महाराष्ट्र किन्नर कल्याण मंडळ असलेले प्रथम राज्य
महाराष्ट्र राज्य शासनाने ५ कोटी रुपयांच्या विशेष निधीसह किन्नर कल्याण मंडळ (Transgender Welfare Board) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.


यासोबतच, किन्नरांच्या कल्याणासाठी विशेष मंडळ असणारा महाराष्ट्र हा देशातला पहिला राज्य ठरणार आहे.


या मंडळाच्या माध्यमातून या समुदायला शिक्षण, रोजगार, घरे आणि आरोग्य योजनांचा लाभ दिला जाणार. महिला व बाल विकास विभागातर्फे मंडळाच्या कार्यासाठी कार्यकारी समिती तयार केली जाणार आणि त्याचे व्यवस्थापन सामाजिक न्याय विभागाकडून केले जाणार.अग्नी-१ क्षेपणास्त्राची उपयोजन चाचणी यशस्वी 
भारताने अण्वस्त्र वहनक्षमता असलेल्या लघुपल्ल्याच्या अग्नी-१ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली असून ओडिशा येथील किनाऱ्यावर हे क्षेपणास्त्र उडवण्यात आले, अशी माहिती संरक्षण सूत्रांनी दिली. क्षेपणास्त्राचा पल्ला सातशे किलोमीटरचा असून, स्वदेशी बनावटीचे हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे आहे.

स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडने संचालनात्मक सिद्धतेसाठी या क्षेपणास्त्राची चाचणी केली असून, व्हीलर बेटांवरील (आताचे डॉ. अब्दुल कलाम बेट) चार क्रमांकाच्या तळावरून हे अत्याधुनिक क्षेपणास्त्र सोडण्यात आले आहे. या चाचणीची सर्व उद्दिष्टे पूर्ण झाली असून ती यशस्वी झाली आहे असे सांगण्यात आले आहे.

रडार, दूरसंवेदन यंत्रणा व प्रकाशीय उपकरणांनी त्याचा मार्ग टिपण्यात आला. लक्ष्य प्रदेशात क्षेपणास्त्राने अचूक मारा केल्याचे स्पष्ट करण्यात आले. अग्नी-१ क्षेपणास्त्रात घन इंधन वापरण्यात आले असून त्यात विशेष दिशादर्शन प्रणाली आहे. तसेच अग्नीची निर्मिती अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लॅबोरेटरीने संरक्षण संशोधन व विकास प्रयोगशाळा यांच्या मदतीने केली आहे.‘ए सेंच्युरी इज नॉट इनफ’ – सौरव गांगुली यांची आत्मकथा
सौरव गांगुली लिखित ‘ए सेंच्युरी इज नॉट इनफ: माय रोलर-कोस्टर राइड टु सक्सेस’ हे आत्मकथन प्रसिद्ध झाले आहे. गौतम भट्टाचार्य यांच्या सहकार्याने त्यांचे हे पहिले पुस्तक आहे. ‘जगरनॉट’ हे प्रकाशक आहेत.

२००२ साली, विस्डेन क्रिकेटर्सच्या ‘अल्मनॅक’ ने गांगुलीना सहाव्या क्रमांकावर क्रम दिला, जो एकदिवसीय क्रिकेटपटूने प्राप्त केलेला आतापर्यंतचा सर्वोत्तम क्रमांक आहे.सौरव गांगुली सध्या बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. लंडन नवी अॅथलेटिक्स विश्वचषक स्पर्धा आयोजित करणार
ब्रिटनच्या लंडन शहरात १४ जुलै आणि १५ जुलै २०१८ रोजी नवी अॅथलेटिक्स विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.

प्रथमच आयोजित केल्या जात असलेल्या या स्पर्धेत ब्रिटनसोबत अमेरिका, चीन, जर्मनी, फ्रान्स, जमैका, दक्षिण आफ्रिका आणि पोलंड या आठ प्रमुख देशांचा सहभाग असणार आहे.

मैदानी खेळाडूंसाठी प्रथमच अशी स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेत सर्व प्रकारचे मैदानी आणि स्त्री कर्णधारांच्या नेतृत्वाखालील संघांसह १५०० मीटर अंतरापर्यंतच्या क्रीडा प्रकारांचा समावेश असेल. स्पर्धेत प्रत्येक राष्ट्रातून निवडलेल्या एक पुरुष आणि एक स्त्री क्रीडापटूला अंतिम फेरीतील अंतिम स्पर्धांत खेळविले जाईल.


मुकेश खन्ना यांचा भारतीय बाल चित्रपट सोसायटीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा
प्रसिद्ध अभिनेता मुकेश खन्ना यांनी भारतीय बाल चित्रपट सोसायटी (CFSI) च्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

मुकेश खन्ना यांचा ३ वर्षांचा कार्यकाळ ता एप्रिलला संपणार होता. त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या कारकि‍र्दीत ‘महाभारत’, ‘शक्तिमान’ अश्या मालिकांमध्ये भूमिका वठवल्या होत्या.

भारतीय बाल चित्रपट सोसायटी (Children’s Film Society India -CFSI) ही भारत सरकारची एक नोडल संस्था आहे, जी विविध भारतीय भाषांमध्ये बाल चित्रपटांची निर्मिती आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करते. याची स्थापना ११ मे १९५५ रोजी मुंबईमध्ये करण्यात आली.नेकनामपूर तलावात भारतातला सर्वात मोठा तरंगता बेट
हैदराबादमधील नेकनामपुर तलावात भारतातला सर्वात मोठा तरंगता बेट तयार करण्यात आला आहे. इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड्सने याला देशातील सर्वात मोठे फ्लोटिंग ट्रीटमेंट वेटलँड (FTW) म्हणून मान्यता दिली आहे.

हैदराबाद नगर विकास प्राधिकरण आणि रंगा रेड्डी जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांनी ‘ध्रुवंश’ या NGO ने हा बेट उभारला आहे. तरंगत्या धर्तीवर ३५०० पाणथळ क्षेत्राचे २५०० चौरस फुट बेट तयार करण्यात आले आहे.

फ्लोटिंग ट्रीटमेंट वेटलँड (FTW) हा कमी माती वापरुन जलधर्मीय तंत्रज्ञानावर आधारित चार थराची भूमी आहे. तरंगते बांबू त्याचा पाया तयार करतात. त्यावर स्टायरोफोम क्युबिकल ठेवलेले आहेत. त्यावरील थर गनीबॅगने तयार केला आहे आणि सर्वात वरचा थर खडकाळ आहे. 

याप्रकारामुळे वनस्पती सूर्यप्रकाशात आणि पाण्यात वाढतात.
या कृत्रिम बेटावर विविध प्रकारच्या वनस्पतींना वाढविण्यात आल्या आहेत, ज्या पाण्यातील प्रदूषणाला कमी करण्यासाठी मदत करतात. या तलावामधील पाण्याची गुणवत्ता बहाल करून जलजीवनासाठी समृद्ध वातावरण तयार करणे हा यामागचा उद्देश्य आहे.भारत-संयुक्त राष्ट्रसंघ विकास भागीदारी कोषामध्ये $1 दशलक्षचे योगदान
भारताने दक्षिण-दक्षिण सहयोगासाठी भारत-संयुक्त राष्ट्रसंघ विकास भागीदारी कोषामध्ये अतिरिक्त $1 दशलक्ष ची गुंतवणूक केली आहे. इतर विकसनशील देशांबरोबर आपली भागीदारी वाढविण्यासाठी हे योगदान केले गेले आहे.

भारत-संयुक्त राष्ट्रसंघ विकास भागीदारी कोष संयुक्त राष्ट्रसंघ दक्षिण-दक्षिण सहकार्य कार्यालय (UNOSSC) कडून व्यवस्थापित केला जातो. जून २०१७ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या या कोषामध्ये $100 दशलक्ष रकमेचे योगदान देण्याची बांधलकी भारताने दर्शविलेली आहे आणि यात आतापर्यंत $6 दशलक्षचे योगदान दिलेले आहे. हा कोष कमी विकसित देश आणि छोट्या बेटावरील विकसनशील देशांसाठी वापरला जातो.