आसाममध्ये ‘अटल अमृत अभियान’चा शुभारंभ 
१९ एप्रिल २०१८ रोजी गुवाहाटीमध्ये आयोजित एका समारंभात आसाम राज्य शासनाच्या ‘अटल अमृत अभियान’ या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.


राज्यातल्या ३.२ कोटी लोकांना गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी ही मोहीम आखण्यात आली आहे. मोहीमेंतर्गत उपचारांसाठी सहा विशेष प्रक्रियांसह ४३८ प्रक्रिया मंजूर करण्यात आलेल्या आहेत. 

कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंड रोग, मज्जासंस्थेसंबंधीचा विकार, नवजात रोग आणि दाह अश्या ६ आजारांसाठी राज्य शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे.



मध्यप्रदेशला ‘मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेट’ पुरस्कार घोषित 
मध्यप्रदेश राज्याची निवड ‘मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेट’ पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. ३ मे २०१८ रोजी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे.

शिवाय, चित्रीकरणासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने उचललेल्या प्रयत्नांच्या सन्मानार्थ उत्तराखंडराज्याला ‘विशेष उल्लेखणीय प्रमाणपत्र’ देण्यात आले आहे.

‘मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेट’ पुरस्कार ही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधली एक श्रेणी आहे. हा पुरस्कार चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी राज्य शासनाकडून अनुकूल अश्या सुविधा प्रदान होणार्‍या राज्याला दिला जातो.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा भारतीय चित्रपट सृष्टीत भारत सरकारकडून दिला जाणारा प्रतिष्ठित असा प्रमुख पुरस्कार आहे. हे पुरस्कार १९५४ सालापासून दिले जात आहेत. 

सुवर्ण कमळ आणि रजत कमळ असे दोन पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपटाना देण्यासोबतच बाकीचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, चित्रपटाच्या इतर कलात्मक आणि तांत्रिक अंगांसाठी दिले जातात.



केंद्र शासनाने संरक्षण नियोजन समिती तयार केली 
देशाच्या संरक्षण नियोजनामध्ये बदल घडविण्यासाठी भारत सरकारने एका संरक्षण नियोजन समिती (DPC)ची स्थापना केली आहे.

या समितीचे अध्यक्ष राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल हे असतील. समितीत तीनही संरक्षण दलांचे सेवा प्रमुख आणि संरक्षण, खर्च आणि परराष्ट्र विभागांचे सचिव आहेत. 

दक्षिण विभागाच्या बाहेर संरक्षण मंत्रालयाची धोरणे आणि निर्णय प्रक्रिया तयार करण्यासाठी प्रथमच एक यंत्रणा तयार केली जाणार आहे.

३४ तंत्रज्ञान कंपन्यांनी ‘सायबर सुरक्षा तंत्रज्ञान करार’ वर स्वाक्षर्‍या केल्या 
जगभरातील आघाडीच्या ३४ तंत्रज्ञान आणि सुरक्षा कंपन्यांनी ‘सायबर सुरक्षा तंत्रज्ञान करार’ (Cybersecurity Tech Accord) यावर स्वाक्षर्‍या केल्या आहेत.

मायक्रोसॉफ्ट आणि फेसबुक यासारख्या दिग्गज कंपन्यांनी लोकांना सायबर हल्ल्यांपासून वाचविण्यासाठी हा करार केला आहे. या कंपन्या देशाच्या सरकार तसेच नागरिक व उपक्रमांना सायबर हल्ल्यापासुन सुरक्षा बहाल करणार. 

या ३४ कंपन्यांमध्ये सिस्को, HP, नोकिया, ओरॅकल, व्हीएमवेअर, डेल, CA टेक्नॉलॉजीज, सिमेंटेक, बिटडिफंडर, एफ-सिक्युअर, RSA आणि ट्रेंड मायक्रो आणि अन्य कंपन्यांचा समावेश आहे






जागतिक कर्ज पातळीने उच्चांक गाठला: IMF
प्रगत आणि उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये सार्वजनिक कर्जासह एकूणच जागतिक कर्जाने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे.


जागतिक कर्ज सन २०१६ मध्ये USD 164 लक्ष कोटी (जागतिक GDPच्या तुलनेत जवळजवळ २२५% इतके) एवढ्यावर पोहचले. गेल्या दहा वर्षांमध्ये बहुतांश कर्ज प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये असले तरीही उदयोन्मुख बाजारपेठा या परिस्थितीसाठी सर्वात जास्त जबाबदार आहेत. 


प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये GDP च्या १०५% पेक्षा जास्त सरासरी ‘कर्ज/GDP’ गुणोत्तर आहे. गेल्या पाच वर्षांत जागतिक वृद्धी GDP च्या १३% इतकी आहे.


उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये कर्जाचे प्रमाण सरासरी GDP च्या ५०% पर्यंत आहे, जेव्हा की कमी उत्पन्न असलेल्या विकसनशील देशांसाठी हे प्रमाण ४४% आहे. कमी उत्पन्न असलेल्या ४०% देशांच्या अर्थव्यवस्था सध्या उच्च धोक्यात आहेत. चीनने सन २००७ पासून या वाढीमध्ये ४३% योगदान दिले आहे.


२०१८ ते २०२३ या कालावधीत कर्जाचे प्रमाण तीन-पंचमांश कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आणि सुमारे दोन-तृतियांश उदयोन्मुख अर्थव्यवस्थेत घटणार, असा IMF चा अंदाज आहे. 


IMF ने देशांना अशी धोरणे टाळण्याचा सल्ला दिला आहे, ज्यामुळे आर्थिक चढ-उतार वाढते. देशांना भक्कमपणे जोखीम हाताळण्यासाठी चांगली सार्वजनिक वित्तव्यवस्था उभारण्याचा सल्ला दिला आहे.






जागतिक यकृत दिन १९ एप्रिल
दरवर्षी १९ एप्रिल रोजी ‘जागतिक यकृत दिन’ पाळला जातो. शरीरातील दुसऱ्या सर्वात मोठ्या अवयवाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांच्या नेतृत्वात हा दिन जगभरात पाळला जातो.


हिपॅटायटीस-अ, ब, क, मद्य आणि अमली पदार्थ यामुळे यकृतासंबंधी आजार होऊ शकतात. अमली पदार्थ, दूषित अन्न आणि पाण्याच्या सेवनाने आणि असुरक्षित लैंगिक संपर्कामुळे यकृतासंबंधी आजार बळावतात.