नासा मंगळावर हेलिकॉप्टर पाठवणार 
अमेरिकेची नासा ही अवकाश संशोधन संस्था 2020 मध्ये मंगळावर लहान हेलिकॉप्टर पाठवणार असून ते निर्मनुष्य ड्रोन सारखे असणार आहे. तसेच त्याचा मंगळाच्या संशोधनासाठी उपयोग होणार आहे.


दी मार्स हेलिकॉप्टर असे या उपकरणाचे नाव असून त्याचे वजन चार पौंड म्हणजे 1.8 किलो आहे. त्याचा मुख्य भाग सॉफ्टबॉलच्या आकाराचा आहे.

हेलिकॉप्टर मार्स 2020 रोव्हर गाडीला लावले जाणार आहे. 

रोव्हर गाडी मंगळावरील वातावरण वसाहतीस योग्य आहे की नाही याचा अंदाज घेईल. तेथील नैसर्गिक साधनसंपत्ती व पूर्वीच्या सजीवसृष्टीचे पुरावे, मानवाला तेथे असलेले संभाव्य धोके यांचाही अभ्यास यात केला जाणार आहे.

मार्स 2020 मोहीम जुलै 2020 मध्ये आयोजित करण्यात आली असून फेब्रुवारी 2021 मध्ये रोव्हर गाडी हेलिकॉप्टरसह मंगळावर पोहोचेल.

नासाने अवकाश इतिहासात अनेक गोष्टी प्रथम करण्याचा मान मिळवला आहे, त्यात मंगळावर हेलिकॉप्टर पाठवण्याचा उपक्रमही समाविष्ट आहे.मंगळाच्या आकाशात हेलिकॉप्टर उडवणे ही वेगळीच संकल्पना आहे, कुठल्याही देशाने अजून मंगळावर हेलिकॉप्टर उडवलेले नाही.मुक्तिनाथ मंदिराला भेट देणारे मोदी पहिले परदेशी नेते 
नेपाळच्या प्रसिद्ध मुक्तिनाथ मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. हे मंदिर बौद्ध व हिंदुधर्मीयांसाठी सारखेच पवित्र क्षेत्र आहे. या मंदिरात प्रार्थना करणारे मोदी हे पहिलेच जागतिक नेते ठरले आहेत.

तसेच मोदी यांनी बागमती नदीच्या तीरावरील पशुपतिनाथ मंदिरातही भेट दिली. पशुपतिनाथ मंदिर हे नेपाळमधील सर्वात जुने शिवमंदिर आहे. पशुपतिनाथ मंदिरात भेट दिल्यानंतर मोदी यांनी अभ्यागतपुस्तिकेत स्वाक्षरी केली.

मुक्तिनाथ मंदिर हे 12172 फूट उंचीवर असून, ते भारत व नेपाळ यांच्यातील मोठा सांस्कृतिक दुवा आहे. या मंदिरात मानवी आकाराची विष्णूची सोन्याची मूर्ती आहे.


आता रेल्वेतही ब्लॅक बॉक्स 
रेल्वे अपघात आणि त्यामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण आपल्याकडे कायमच जास्त असल्यामुळे यावर उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने रेल्वेमध्ये विमानाप्रमाणेच ब्लॅक बॉक्स असणार आहे.
ही नवी प्रणाली असलेल्या रेल्वेच्या डब्यांचं अनावरण नुकतेच रायबरेली येथे करण्यात आले आहे.

रेल्वेतील ब्लॅक बॉक्स विमानातील ब्लॅक बॉक्सच्या तुलनेत अधिक कार्यक्षम आणि अत्याधुनिक असतील.

तसेच विमानातील ब्लॅक बॉक्स अपघात रोखू शकत नाहीत. मात्र स्मार्ट कोचेसमधील ब्लॅक बॉक्स अपघात रोखू शकतात.

या बॉक्सच्या माध्यमातून रेल्वेच्या अंतर्गत वायर्सचे तापमान मोजण्याचे काम करण्यात येईल. तसेच रेल्वेमध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या केबल्सची स्थिती यामध्ये मोजण्यात येईल. त्यामुळे शॉर्टसर्किटमुळे होणारे नुकसान टाळता येईल.मिमी मोंडल: ह्यूगो पुरस्कारासाठी नामांकन मिळालेली पहिली भारतीय 
2018 सालच्या ह्यूगो पुरस्कारासाठी मिमी मोंडल या लेखिकेचे नाव देण्यात आले आहे. ती या पुरस्कारासाठी नामांकन प्राप्त करणारी पहिली भारतीय ठरली आहे.

मिमी मोंडल ह्या एक काल्पनिक कथालेखिका आणि संपादिका आहेत. त्या ‘पंक दलित गर्ल’ म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे ‘लुमिनेन्सेंट थ्रेड्सः कनेक्शन्स टू ऑक्टाव्हिया बटलर’ या पुस्तकासाठी नाव दिले गेले आहे.

ह्यूगो पुरस्कार हा वर्ल्ड सायन्स फिक्शन सोसायटीकडून विज्ञानाची साथ असलेल्या सर्वोत्तम कल्पनारम्य साहित्यासाठी दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार आहे. या पुरस्कारांचे नामकरण ‘ह्युगो गर्नस्बॅक’ (अमेझिंग स्टोरीज मॅगझिनचे संस्थापक) यांच्या नावाने करण्यात आले आहे. सर्वप्रथम सन 1953 मध्ये हा पुरस्कार दिला गेला.जागतिक स्थलांतरित पक्षी दिन: 12 मे 
दरवर्षी ‘जागतिक स्थलांतरित पक्षी दिन’ हा मे महिन्याचा दुसरा शनिवार आणि रविवार असा दोन दिवस पाळला जातो.

यावर्षी 12 मे आणि 13 मे 2018 रोजी हा दिन “युनिफाइंग अवर वॉइसेस फॉर बर्ड कंझर्वेशन” या विषयाखाली पाळला जात आहे. यावर्षी पृथ्वीवरील स्थलांतरित पक्ष्यांच्या ‘आफ्रिका-युरेशीया मार्गिका, पूर्व आशियाई-ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका मार्गिका’ या प्रमुख मार्गांना संबोधित केले गेले आहे.

पहिला जागतिक स्थलांतरित पक्षी दिन 8-9 एप्रिल 2006 रोजी पाळला गेला होता. स्थलांतरीत पक्ष्यांना अधिवास आणि संरक्षण पुरवणे या मूळ संकल्पनांचा प्रसार आणि जाणीव निर्माण करण्याकरिता हा दिन पाळला जातो.