आशा पारेख आणि फारूक शेख यांना ‘बिमल रॉय मेमोरियल अँड फिल्म सोसायटी’ पुरस्कार जाहीर 
प्रख्यात चित्रपट निर्माता बिमल रॉय यांच्या ५२ व्या पुण्यतिथीनिमित्त, चित्रपटसृष्टीतले जेष्ठ अभिनेते फारूक शेख आणि आशा पारेख यांना ‘बिमल रॉय मेमोरियल अँड फिल्म सोसायटी’ पुरस्कार देण्यात येत असल्याचे घोषित करण्यात आले आहे.


यांच्या व्यतिरिक्त दिग्दर्शक अनंत महादेवन आणि अमित राय तसेच अभिनेता परेश रावल आणि जॅकी श्रॉफ यांनाही हा पुरस्कार दिला जात आहे.

बिमल रॉय मेमोरियल अँड फिल्म सोसायटी याची स्थापना १९९७ मध्ये करण्यात आली. बिमल रॉय हे भारतीय चित्रपट जगताचे १९४० च्या दशकातले सर्वोत्कृष्ट निर्माते मानले जाते. 

२२ सालापासून हिन्दी चित्रपट निर्मात्यांना ‘बिमल रॉय मेमोरियल अँड फिल्म सोसायटी’ पुरस्काराने सन्मानित केले जात आहेत. 



गोल्डन ग्लोब पुरस्कार २०१८ 
७६ व्या वार्षिक ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी २०१८ सालच्या चित्रपट आणि अमेरिकन दूरदर्शन कार्यक्रमांमधील सर्वोत्तमांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विजेत्यांची यादी
सर्वोत्कृष्ट चित्रपट (नाट्य) – बोहेमियन रॅप्सोडी
सर्वोत्कृष्ट चित्रपट (संगीत किंवा विनोदी) – ग्रीन बुक
सर्वोत्कृष्ट अभिनेता (नाट्य) – रॅमी मलेक (बोहेमियन रॅप्सोडी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (नाट्य) – ग्लेन क्लोज (द वाइफ)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (संगीत किंवा विनोदी) – क्रिस्टीन बेल (वाइस)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (संगीत किंवा विनोदी) – ओलिव्हीया कोलमन (द फेवराइट)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – अल्फोन्सो कुअरॉन (रोमा)
सर्वोत्कृष्ट चित्रपट (अॅनिमेटेड) – स्पायडर-मॅन: इन्टू द स्पायडर-वेर्स
सर्वोत्तम चित्रपट (परदेशी भाषा) – रोमा

अमेरिकेत दरवर्षी हॉलीवुड फॉरेन प्रेस असोसिएशन (HFPA) मनोरंजन जगतात उत्कृष्ट कामगिरींसाठी देशी-परदेशी कलाकारांना, चित्रपटांना गोल्डेन ग्लोब पुरस्काराने सन्मानित करते. पहिला गोल्डन ग्लोब पुरस्कार जानेवारी १९४४ ला दिला गेला.


कर्मचारी निवड आयोगास संवैधानिक दर्जा प्रदान करण्यासाठी संसदीय समितीची शिफारस 
केंद्र सरकारने भारत सरकारच्या ‘कर्मचारी निवड आयोग (SSC)’ या सरकारी भरती प्रक्रिया चालविणार्‍या संस्थेला संवैधानिक दर्जा द्यावा, अशी शिफारस भुपेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली संसदीय स्थायी समितीने (PSC) केंद्राकडे केली आहे.

संघ लोकसेवा आयोग (UPSC) आणि सर्व राज्य लोकसेवा आयोगांना एकतर संवैधानिक किंवा कायदेशीर दर्जा दिलेला आहे. मात्र SSC ही एकमात्र अशी संस्था आहे, जी मोठ्या प्रमाणावर समान कार्य करते, परंतु त्याला संवैधानिक दर्जा अजूनही प्रदान केला गेला नाही.

ही संस्था कार्मिक व प्रशिक्षण विभागाशी (DoPT) अंतर्गत कार्य करणारी संलग्न संस्था आहे. ही भारत सरकारच्या विविध मंत्रालयात आणि विभागातल्या जागांवर नियुक्त्या करते. 

SSC ची स्थापना ४ नोव्हेंबर १९७५ रोजी भारत सरकारने ‘गौण सेवा आयोग (Subordinate Service Commission)’ या नावाने केली आणि १९७७ साली त्याला वर्तमान नाव प्राप्त झाले.



भारताने ऑस्ट्रेलियात प्रथमच कसोटी क्रिकेट मालिका जिंकली 
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांदरम्यानच्यास ७१ वर्षांच्या क्रिकेट इतिहासात ऑस्ट्रेलियात भारताने प्रथमच कसोटी मालिका विजय मिळवला आहे.

६ जानेवारी २०१९ रोजी भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानची सिडनी येथील चौथी कसोटी ड्रॉ झाली. त्यामुळे चार सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ ने ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

भारत ऑस्ट्रेलियात मालिका जिंकणारा जगातला पाचवा आणि आशियातला पहिला संघ आहे. यापूर्वी इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलँडने ऑस्ट्रेलियात मालिका जिंकलेली आहे.

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये १९४७ साली पहिली कसोटी मालिका खेळली होती. तेव्हापासून आतापर्यंत भारताने ऑस्ट्रेलियात १२ कसोटी मालिका खेळल्या. त्यातील हा पहिलाच मालिका विजय आहे.