२९ मार्चला ISRO GSAT-6A अंतराळात पाठवणार 
२९ मार्चला भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतराळात आपला GSAT-6A उपग्रह पाठवणार आहे. श्रीहरिकोटा स्थित अंतराळ केंद्रावरून हा उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे.


GSAT-6A उपग्रह एक उच्च-शक्ती S-बॅंड संपर्क उपग्रह आहे. उपग्रह GSLV-F08 अग्निबाणाच्या सहाय्याने पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केले जाणार. या उपग्रहाची आयुर्मर्यादा १० वर्षांची असेल. 

हा उपग्रह S-बॅंड अनफर्लेबल अॅंटेना, पृथ्वीवरील केंद्र आणि नेटवर्क व्यवस्थापन तंत्रज्ञानाने सुसज्जित आहे. हा उपग्रह मोबाइल संपर्काच्या क्षेत्रात उपयोगात आणला जाणार आहे.

GSAT (geosynchronous satellite/जीसॅट) हे उपग्रह भारताच्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) कडून विकसित करण्यात आलेला उपग्रह आहे. हा मुख्यतः चलचित्रांचे प्रक्षेपण, माहितीचे दळणवळण याकरिता उपयोगात आणला जातो. GST पृथ्वीच्या 3500 किलोमीटर अंतरावर असलेल्या भूस्थिर कक्षेत पाठवले जाते.



लंडन स्थित SACF संस्थेला २०१७ सालचा ‘फ्रेडरिक पिंकोट पुरस्कार’ 
लंडनमधील साऊथ एशियन सिनेमा फाऊंडेशन (SACF) संस्थेला २०१७ सालच्या ‘फ्रेडरिक पिंकोट पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आले आहे.

हा पुरस्कार लंडनमधील भारतीय उच्चायुक्त वाय. के. सिन्हा यांच्या हस्ते दिला गेला. गेली १८ वर्ष ब्रिटनमध्ये हिंदी चित्रपटाला प्रोत्साहन देण्यात योगदान दिल्याकारणाने हा पुरस्कार दिला गेला.

साऊथ एशियन सिनेमा फाऊंडेशन (SACF) संस्थेची स्थापना लंडनमध्ये जानेवारी २००० मध्ये ललित मोहन जोशी, पी. ​​के. नायर, डेरेक माल्कम आणि कुसुम पंत जोशी यांनी केली.


UNESCO च्या कार्यकारी मंडळात भारताचे प्रतिनिधी म्हणून प्रा. जे. एस. राजपूत यांचे नामांकन 
भारत सरकारकडून NCERT चे माजी संचालक प्रा. जे. एस. राजपूत यांचे संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) याच्या कार्यकारी मंडळात भारताचे प्रतिनिधी म्हणून नामांकन देण्यात आले आहे. प्रा. राजपूत हे एक सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ आहेत.

UNESCO याच्या कार्यकारी मंडळात ५८ जागा असतात आणि त्यांचा कार्यकाळ ४ वर्षांचा असतो. कार्यकारी मंडळ UNESCO याचा एक संवैधानिक अंग आहे, ज्याची निवड संयुक्त राष्ट्रसंघ आमसभेकडून केली जाते. मंडळ संघटनेच्या कार्यांचे आणि त्याशी जुळलेल्या अर्थसंकल्प अंदाजपत्रकाची समीक्षा करते.

संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही फ्रांसची राजधानी पॅरिस शहरात स्थित संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे. 

या संघटनेची स्थापना १६ नोव्हेंबर १९४५ रोजी लंडन (ब्रिटन) येथे करण्यात आली. UNESCO मध्ये १९५ सदस्य राज्ये/राष्ट्रे आहेत आणि १० सहकारी सदस्य आहेत.



‘सिम्फनी ऑफ द सी’ जगातले सर्वात मोठे क्रूज जहाज 

सिम्फनी ऑफ द सी हे जगातले सर्वात मोठे क्रूज जहाज प्रवाश्यांच्या सेवेत आणले गेले आहे.

फ्रेंच जहाजनिर्मात्या STX ने अमेरिकेच्या रॉयल कॅरिबियन इंटरनॅशनल कंपनीकडे हे जहाज सुपूर्द केले. जहाजाचे वजन २२८००० टन आहे. या जहाजाची लांबी ३६२ मीटर आहे, जी की एम्पायर स्टेट बिल्डिंगच्या लांबीच्या फक्त २० मीटर कमी आहे. 

जहाजावर एक आइस रिंक, वॉटर पार्क आणि पूर्ण स्वरुपात बास्केटबॉल कोर्ट आणि २७०० खोल्या आहेत. हे जहाज २२०० कर्मचार्‍यांसह एकूण ८००० लोकांना वाहून नेण्यास सक्षम आहे.

या सागरी प्रवासी जहाजाने भूमध्य समुद्रातील आपल्या पहिल्या स
फरीची सुरुवात करण्यासाठी फ्रान्समधील सेंट-नझीरचे शिपयार्ड सोडले