आता नंबर प्लेटसह मिळणार वाहन 
वाहन कंपन्यांकडून लवकरच नंबर प्लेट असलेल्या कार बाजारात येणार आहेत. वाहनांच्या किंमतीत नंबर प्लेटसाठीचा खर्चाचाही समावेश असेल, अशी माहिती केंद्रीय रस्ते, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ही लायसन्स प्लेट ज्याला नंबर प्लेट म्हटले जाते. वाहनाची नोंद झाल्यानंतर संबंधित विभागाकडून हा क्रमांक दिला जातो.


गडकरी म्हणाले की, आम्ही हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता वाहन उत्पादकच प्लेट लावून देतील त्यावर नंतर मशीनच्या साहाय्याने अक्षरं उमटवण्यात येतील. कारच्या किंमतीत याच्या खर्चाचा समावेश केला जाईल. यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल. 

सध्या संबंधित राज्यातील जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवाहन विभागाकडून (आरटीओ) हे क्रमांक दिले जातात. वाहनांच्या सुरक्षेबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. वाहन स्वस्त असो किंवा महाग सर्वांसाठी नियम समान असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.एम एल श्रीवास्तव – ललित कला अकादमीचे अस्थायी अध्यक्ष 
संस्कृती मंत्रालयातले संयुक्त सचिव (अकादमी) एम. एल. श्रीवास्तव यांची ललित कला अकादमीचे अस्थायी अध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली आहे. नियमित अध्यक्ष नियुक्त होईपर्यंत ते पदावर असतील.

ललित कला अकादमी (Lalit Kala Akademi) ही एक स्वायत्त संस्था आहे, ज्याची ५ ऑगस्ट १९५४ रोजी भारत सरकारकडून स्थापना करण्यात आली. ही एक केंद्रीय संस्था आहे, जी भारत सरकारच्यावतीने मूर्तिकला, चित्रकला, ग्राफकला, गृहनिर्माणकला आदी. ललित कला क्षेत्रात कार्य करण्यासाठी स्थापित केले गेले होते.


ई-वे बिल यंत्रणा १ एप्रिलपासून देशभरात लागू 
वस्तू व सेवा कर (GST) प्रणाली अंतर्गत मोटर मालवाहकांसाठी आंतर-राज्य मालवाहतुकीसाठी आवश्यकइलेक्ट्रॉनिक वे बिल (e-way bill) यंत्रणेचा वापर १ एप्रिल २०१८ रोजी देशभरात लागू करण्यात आला आहे.

१ एप्रिल २०१८ पासून ‘ई-वे’ बिल यंत्रणेमधून ५०००० रुपयांहून अधिक किंमतीचा माल एका राज्यातून दूसर्‍या राज्यात पाठविण्याआधी त्याची ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक असणार आहे. 

‘ई-वे’ बिल व्यवस्था कारखान्यातून निघालेले उत्पादन आणि आंतरराज्य वाणिज्य कार्यपद्धती यावर इलेक्ट्रॉनिकरीत्या पाळत ठेवण्याप्रमाणे काम करणार, ज्यामुळे मालाच्या खपासंबंधी माहितीमधून धोरण-निर्मात्यांना उपयुक्त मदत होणार.

इलेक्ट्रॉनिक मार्गाने बिल अदा करण्याची ही व्यवस्था १६ जानेवारी २०१८  पासून उपलब्ध आहे आणि राज्य स्वैच्छिक आधारावर जूनच्या आधी याला स्वीकारू शकतात. ई-वे बिल व्यवस्थेमुळे आता तपास नाक्याची व्यवस्था देखील समाप्त करण्यात आली आहे.

वस्तू व सेवा कर (GST) हा एक अप्रत्यक्ष कर आहे, जो 1 जुलै 2017 पासून संपूर्ण भारतात लागू करण्यात आला, ज्याने केंद्र व राज्य शासनांनी आकारलेल्या विविध करांचा त्याग केला. 

संविधान (१०१ वी दुरूस्ती) कायदा २०१७  म्हणून GST सादर करण्यात आले. GST हे GST परिषदेद्वारे संचालित केले जाते आणि त्याचे अध्यक्ष भारताचे वित्तमंत्री आहेत. 

GST अंतर्गत वस्तू व सेवांवर ०%, ५%, १२%, १८% आणि २८% या दरांनी कर लागू आहेत. फ्रान्स हा GST ची अंमलबजावणी करणारा जगातला पहिला देश आहे.ओडिशाचा ८२ वा स्थापना दिवस साजरा 
१ एप्रिल २०१८ रोजी ओडिशाने ‘उत्कल दिन’ म्हणून आपला ८२ वा स्थापना दिवस साजरा केला आहे.

१ एप्रिल १९३६ रोजी ओडिशा अस्तित्वात आले. हा पहिला राज्य आहे, जो भाषिक आधारावर तयार करण्यात आला होता.शास्त्रज्ञांनी सूज, जळजळ कमी करण्याचा मार्ग शोधला 
शास्त्रज्ञांना असा शोध लागला आहे की, ‘इटाकोनेट’ नामक ग्लुकोजपासून वेगळा होणारा रेणू संक्रमणाच्या जागी आढळणार्‍या मॅक्रोफेजेस (मोठ्या फेगोसायटीक पेशी) पेशीला निकामी करण्यास एक शक्तिशाली घटक म्हणून काम करतो.

आयर्लंडच्या डब्लिन येथील ट्रिनिटी महाविद्यालयातील शास्त्रज्ञांनी हा शोध लावला आहे.

मॅक्रोफेजेस या रोगप्रतिकारक प्रणालीतील पेशी बहुतेक प्रक्षोभक (सूज, जळजळ) आजारांचे मुख्य कारण असतात. शास्त्रज्ञांना शरीरात एका नवीन चयापचय प्रक्रियेदरम्यान तयार होणारा आणि सूज कमी होण्यासाठी कारणीभूत ठरणारा ‘इटाकोनेट’ आढळून आला आहे.