राजेश टोपे यांना ‘उत्कृष्ट भाषण पुरस्कार’ जाहीर 
अंबड व घनसावंगी मतदारसंघाचे आमदार राजेश टोपे यांनी महाराष्ट्र विधानसभेतील कामकाजादरम्यान विविध प्रश्नांवर उत्कृष्ट भाषण केले. सभागृहासमोर प्रश्न मांडून सत्य परिस्थिती पुराव्यानिशी सादर केल्याने त्यांना विधानसभेतील उत्कृष्ट भाषण पुरस्कार जाहीर केले.


आमदार टोपे यांची 2015 ते 2018 या कालावधीत उत्कृष्ट भाषण पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ही निवड महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान सभागृहनेते महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, संसदीय प्रधान सचिव अनंत कळसे, ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांच्या समितीने आमदार राजेश टोपे यांना उत्तम संसदपट्टू व उत्कृष्ट भाषण पुरस्कार जाहीर झाला आहे.



देशात ‘स्वच्छता सर्वेक्षणात’ इंदूर अग्रस्थानी 
केंद्र सरकारच्या ‘स्वच्छता सर्वेक्षणा’त यंदा देशभरातील शहरांमध्ये मध्य प्रदेशातील इंदूरने प्रथम, भोपाळने दुसरा क्रमांक, तर चंदिगडने तृतीय क्रमांक पटकावला आहे. 

तर राज्यांच्या राजधान्यांच्या श्रेणीमध्ये मुंबईने आघाडीचे स्थान मिळविले आहे. देशभरातील शहरांमध्ये मुंबईला कितवे स्थान मिळाले हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.

यंदा ‘स्वच्छ भारत अभियाना’मध्ये राज्यांच्या राजधान्यांच्या श्रेणीचा नव्याने समावेश करण्यात आला. या श्रेणीमध्ये महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख बनलेल्या मुंबईने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

भारतातील मोठय़ा स्वच्छ शहराचा मान आध्र प्रदेशमधील विजयवाडा शहराला मिळाला आहे. वेगाने प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये उत्तर प्रदेशमधील गाझियाबादने आघाडी मिळविली आहे.

नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद देणाऱ्या शहरांमध्ये राजस्थानमधील कोटा, महाराष्ट्रातील परभणीने, नावीन्यपूर्ण आणि सर्वोत्कृष्ट कृती श्रेणीमध्ये महाराष्ट्रातील नागपूरने आणि गोव्यातील पणजीने, तर सौर ऊर्जा व्यवस्थापन श्रेणीत नवी मुंबई, तिरुपतीने आघाडीचे स्थान पटकावले आहे.



WHO ने प्रथमच ‘महत्त्वाची नैदानिक सूची’ प्रसिद्ध केली 
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आपली पहिली ‘महत्त्वाची नैदानिक सूची (Essential Diagnostics list -EDL)’ प्रसिद्ध केली आहे.
या यादीत निदानाच्या 113 सर्वात महत्त्वपूर्ण श्रेणींना साधारण आणि प्राथमिक आजारांसाठी सूचीबद्ध केले गेले आहे. 

यापैकी 58 साधारण परिस्थितींची एक विस्तृत श्रृंखलेचे निदान करणे तर उर्वरित 55 निदान प्राथमिक आजारांचे निदान करणे किंवा देखरेख ठेवण्याच्या उद्देशाने आहेत.

जागतिक आरोग्य संघटना (WHO) ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य संबंधित संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संघटना आहे. 

7 एप्रिल 1948 रोजी स्थापित WHO चे जिनेव्हा (स्वित्झर्लंड) मध्ये मुख्यालय आहे. WHO हा संयुक्त राष्ट्रसंघ विकास गटाचा सदस्य आहे. ही आरोग्य संघटना पूर्वी ‘एजन्सी ऑफ द लीग ऑफ नेशन्स’ म्हणून ओळखली जात होती.


हिमंता बिस्वा सरमा बॅडमिंटन आशिया संघाचे उपाध्यक्ष 
बॅंकॉक, थायलंडमधील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान BAIचे अध्यक्ष हिमंता बिस्वा सरमा यांची बॅडमिंटन आशिया संघाचे (BAC) उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

बॅडमिंटन आशिया संघ किंवा बॅडमिंटन एशिया (Badminton Asia Confederation -BAC) ही आशिया खंडातली बॅडमिंटन खेळासाठीची संघटना आहे. 

हे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या ध्वजाअंतर्गत 5 महाद्वीपीय संस्थांपैकी एक आहे. या संघटनेची स्थापना 1959 साली झाली आणि याचे मुख्यालय मलेशियाच्या पेटालिंग जया येथे आहे.



विश्वातला सर्वात वेगाने वाढणारा कृष्णविवर शोधला 
शास्त्रज्ञांनी जगातल्या सर्वात वेगाने वाढणार्‍या कृष्णविवराचा शोध घेतला आहे. हा कृष्णविवर प्रत्येक दोन दिवसांमध्ये सूर्याच्या वजनाइतकी वायू गिळंकृत करतो आहे.

संशोधकांचा अंदाज आहे की जवळपास 12 अब्ज वर्षाआधी त्याचा आकार 20 अब्ज सूर्याच्या बरोबर असावा आणि प्रत्येक 10 लक्ष वर्षांनंतर हा आकाराने 1%ने वाढतो आहे. 

प्रत्येक दिवशी हा मोठ्या प्रमाणात वायू सोखून घेतो, ज्यामुळे त्यामध्ये घर्षण आणि ताप निर्माण होते. त्यामुळे तो कोणत्याही आकाशगंगेपेक्षा सहस्र पटीने अधिक प्रकाशमान दिसून पडतो.

ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी (ANU) च्या सायडिंग स्प्रिंग वेधशाळेतील दुर्बिणीने यापासून निघणार्‍या प्रकाशाची ओळख पटवली आणि युरोपीय अंतराळ संस्थेच्या गाइया उपग्रहाने याचा शोध घेतला.



उत्‍तम पछरने ह्यांची ललित कला अकादमीचे नियमित अध्यक्ष पदी नेमणूक 
उत्‍तम पछरने ह्यांची ललित कला अकादमीचे नियमित अध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली आहे.

उत्‍तम पछरने हे प्रसिद्ध कलाकार आणि मूर्तिकार आहे. ते सध्या गोव्याच्या कला अकादमीच्या सल्लागार समितीचे सदस्‍य आणि बोरीवलीच्या जन सेवा सहकारी बँकेचे संचालक आणि पी.एल. देशपांडे राज्‍य ललित कला अकादमीचे सल्लागार सदस्‍य आहेत.

ललित कला अकादमी ही एक स्वायत्त संस्था आहे, जिची 5 ऑगस्ट 1954 रोजी भारत सरकारद्वारे स्थापना झाली आहे. ही एक केंद्रीय संघटना आहे, जी भारत सरकारद्वारे ललित कलांच्या क्षेत्रात कार्य करण्यासाठी स्थापित केले गेले होते.