा न्यू जर्सी बार असोसिएशनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

पटेल अनाधिकृत स्थलांतरीताच्या रूपात अमेरिकेत आले होते. पटेल डेफर्ड अॅक्शन फॉर चाइल्डहुड अरायवल्स (DACA) अंतर्गत प्रथम लाभार्थी आहेत, ज्यांना न्यू जर्सी बार असोसिएशनमध्ये सामील केले गेले आहे.

अमेरिकेची डेफर्ड अॅक्शन फॉर चाइल्डहुड अरायवल्स (DACA) योजना माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या प्रशासन काळात प्रस्तावित धोरण आहे, जे बाल्यावस्थेत अमेरिकेत आणलेल्या अवैध अधिकृत दस्तऐवज नसलेल्या स्थलांतरितांना वापस मायदेशी परत पाठविण्यापासून रोखते. मात्र वर्तमान राष्ट्रपतींनी हे धोरण वापस घेतलेले आहे आणि नवा आदेश मार्च २०१८ पासून लागू केला जाणार आहे.