स्टार अलायन्सचा २० वा वर्धापनदिन 
एअर इंडिया आणि स्टार अलायन्सच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्लीतील एअर इंडियाच्या मुख्यालयात स्टार अलायन्सचा २० वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला आहे. 


जगातील २० एअरलाईन्स कंपन्या स्टार अलायन्सच्या सदस्य आहेत तर भारतीय उपखंडात फक्त एअर इंडिया हीच एकमेव कंपनी तिची सदस्य आहे. १९७४
 मध्ये स्टार अलायन्सची स्थापना करण्यात आली होती.

आतापर्यंत या अलायन्सला अनेक जागतिक कीर्तीचे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यात बिझनेस ट्रॅव्हलर मॅगझिन आणि स्कायट्रॅक्सतर्फे दिला जाणारा एअर ट्रान्सपोर्ट वर्ल्ड मार्केट लीडरशिप अवॉर्ड आणि सर्वोत्कृष्ट एअरलाईन अवॉर्ड समावेश आहे. 



राष्ट्रपतींच्या हस्ते ‘महामस्तक अभिषेक महोत्सव २०१८’ चे उद्घाटन
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते श्रवणबेलागोला येथे ७ फेब्रुवारी २०१८ पासून सुरू होणार्‍या गोमातेश्वर भगवान श्री बाहुबली स्वामी यांच्या ‘महामस्तक अभिषेक महोत्सव २०१८’ चे उद्घाटन करण्यात आले आहे.
महामस्तक अभिषेक महोत्सव हा जैन संप्रदायाचा दरवर्षी भारतात होणारा एक मुख्य सांस्कृतिक कार्यक्रम आहे.



‘प्रधानमंत्री संशोधन शास्त्री (PMRF)’ योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता
केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘प्रधानमंत्री संशोधन शास्त्री (Prime Minister Research Fellows -PMRF)’ योजना देशात राबविण्यास मान्यता दिली आहे.

योजनेच्या अंमलबजावणीसाठी वर्ष २०१८-१९ पासून ७ वर्षांच्या कालावधीसाठी १६५० कोटी रूपयांच्या एकूण खर्चाची तरतूद करण्यास देखील मान्यता दिली. वर्ष २०१८-१९ पासून तीन वर्षांमध्ये कमाल ३००० शास्त्रींची निवड केली जाणार.

संशोधकांना फेलोशिप (संशोधन शिष्यवृत्ती) प्रदान करून देशात अभिनवतेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री संशोधन शास्त्री (PMRF) योजनेंतर्गत IISc/IIT/NIT/IISER/ IIIT मधून विज्ञान व तंत्रज्ञान विषयांमध्ये बी.टेक. अथवा एकीकृत एम.टेक. अथवा MSc पदवी प्राप्त करणार्‍याला अथवा अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात असलेल्या सर्वोत्‍तम विद्यार्थ्यांना IIT/IISc मध्ये PhD कार्यक्रमामध्ये थेट प्रवेश दिले जाणार. 

त्यांना प्रथम २ वर्षांसाठी मासिक ७०००० रूपये, तिसर्‍या वर्षी मासिक ७५००० रूपये तर चौथ्या व पाचव्या वर्षी मासिक ८०००० रूपये शिष्यवृत्ती दिली जाणार.


बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालेदा झिया यांना ५ वर्षांचा तुरुंगवास
बेगम खालेदा झिया या दोन वेळेस बांगलादेशच्या पंतप्रधान राहिल्या आहेत तर ‘झिया अनाथआश्रमा’ साठी मिळालेल्या परदेशी देणग्यांच्या रकमेत अपहार केल्याप्रकरणी दोषी ठरल्या आहेत. यासाठी ढाक्यातील कोर्टाने त्यांना ही शिक्षा सुनावली. 

या प्रकरणात झिया यांचा मुलगा तारिक रहमान आणि इतर चार जणांना १० वर्षांसाठी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.



अमेरिकेतील नॅन्सी पेलोसी यांनी मोडला भाषणाचा १०८ वर्षांचा विक्रम
अमेरिकेत ज्येष्ठ डेमोक्रॅटिक खासदार नॅन्सी पेलोसी यांनी सभागृहात प्रदीर्घ भाषणाचा विक्रम केला आहे. तर पेलोसी यांनी कागदपत्रे नसलेल्या युवा प्रवासी नागरिकांच्या मुद्द्यावर ८ तास ७ मिनिटे भाषण केले आहे. 

त्याचबरोबर त्यांनी सभागृहात भाषण देण्याचा १०९ वर्षांचा जुना विक्रम मोडला आहे.

अमेरिकेच्या संसदेत याआधी १९०९ मध्ये रिपब्लिकन पक्षाचे नेते चॅम्प क्लार्क यांनी ५ तास १५ मिनिटे भाषण केले होते. 



पारा संदर्भात असलेल्या ‘मिनामाटा करार’ याच्या प्रमाणिकरणास मान्यता
केंद्रीय मंत्रिमंडळाने पारा (धातूपदार्थ) संदर्भात असलेल्या ‘मिनामाटा करार’ याच्या प्रमाणिकरणास मान्यता दिली आहे. या कराराच्या प्रमाणिकरणानंतर भारत कराराचा भाग बनणार.

पारा धातुमुळे उद्भवणार्‍या धोक्यांना दूर करण्यासाठी आणि या धातुला वापरातून हद्दपार करण्यासाठी १० ऑक्टोबर २०१३ रोजी जपानच्या कुमामोतो शहरात आयोजित परिषदेत ‘
मिनामाटा करार‘ स्वीकारण्यात आला. 

पारामुक्त पर्यायांना अंगिकारण्यास आणि आपल्या निर्माण पद्धतींमध्ये पारा-मुक्त तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे.

करारांतर्गत पारा आधारित उत्पादने आणि पारा संयुगासंबंधी प्रक्रिया उपयोगात आणण्यास वर्ष २०२५ पर्यंत कालावधी मर्यादित केले जातील. पारा आणि पार्‍याची संयुगे यांच्या उत्सर्जनाने उद्भवणार्‍या पर्यावरणासंबंधी धोक्यांना दूर करण्याच्या उद्देशाने हा करार झालेला आहे.