जागतिक वसुंधरा दिन २२ एप्रिल 
जगभरात २२ एप्रिल २०१८ ला ‘जागतिक वसुंधरा दिन’ (World Earth Day) पाळला जात आहे. यावर्षी ‘एंड प्लास्टिक पोल्युशन’ या विषयाखाली या दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.


पहिला जागतिक वसुंधरा दिन अमेरिकेतले गेलार्ड नेल्सन यांच्या नेतृत्वात १९७० साली पाळला गेला होता. या दिनी पृथ्वीच्या संवर्धनासाठी सर्व नागरिक एकत्र येतात आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. हा दिवस ‘अर्थ डे नेटवर्क’ या संघटनेच्या नेतृत्वात आयोजित केला जातो.



लहानांवर बलात्कार करणार्‍यांना मृत्यूदंड देणारा अध्यादेश मंत्रिमंडळाकडून मंजूर 
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्यात (Protection of children from Sexual Offenses Act -POCSO) बदल करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, १२ वर्षाखालील वय असलेल्या मुला-मुलींवर बलात्कार करणार्‍याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाऊ शकते.

अध्यादेशात १६ वर्षांखालील मुलींवरील बलात्काराच्या घटनांमधील दोषींना कठोर शिक्षा करणे आणि १२ वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना जन्मठेपेची किंवा मृत्युदंडाची शिक्षा देण्याची तरतूद असेल.

सुधारानुसार, १६ वर्षाखालील मुलीवर बलात्काराच्या घटनांमधील दोषींना आता २० वर्षांपर्यंत (पूर्वी १० वर्ष) शिक्षा होईल. ही शिक्षा जन्मठेपेसाठी वाढवली जाऊ शकते.



संपर्क आणि विकास वाढविण्यासाठी नेपाळ आणि चीन यांच्यात सहमती 
‘ट्रान्स-हिमालयन मल्टी-डायमेन्शनल ट्रान्सपोर्ट नेटवर्क’ या प्रकल्पाच्या माध्यमातून क्षेत्रीय संपर्क आणि विकास वृद्धींगत करण्यासाठी नेपाळ आणि चीन यांच्यात एक करार करण्यात आला आहे.

करारांतर्गत रेल्वे, व्यापार बंदरे, हवाई वाहतूक, वीज आणि दळणवळण यासारख्या बहू-आयामी पद्धतीने क्षेत्र समृद्धी प्राप्त करणार.


IDA ने आपले पहिले बंध सादर केले 
जागतिक बँक समूहाचा एक विभाग – आंतरराष्ट्रीय विकास संघ (IDA) यांच्याकडून त्यांच्या ६० वर्षांच्या इतिहासात त्यांचे पहिले बंध (Bond) सादर केले आहे.

पहिल्या IDA बंधच्या माध्यमातून $1.5 अब्ज एवढी रक्कम उभी करण्यात आली आहे. अश्याप्रकारे जगभरातील गुंतवणूकदारांनी ट्रिपल-ए दर्जाच्या संपदेत गुंतवणूक करून गरीब देशांमध्ये जीवनमान सुधारण्यासाठी गुंतवणूकीचे समर्थन केले आहे.

IDA प्रकल्प आणि कार्यक्रमांसाठी तांत्रिक विशेषता आणि कमी गुंतवणूकीची वित्तीय मदत प्रदान करते, जे आर्थिक विकासास प्रोत्साहन देतात आणि जगातील दारिद्र्य कमी करण्यास होते. याची स्थापना २४ सप्टेंबर १९६० रोजी करण्यात आली.



राष्ट्रकुल देशांची CHOGM 2018 यशस्वीपणे संपन्न 
२० एप्रिल २०१८ रोजी ब्रिटनच्या लंडन शहरात राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखांची बैठक (CHOGM 2018) संपन्न झाली. ही CHOGMची २५ वी बैठक होती. या बैठकीचा विषय ‘टूवर्ड्स ए कॉमन फ्यूचर’ हा होता.

या बैठकीत महासागर प्रशासनासंबंधी राष्ट्रकुल ब्लू चार्टर, व्यापार व गुंतवणूकीसाठी कॉमनवेल्थ कनेक्टिव्हीटी एजेंडा, सायबर गुन्हेगारी यावर घोषणा तसेच सदस्य देशांमध्ये निवडणुकांचे अवलोकन याबाबत सुधारित राष्ट्रकुल दिशानिर्देश यासंबंधी मुद्द्यांवर भर दिला गेला.

समृद्धी: राष्ट्रकुल देशांमध्ये व्यापार आणि गुंतवणूक वाढविणे.
सुरक्षा: जागतिक दहशतवाद, संघटित गुन्हेगारी आणि सायबर हल्ले यांसारख्या सुरक्षेसंबंधी समस्यांना दूर करण्यासाठी सहकार्य वाढविणे.
न्याय वर्तन: राष्ट्रकुलमध्ये लोकशाही, मूलभूत स्वातंत्र्य आणि सुशासन यांचा प्रचार करणे.
शाश्वतीकरण: हवामान बदल आणि अन्य जागतिक संकटांच्या प्रभावांना हाताळण्यासाठी लहान आणि संवेदनशील राज्यांची लवचिकता वाढविणे.

पूर्वी ब्रिटिश साम्राज्यात मोडणाऱ्या पण नंतर स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांची आंतरराष्ट्रीय संघटना ‘राष्ट्रकुल’ म्हणून ओळखली जाते.

ब्रिटनच्या संसदेने स्टॅट्यूट ऑफ वेस्टमिन्स्टर हा कायदा करून राष्ट्रकुलाला १९३१ साली मान्यता दिली. त्यामुळे पूर्वीची इम्पीअरिअल कॉन्फरन्स ही संज्ञा कालबाह्य ठरून ब्रिटिश कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स ही संज्ञा रूढ झाली. 

१९४७ साली ‘ब्रिटिश कॉमनवेल्थ’ या नावातून ब्रिटिश हा शब्द वगळण्यात आला.  १९६५ साली राष्ट्रकुलाचे लंडनमध्ये स्वतंत्र सचिवालय स्थापन करण्यात आले. राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखांची बैठक (CHOGM) पहिल्यांदा १९७१ मध्ये सिंगापूरमध्ये भरविण्यात आली होती.

वर्तमानात राष्ट्रकुलमध्ये ५३  सदस्य राष्ट्रांचा समावेश आहे. पूर्वप्रथेनुसार राष्ट्रकुलाचे प्रमुखपद ब्रिटिश राजमुकुटाकडे असते.राणी एलिजाबेथ द्वितीय या राष्ट्रकुलच्या प्रमुख आहेत. राष्ट्रकुलच्या १६ सदस्य देशांच्या देखील प्रमुख आहेत, ज्याला राष्ट्रकुल क्षेत्र म्हणून संबोधले जाते. राष्ट्रकुल हा जवळपास २.४ अब्ज नागरिकांचा प्रदेश आहे.