पुढच्या आठवड्यात पंतप्रधान मोदींचा रशिया दौरा 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात पुढील आठवड्यात अनापैचारिक चर्चा होणार असून, त्यासाठी मोदी 21 मे रोजी मॉस्कोला रवाना होणार आहेत. ही बैठक रशियाच्या सोची येथे शहरात होणार आहे. रशियाचे चौथ्यांदा अध्यक्ष झाल्यानंतर पुतिन आणि नरेंद्र मोदी यांच्यातील ही पहिलीच भेट असणार आहे.


उभय नेत्यांत द्विपक्षीय चर्चा होणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. ही भेट दोन्ही देशांतील नेत्यांना विचारांचे आदान-प्रदान करण्यासाठीची महत्त्वाची संधी असल्याचे सांगितले जात आहे.

तसेच या भेटीतून व्यूहरचनात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी यांनी गेल्या महिन्यात चीन दौऱ्यात अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासमवेत अनौपचारिक चर्चा केली होती. डोकलामवरून निर्माण झालेला तणाव संपल्यानंतर ही भेट महत्त्वाची होती.टेनिसपटू रॉजर फेडरर पुन्हा अव्वलस्थानी 
माद्रिद मास्टर्समध्ये उपांत्यपूर्व फेरीत झालेल्या पराभवाचा फटका बसल्याने राफेल नदालने एटीपी जागतिक क्रमवारीतील त्याचे प्रथम स्थान गमावले असून महान टेनिसपटू रॉजर फेडररने पुन्हा अव्वल पटकावले आहे. मार्च महिन्यापासून फेडरर एकही सामना खेळलेला नसतानाही तो पुन्हा सर्वोच्च स्थानावर पोहोचला आहे.

दुसरीकडे माजी अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचची अजून सहा स्थानांनी घसरण होऊन तो 18व्या स्थानावर पोहोचला आहे. 2006च्या ऑक्टोबरनंतरची ही त्याची सगळ्यात खालची क्रमवारी आहे.

माद्रिदचा विजेता अलेक्झांडर झ्वेरेव हा क्रमवारीत तृतीय क्रमांकावर कायम आहे. चौथ्या बल्गेरियाचा ग्रिगोर दिमित्रोव, पाचव्या स्थानी क्रोएशियाचा मरिन सिलीक आहे. तर भारतीय टेनिसपटू युकी भांब्रीची आठ स्थानांनी घसरण होऊन तो 94व्या स्थानावर तर रामकुमार रामनाथन 124व्या स्थानी आहे.केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल 
केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत –
वैद्यकीय कारणांमुळे अरुण जेटली यांच्याकडे असलेल्या पदांचा कार्यभार रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे देण्यात आला आहे. जेटली शारीरिकदृष्ट्या सक्षम होतपर्यंत केंद्रीय वित्तमंत्री तसेच कॉर्पोरेट कल्याण मंत्री पदांचा अतिरिक्त प्रभार गोयल यांना दिला गेला आहे.

एस. एस. अहलुवालिया यांच्याकडील पेयजल व स्वच्छता राज्यमंत्री पदाचा कार्यभार काढून घेत त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री पद सोपविण्यात आले आहे.

अल्फोन्स कन्ननथानम यांच्याकडील इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे.

स्मृती इराणी यांच्याकडील माहिती व प्रसारण राज्यमंत्री पद काढण्यात आले आहे. आता त्यांच्याकडे वस्त्रोद्योग मंत्रीपद आहे. क्रिडा मंत्री राजवर्धन सिंग राठोड यांच्याकडे माहिती प्रसारण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पद देण्यात आले आहे.


आयुष्मान भारत योजनेसाठी आरोग्य मंत्रालयाचा चार राज्यांसोबत सामंजस्य करार 
राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा मोहीमेंतर्गत ‘आयुष्मान भारत’ योजनेला सुरू करण्यासाठी चार राज्यांनी भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयासोबत सामंजस्य करार केले आहेत.

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, जम्मू-काश्मीर या चार राज्यांसोबत आणि चंदीगड या केंद्रशासित प्रदेशासोबत झालेल्या करारामुळे ‘आयुष्मान भारत’ योजनेंतर्गत देशाच्या 40% लोकसंख्येला मोफत उपचार मिळणार.

‘आयुष्मान भारत – राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा मोहीम (ABNHPM)’ या योजनेचे दोन घटक आहेत. पहिला 10.74 लक्ष कुटुंबांना मोफत 5 लक्ष रूपयांचा आरोग्य विमा प्रदान करणे आणि दुसरा म्हणजे हेल्थ अँड वेलनेस सेंटरची स्थापना करणे.हॅनोव्हर आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत हिना सिद्धूने सुवर्ण जिंकले 
जर्मनीत खेळल्या गेलेल्या हॅनोव्हर आंतरराष्ट्रीय नेमबाजी (ISCH) स्पर्धेच्या महिलांच्या 10 मीटर एयर पिस्तूल प्रकारात हिना सिद्धूने सुवर्ण जिंकले आहे.

शिवाय, या प्रकाराचे रौप्यपदक फ्रांसच्या मटिल्डा लामोले हिने तर भारताच्या श्री निवेथा हिने स्पर्धेच्या कांस्यपदक मिळवले.आसाम आणि राजस्थानमध्ये ई-वे बिल यंत्रणा लागू होणार 
16 मे 2018 पासून आसाम आणि 20 मे 2018 पासून राजस्थानमध्ये मालवाहतूकीसाठी ई-वे बिल यंत्रणा लागू केली जाणार आहे. आतापर्यंत 18 राज्य/केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही व्यवस्था लागू करण्यात आली आहे.

वस्तू व सेवा कर (GST) प्रणाली अंतर्गत मोटर मालवाहकांसाठी आंतर-राज्य मालवाहतुकीसाठी आवश्यक इलेक्ट्रॉनिक वे बिल (e-way bill) यंत्रणेचा वापर 1 एप्रिल 2018 पासून देशभरात सुरू करण्यात आला आहे. 

ई-वे बिल यंत्रणेमधून 50,000 रुपयांहून अधिक किंमतीचा माल एका राज्यातून दूसर्‍या राज्यात पाठविण्याआधी त्याची ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक असणार आहे.