अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या बायोडेटाचा लिलाव होणार 
अॅपल या सुप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी चार दशकांपूर्वी म्हणजेच 1973 मध्ये एका कंपनीला पाठवलेला बायोडेटा पुढील महिन्यात लिलावात निघणार आहे.


हा बायोडेटा मिळवण्यासाठी किमान 50 हजार डॉलरपासून पुढे बोली लावण्यात येईल असा अंदाज लिलावकर्त्यांनी लावला आहे.

स्टीव्ह जॉब्स यांच्या बायोडेटाचा लिलाव 8 ते 15 मार्च दरम्यान होईल.बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे आकस्मिक निधनसौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनय यांच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीत आपली स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री ‘श्रीदेवी’ यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्या 54 वर्षांच्या होत्या.

आपल्या अभिनय शैलीच्या जोरावर श्रीदेवीने 1979 साली ‘सोलावा सावन’ या चित्रपटातुन आपल्या हिंदी अभिनय कारकिर्दिची सुरवात केली होती.मध्यप्रदेशात राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचा शुभारंभमध्यप्रदेशात 24 फेब्रुवारीला ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत ‘राष्ट्रीय संस्कृती महोत्सव’ याचा शुभारंभ करण्यात आला आहे.

7 दिवस चालणार्‍या या कार्यक्रमाचे आयोजन मध्यप्रदेश, नागालँड आणि मणीपुर राज्यांच्या मदतीने केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने केले आहे.

कार्यक्रमात शास्त्रीय आणि लोकसंगीत आणि नृत्य, रंगभूमी ते साहित्य आणि दृश्य कला या कलाकृतींचा अंतर्भाव आहे.‘शाश्वत शहरी विकास कार्यक्रम – भारतात स्मार्ट शहरे’ प्रकल्पासाठी जर्मनीसोबत करार‘शाश्वत शहरी विकास कार्यक्रम – भारतात स्मार्ट शहरे’ प्रकल्पामध्ये तांत्रिक सहकार्यासाठी भारत आणि जर्मनी यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात आला आहे.

कार्यक्रमाचा उद्देश असा की निवडक आणि स्मार्ट शहरांमध्ये शहरी पायाभूत सेवा आणि घरांच्या उपलब्‍धतेसाठी उपयुक्‍त संकल्पना विकसित करणे आणि त्यांना लागू करणे हा आहे.

‘शाश्वत शहरी विकास कार्यक्रम – भारतात स्मार्ट शहरे’ प्रकल्पामध्ये जर्मनी 80 लाख यूरोची आर्थिक मदत देत आहे. हा प्रकल्प तीन वर्षांच्या कालावधीसाठी चालविला जाणार

स्वदेशी ‘धनुष’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीभारताने 23 फेब्रुवारीला ओडिशा किनार्‍याजवळून नौदलाच्या एका जहाजावरून अण्वस्त्रवाहू ‘धनुष’ लक्ष्यवेधी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी केली.

‘धनुष’ क्षेपणास्त्राची मारक क्षमता 350 किलोमीटरपर्यंतची आहे. हे पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. क्षेपणास्त्र 500 किलोग्रामपर्यंत युद्धसामुग्री वाहून नेऊ शकण्यास सक्षम आहे. 

एक टप्प्याचे द्रव्य इंधनाने चालणारे हे क्षेपणास्त्र एकात्मिक निर्देशित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम (IGMDP) अंतर्गत संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) ने विकसित केले आहे.चेन्नईमध्ये ‘अम्मा टू-व्हीलर’ योजनेचा शुभारंभपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या जयंतीनिमित्त चेन्नईमध्ये ‘अम्मा टू-व्हीलर’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे.

राज्य शासनाने स्त्रियांसाठी ‘अम्मा टू-व्हीलर’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत स्त्रियांना टू-व्हीलर खरेदीवर 25,000 रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.‘तापी’ गॅस पाइपलाइन प्रकल्पाच्या अफगाणिस्तानमधील भागाचे भूमिपूजन23 फेब्रुवारीला तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत यांच्या महत्त्वाकांक्षी ‘तापी’ गॅस पाइपलाइन प्रकल्पाच्या अफगाणिस्तानमधील भागाचे भूमिपूजन करण्यात आले आहे.

तापी गॅस पाइपलाइन प्रकल्प हा दक्षिण आणि मध्य आशियातील आर्थिक संबंधाचा प्रमुख आधारस्तंभ आहे. तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान, भारत आणि पाकिस्तान यांना नैसर्गिक वायूचा पुरवठा करण्यासाठी 1,840 किलोमीटर लांबीची पाइपलाइन तयार केली जात आहे. 

यामधून वर्षाला जवळजवळ 33 अब्ज घनमीटर वायूचा पुरवठा होणार. प्रकल्पामुळे नैसर्गिक वायू पाठविण्यासाठी तुर्कमेणिस्तानमधून भारतात अशी दक्षिण आशियाची ऊर्जा मागणी पूर्ण करण्यास मदत होणार