चालू घडामोडी १ फेब्रुवारी २०१८

चालू घडामोडी १ फेब्रुवारी २०१८

सुपर-ब्ल्यू-ब्लड मून 
खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून आणि ब्ल्यूमून असा खास तिहेरी नजराणा आकाशात पाहायला मिळाला आहे. हा दुर्मिळ योग पाहणं खगोलप्रेमींसाठी पर्वणी असणार आहे. 



यापूर्वी १५२ वर्षांपूर्वी म्हणजेच ३१ मार्च १८६६ रोजी असा तिहेरी योग जुळून आला होता. २०१८ नंतर ३१ जानेवारी २०३७ मध्ये ‘सुपर-ब्ल्यू-ब्लड मून’ पाहाण्याचा तिहेरी योग येणार आहे.

या काळात चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ येतो म्हणून चंद्रबिंब आकाराने मोठे दिसते. 
आजच्या दुर्मिळ योगात ‘ब्ल्यू मून’ ही दिसणार आहे पण, गंमत म्हणजे यादिवशी चंद्र निळ्या रंगाचा दिसत नाही. एका महिन्यात जेव्हा दोन पौर्णिमा येतात तेव्हा दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्रास ‘ब्ल्यूमून’ असं म्हटलं जातं.

बुधवारी सूर्य नेहमीपेक्षा १४ % मोठा आणि ३० % अधिक प्रकाशमान दिसला.

चंद्रबिंब लाल, तपकिरी रंगात पाहाण्याचा योग आला. या स्थितीला ‘ब्लड मून’ म्हटले जाते. खग्रास स्थितीमध्ये संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने चंद्रबिंब लाल दिसते.

खगोल शास्त्रज्ञांनी याला ‘स्नो ब्लू सुपर रायझिंग, कॉपर टोटल लुनार एक्लिप्स’ असं नाव दिलं आहे

२६ मे २०२१ रोजी सुपरमून आणि चंद्रग्रहण असा दुहेरी योग येणार आहे



कर्नाटकात शाळांमध्ये कन्नड भाषा सक्तीस १० फेब्रुवारीची डेडलाईन
कर्नाटकात कन्नड विषय सक्तीबाबत शिक्षण खात्याने राज्यातील खासगी शाळांना १० फेब्रुवारीपर्यंतची डेडलाईन दिली आहे. 

सीबीएसई व आयसीएसईला संलग्न असलेल्या तसेच राज्याचा अभ्यासक्रम शिकविणाऱ्या राज्यातील सर्वच खासगी शाळांना कन्नड विषयाची सक्ती कर्नाटक सरकारने केली आहे. 

पुढील शैक्षणिक वर्षापासून या शाळांमधील विद्यार्थ्यांना कन्नड विषय शिकवावा लागेल. या शाळा कन्नड विषय शिकविणार की नाही हे शिक्षण खात्याला कळविण्यासाठी १० फेब्रुवारीची डेडलाईन देण्यात आली आहे. 

कन्नड भाषा अध्ययन कायद्यातील तरतुदीचा आधार घेऊन कर्नाटक शासनाने राज्यातील सर्व खासगी शाळांमधील पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना कन्नड विषय शिकविण्याची सक्ती केली आहे. 

प्रथम किंवा द्वितीय भाषा म्हणून हा विषय तेथे शिकवावा लागणार आहे. शिक्षण खात्याने राज्यातील सर्व खासगी शाळांना ‘स्टुडंट्‌स अचिव्हमेंट ट्रॅकिंग सिस्टम’ या प्रणालीचा वापर करून त्यात विद्यार्थ्यांच्या नावासमोर कन्नड विषय प्रथम किंवा द्वितीय भाषा म्हणून निवडल्याची नोंद करण्यास सांगितले. 

त्या माहितीच्या आधारे पुढील शैक्षणिक वर्षात कन्नड विषयाची किती पुस्तके मुद्रित करावी लागणार हे निश्‍चित केले जाणार आहे.


पंतप्रधानांच्या हस्ते ‘खेलो इंडिया’ शालेय खेळांचा शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३१ जानेवारी २०१८ रोजी नवी दिल्लीत प्रथम ‘खेलो इंडिया’ शालेय खेळांचे उद्‌घाटन करण्यात आले आहे.
खेलो इंडिया शालेय खेळांमध्ये १९९ सुवर्ण, १९९ रौप्य आणि २७५ कांस्य पदकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे.

एप्रिल २०१६ मध्ये भारत सरकारने देशात क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी ‘खेलो इंडिया’ ही नवीन योजना सुरू केली होती.

 समाजाच्या अगदी तळ पातळीवर बदल करून राष्ट्रव्यापी क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नियोजित ३१ जानेवारी २०१८ पासून सुरु होणार्‍या ‘खेलो इंडिया शालेय खेळ’ यांच्या प्रथम संस्करणात जवळपास ६००० खेळाडू आणि अधिकारी भाग घेतील. 

स्पर्धांमधून निवडण्यात येणार्‍या सर्वश्रेष्ठ प्रतिभावंत खेळाडूंना आठ वर्षापर्यंत दरवर्षी प्रत्येकी पाच लक्ष रुपये शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार, जी १००० उदयोन्मुख खेळाडूंसाठी निश्चित करण्यात आलेली आहे. 

वर्षागणीक खेळाडूंना ‘खेलो इंडिया’ अंतर्गत जोडण्यात येणार. क्रीडा स्पर्धा आणि शिक्षण अश्या दोन्ही प्रकारे खेळाडूंना सहभाग घेता येईल अशा देशभरातल्या २० विद्यापीठांना सर्वोत्कृष्ट क्रीडा केंद्र म्हणून प्रोत्साहन देणार. 

मोठ्या राष्ट्रीय शारीरिक आरोग्यसंबंधी कार्यक्रमामधून १०-१८ वर्षे वयोगटातील २०० दशलक्ष लहान मुला-मुलींना या कार्यक्रमात समाविष्ट केले जाईल. शालेय खेळांमध्ये तीरंदाजी, अॅथलेटिक्‍स, बॅडमिंटन, बास्‍केटबॉल, मुष्टियुद्ध, फुटबॉल, जिमनॅस्टिक्‍स, हॉकी, जूडो, कबड्डी, खो-खो, नेमबाजी, जलतरण, वॉलीबॉल, भारोत्‍तोलन आणि कुस्ती यासारख्या १६ क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे.



डॉ. विनोद पॉल यांना ‘इहसान डोग्रामकी फॅमिली हेल्थ फाऊंडेशन परितोषिक’ जाहीर
NITI आयोगाचे सदस्य डॉ. विनोद पाल यांची WHO कडून ‘इहसान डोग्रामकी फॅमिली हेल्थ फाऊंडेशन’ पारितोषिकासाठी निवड झाली आहे.
यासोबतच, डॉ. विनोद पाल हा जागतिक सन्मान मिळवणारे पहिले भारतीय ठरले असून कौटुंबिक आरोग्य क्षेत्रातल्या त्यांच्या योगदानासाठी त्यांना या पारितोषिकाने गौरवण्यात येणार आहे. पारितोषिक मे 2018 मध्ये जिनेव्हा येथे प्रदान केला जाईल.

डॉ. विनोद पॉल हे कौटुंबिक आरोग्य क्षेत्रात विशेषत: नवजात शिशू आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रित करणारे आंतरराष्ट्रीय विख्यात संशोधक आहेत. भारतात राष्ट्रीय बाल आरोग्य मार्गदर्शक तत्त्व आणि कार्यक्रम आखण्यात त्यांची मोलाची भूमिका राहिलेली आहे
Scroll to Top