पद्म पुरस्कार २०१८

पद्म पुरस्कार 'भारतरत्न' नंतर भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत. पद्म पुरस्कारांची सुरुवात १९५४ सालापासून करण्यात आली. पण १९७८ ते १९७९ आणि १९९३ ते १९९६ या कालखंडात यामध्ये खंड पडला. या सहा वर्षात पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले नाहीत. 

पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणीत पद्म पुरस्कार विभागलेला आहे. पद्म पुरस्कार कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक जीवन, विज्ञान व तंत्रज्ञान, उद्योग व व्यापार, वैद्यकीय सेवा, साहित्य व शिक्षण, नागरी सेवा, क्रीडा या प्रमुख ९ व इतर काही क्षेत्रातून निवडक लोकांना प्रदान केले जातात.

प्रत्येक राज्यातील सरकार, केंद्रीय मंत्री, पूर्वी भारतरत्न व पद्म पुरस्कार प्राप्त झालेल्या व्यक्ती, राज्यांचे मुख्यमत्री व राज्यपाल इत्यादी व्यक्ती पद्म पुरस्कारासाठी समितीकडे कोणत्याही व्यक्तीची शिफारस करू शकतात. पद्म पुरस्कार समिती दरवर्षी पंतप्रधानाकडून ठरविली जाते. सामान्य नागरिकालाही ऑनलाईन पद्धतीने शिफारस करण्याचा अधिकार देण्यात आला होता.

प्रत्येक वर्षी १ मे ते १५ सप्टेंबर दरम्यान या शिफारसी स्वीकारल्या जातात. 'पद्मपुरस्कार समिती' नंतर या नावातून काही जणांची शिफारस पंतप्रधान व राष्ट्रपतींकडे करते. एका वर्षात पद्म पुरस्कार प्रदान केल्या जाणाऱ्या व्यक्तींची संख्या १२० पेक्षा जास्त असू नये. (विदेशी नागरिक व मरणोत्तर पुरस्कार वगळता).

प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कार जाहीर केले जातात. दरवर्षी नंतर मार्च किंवा एप्रिल महिन्यात एक सोहळ्यात हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केले जातात.

राष्ट्रपती कोणत्याही व्यक्तीचा पुरस्कार रद्द करू शकतात किंवा परत काढून घेऊ शकतात.

प्रत्येक विजेत्याला एक पदकाची प्रतिकृती दिली जाते. विजेते ती प्रतिकृती कोणत्याही समारोहात किंवा शासकीय समारंभात परिधान करू शकतात. पण या पुरस्काराचा वापर विजेत्याला कोठेही म्हणजेच लेटरहेड, इन्विटेशन कार्ड, पोस्टर पुस्तके यावर करता येत नाही. पदकाचा कोणत्याही पद्धतीने गैरवापर केल्यास पुरस्कार जप्त करण्यात येऊ शकतो.

२०१८ साली एकूण ८५ पद्म पुरस्कारांनी सम्मानित करण्यात आले आहे. त्यापैकी ३ पद्म विभूषण, ९ पद्मभूषण तर ७५ पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले. यंदा पुरस्कार विजेत्यांमध्ये १४ महिला आहेत.

यंदा ३ व्यक्तींना मरणोत्तर पद्म पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. त्यापैकी ०१ व्यक्तीला पद्मभूषण आणि ०२ व्यक्तींना पद्मश्रीने सम्मानित करण्यात आले.

यंदा १६ विदेशी व अनिवासी भारतीय व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आला. ०१ विदेशी व १ अनिवासी भारतीय व्यक्तीला पद्मभूषण, १४ परदेशी व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. 

२०१७ साली एकूण ८९ व्यक्तींना पद्म पुरस्कारांनी सम्मानित करण्यात आले होते. त्यापैकी ७ व्यक्तीना पद्म विभूषण, ७ व्यक्तींना पद्मभूषण तर ८५ व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले.त्यावेळी पुरस्कार विजेत्यांमध्ये १९ महिला आहेत.

२०१६ साली एकूण ११२ व्यक्तींना पद्म पुरस्कारांनी सम्मानित करण्यात आले होते. त्यापैकी १० व्यक्तीना पद्म विभूषण, १९ व्यक्तींना पद्मभूषण तर ८३ व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले.त्यावेळी पुरस्कार विजेत्यांमध्ये १९ महिला आहेत.

एकूण ८५ 'पद्म' मानकऱ्यांमध्ये १० महाराष्ट्रातील आहेत. त्यात प्रत्येकी १ पद्मविभूषण व १ पद्मभूषण तर ८ पद्मश्री आहेत. 

गुलाम मुस्तफा खान (संगीत-पद्मविभूषण), अरविंद पारीख (संगीत-पद्मभूषण) हे महाराष्ट्र राज्यातील मानकरी आहेत. यासोबतच डॉ. अभय व राणी बंग (वैद्यकीय), अरविंद गुप्ता (साहित्य), मनोज जोशी (अभिनय), रामेश्वरलाल काबरा (उद्योग), शिशिर पुरुषोत्तम मिश्रा (चित्रपट), मुरलीकांत पेटकर (जलतरण), संपत रामटेके (सामाजिक कार्य), पानतावणे गंगाधर (साहित्य) हे राज्यातून पद्मश्रीचे मानकरी आहेत.

पद्मविभूषण
नावक्षेत्र राज्य
श्री इलाईराजा कला (संगीत)तामिळनाडू
श्री गुलाम मुस्तफा खान कला (संगीत) महाराष्ट्र
श्री परमेश्वरन परमेश्वरन साहित्य व शिक्षणमहाराष्ट्र



पद्मभूषण
नावक्षेत्रराज्य
श्री पंकज अडवाणी क्रीडा (बिलियर्ड्स/स्नूकर)कर्नाटक
श्री फिलिपोज मर क्रिसोस्तोम इतर (अध्यात्म)केरळ
श्री महेंद्रसिंग धोनी क्रीडा (क्रिकेट)झारखंड
श्री अलेक्झांडर कडकीन(विदेशी/मरणोत्तर)सार्वजनिक सेवा रशिया
श्री रामचंद्रन नागास्वामी इतर (पुरातत्वशास्त्र)तामिळनाडू
श्री वेद प्रकाश नंदा (अनिवासी)साहित्य व शिक्षणअमेरिका
श्री लक्ष्मण पैकला (चित्रकला)गोवा
श्री अरविंद पारीख कला (संगीत) महाराष्ट्र
श्री शारदा सिन्हा कला (संगीत)बिहार


पद्मश्री
नाव क्षेत्रराज्य
श्री अभय बंग व राणी बंगवैद्यकीयमहाराष्ट्र
श्री दामोदर गणेश बापट सामाजिक सेवाछत्तीसगड 
श्री प्रफुल्ल गोविंद बरुआ साहित्य व शिक्षण (पत्रकारिता) आसाम
श्री मोहन स्वरूप भाटियाकला (लोकसंगीत)उत्तर प्रदेश
डॉ. सुधांशु बिस्वाससामाजिक कार्यपश्चिम बंगाल
श्रीमती सैकहोम मीराबाई चानू क्रीडा (भारोत्तोलन)मणिपूर
श्री पंडित श्यामलाल चतुर्वेदीसाहित्य व शिक्षण (पत्रकारिता)छत्तीसगड
श्री जोस मा जोई कन्सेप्शन III (विदेशी)उद्योग व व्यापार फिलीपाइन्स
श्रीमती लोंगपोकलॅकपाम सुभदानी देवीकला (विणकर)मणिपूर
श्री सोमदेव देववर्मनक्रीडा (टेनिस)त्रिपुरा
श्री ऐशी धोडेनवैद्यकीयहिमाचल प्रदेश
श्री अरुप कुमार दत्तासाहित्य व शिक्षणआसाम
श्री दोड्डारंगा गौडाकला (गीतकार)कर्नाटक
श्री अरविंद गुप्तासाहित्य व शिक्षणमहाराष्ट्र
श्री दिगंबर हंसदासाहित्य व शिक्षणझारखंड
श्री रमली बिन इब्राहिम (विदेशी)कला (नृत्य)मलेशिया
श्री अन्वर जलालपुरी (मरणोत्तर)साहित्य व शिक्षणउत्तर प्रदेश 
श्री पियॉन्ग टेमजेन जमीर साहित्य व शिक्षणनागालँड
श्री सिट्ववा जोद्दती सामाजिक कार्यकर्नाटक
श्रीमती मालती जोशी साहित्य व शिक्षणमध्य प्रदेश
श्री मनोज जोशीकला (अभिनय)महाराष्ट्र
श्री रामेश्वरलाल काबरा उद्योग व व्यवसायमहाराष्ट्र
श्री प्राण किशोर कौल कलाजम्मू आणि काश्मीर
श्री बौनलप केओकंगना (विदेशी)इतर (वास्तुकला)लाओस
श्री टॉमी कोह (विदेशी)सार्वजनिक सेवासिंगापूर
श्रीमती लक्ष्मी कुट्टी वैद्यकीय (पारंपरिक)केरळ
श्री जॉयश्री गोस्वामी महंत साहित्य व शिक्षणआसाम
श्री नारायण दास महाराज इतर (अध्यात्म)राजस्थान
श्री प्रवकर महाराणा  कला (शिल्पकला)ओडिशा
श्री हुन मेनी (विदेशी)  सार्वजनिक सेवाकंबोडिया
श्री नौफ मरवानी (विदेशीइतर (योगा)सौदी अरेबिया
श्री झवेरीलाल मेहता साहित्य व शिक्षण (पत्रकारिता)गुजरात
श्री कृष्ण बिहारी मिश्रा साहित्य व शिक्षण पश्चिम बंगाल
श्री सिसीर पुरषोत्तम मिश्रा कला (चित्रपट) महाराष्ट्र
श्रीमती सुभसिनी मिस्त्री सामाजिक कार्य पश्चिम बंगाल
श्री टॉमीओ मिझोकामी (विदेशीसाहित्य व शिक्षण जपान
श्री सोमदेत फ्रा महा मुनीवोन्ग (विदेशीइतर (अध्यात्म) थायलंड
श्री केशव राव मुसळगावकर साहित्य व शिक्षण मध्य प्रदेश
डॉ थांत मयिंत यू (विदेशी)सार्वजनिक सेवा म्यानमार
श्रीमती व्ही नानम्मालइतर (योगा)तामिळनाडू
श्रीमती सुलगट्टी नरसम्मासामाजिक कार्य कर्नाटक
श्रीमती विजयालक्ष्मी नवनीतकृष्णन कला (लोकसंगीत)तामिळनाडू
श्री आय न्योमान नुआरता (विदेशीइतर (शिल्पकला)इंडोनेशिया
श्री मलाई हाजी अब्दुल्लाह बिन मलाई हाजी उस्मान (विदेशी)  सामाजिक कार्यब्रुनेई दारूस्सलाम
श्री गोबर्धन पाणिक कला (विणकर)ओडिशा
श्री भबानी चरण पटनाईक सार्वजनिक सेवाओडिशा
श्री मुरलीकांत पेटकर क्रीडा (जलतरण)महाराष्ट्र
श्री हबिबूल्लो राजबोव (विदेशी)साहित्य व शिक्षणताजिकिस्तान
श्री एम आर राजगोपाल वैद्यकीय (पेलीएटीव्ह केयर)केरळ
श्री संपत रामटेके (मरणोत्तरसामाजिक कार्यमहाराष्ट्र
श्री चंद्र शेखर रथसाहित्य व शिक्षण ओडिशा
श्री एस एस राठोडनागरी सेवागुजरात
श्री अमिताव रॉय विज्ञान व अभियांत्रिकीपश्चिम बंगाल
श्री संदूक रुइट (विदेशीवैद्यकीय (नेत्ररोगशास्त्र)नेपाळ
श्री आर सत्यनारायणा कला (संगीत)कर्नाटक
श्री पंकज शाह वैद्यकीय (ऑनकॉलॉजि)गुजरात
श्री भज्जू श्याम कला (चित्रकला)मध्य प्रदेश
श्री महाराव रघुवीर सिंग साहित्य व शिक्षणराजस्थान
श्री किदम्बी श्रीकांत क्रीडा (बॅडमिंटन)आंध्र प्रदेश
श्री इब्राहिम सुतारकला (संगीत)कर्नाटक 
श्री सिद्वेश्वर स्वामीजी इतर (अध्यात्म)कर्नाटक
श्रीमती लेंटिना आओ ठक्करसामाजिक कार्य  नागालँड
श्री विक्रम चंद्र ठाकूर विज्ञान व अभियांत्रिकी उत्तराखंड
श्री रुद्रपटणम नारायणस्वामी थरनाथन व रुद्रपटणम नारायणस्वामी त्यागराजनकला (संगीत)कर्नाटक
श्री न्गुइन तेन थेन (विदेशी)इतर (अध्यात्म)व्हिएतनाम
श्री भगीरथ प्रसाद त्रिपाठीसाहित्य व शिक्षण  उत्तर प्रदेश
श्री राजगोपालन वासुदेवनविज्ञान व अभियांत्रिकी तामिळनाडू
डॉ मानस बिहारी वर्माविज्ञान व अभियांत्रिकीबिहार
श्री पानतावणे गंगाधर विठोबाजीसाहित्य व शिक्षण महाराष्ट्र
श्री रोम्युलस व्हयटेकरइतर (वन्यजीव संरक्षण) तामिळनाडू
श्री बाबा योगेंद्र कला मध्य प्रदेश
श्री ए झाकियासाहित्य व शिक्षण मिझोरम