लॉटरी संदर्भात मुद्द्यांच्या अभ्यासासाठी मंत्र्यांचा गट (GoM) गठीत
10 जानेवारी 2019 रोजी झालेल्या GST परिषदेच्या 32 व्या बैठकीत घेतल्या गेलेल्या निर्णयानुसार लॉटरी संदर्भात मुद्द्यांच्या अभ्यास करण्यासाठी आठ सदस्य असलेला मंत्र्यांचा गट (GoM) नेमण्यात आला आहे.सुधीर मुनगंटीवार (राज्य वित्त मंत्री, महाराष्ट्र) हे या मंडळाचे संयोजक असतील. 


एखादी अधिकृत व्यक्ती कमी दराचा गैरफायदा घेत आहे किंवा नाही याची राज्य सरकार खात्री घेणार आणि अश्या बाबीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय सुचविणे, कायदेशीर तरतुदी, कर चुकवेगिरी अश्या विविध मुद्द्यांचा अभ्यास हे मंडळ करणार आहे.2015, 2016, 2017 आणि 2018 साठी गांधी शांती पारितोषिकांची घोषणा
भारत सरकारकडून 2015, 2016, 2017 आणि 2018 साठी ‘गांधी शांती पारितोषिक’ विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

2015 – विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी

2016 – सुलभ इंटरनॅशनल आणि अक्षयपात्र फाऊंडेशन
2017 – ईकालअभियान ट्रस्ट (EkalAbhiyan Trust)
2018 – योहेई सासाकावा (भारत तसेच जगभरात कुष्ठरोगाच्या निर्मूलनासाठी दिलेल्या योगदानासाठी)

1995 साली महात्मा गांधी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त दरवर्षी ‘गांधी शांती पारितोषिक’ देण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला. 1 कोटी रुपये, प्रमाणपत्र आणि एक पारंपारिक हस्तकला/हातमाग वस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ग्रामीण विकास, मानवतावाद, स्वच्छता, शिक्षण आणि कुष्ठरोगाचे निर्मूलन अश्या क्षेत्रात कार्यरत संस्था किंवा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.PCRAच्या वार्षिक ‘सक्षम 2019’ कार्यक्रमाचा शुभारंभ
16 जानेवारी 2019 रोजी भारत सरकारच्या केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अखत्यारीत पेट्रोलियम संरक्षण संशोधन संघाच्या (PCRA) नेतृत्वात वार्षिक ‘सक्षम 2019’ कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

संपूर्ण महिनाभर चालणार्‍या लोक-केंद्रित मोहिमेच्या अंतर्गत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू कंपन्यांच्या सहकार्याने विविध कार्यक्रमांचे आणि उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे, त्यात 200 शहरांमध्ये ‘सक्षम’ सायकल डे, सायकलॉथन, लघुपट निर्मिती स्पर्धा, चालकांसाठी कार्यशाळा, स्वयंपाकाच्या इंधन बचतीसंदर्भात उपाय, प्रसार माध्यमांमार्फत जागरूकता अश्या उपक्रमांचा सहभाग आहे.


सक्षम (संरक्षण क्षमता महोत्सव) हा एक वार्षिक कार्यक्रम आहे. राज्य सरकार आणि अन्य भागधारकांसह सार्वजनिक क्षेत्रातील तेल व वायू कंपन्यांच्या सक्रीय सहभागातून सर्वसामान्यांमध्ये इंधनाच्या बचतीबाबत तसेच पेट्रोलियम पदार्थांचे जतन या संदर्भात जागरुकता निर्माण करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.


मुंबईत ‘दीनदयाल दिव्यांग पुनर्वसन योजना (DDRS)’ संदर्भात प्रादेशिक परिषद आयोजित
17 जानेवारी 2019 रोजी मुंबईत ‘दीनदयाल दिव्यांग पुनर्वसन योजना (DDRS)’ संदर्भात प्रादेशिक परिषद भरविण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत असणार्‍या दिव्यांगजनांचे सशक्तीकरण विभागातर्फे करण्यात आले होते.

हा कार्यक्रम महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्यप्रदेश ही राज्ये तसेच दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव या दोन केंद्रशासित प्रदेशांवर केंद्रीत होता. या प्रदेशांमध्ये ही योजना अंमलात आणण्यासाठी सर्व भागधारकांना एकत्र आणण्याकरिता ही परिषद भरविण्यात आली.

‘दीनदयाल दिव्यांग पुनर्वसन योजना (DDRS)’ याच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले उपक्रम/मुद्दे –
प्रारंभिक हस्तक्षेप आणि प्रशिक्षण
मुकबधिर, कर्णबधिर, अंध आणि मतिमंद व्यक्तींसाठी विशेष शाळा
सेरेब्रल पॅलसीड ग्रस्त बालकांसाठी प्रकल्प
कुष्ठरोग-मुक्त झालेल्या व्यक्तींचे पुनर्वसन
मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तींच्या उपचारानंतर त्यांचे मानसिकदृष्ट्या सामाजिक पुनर्वसन आणि घरवापसी
कुटुंबाच्या बाबतीत पुनर्वसन आणि गृह व्यवस्थापन
समुदाय आधारित पुनर्वसन कार्यक्रम (CBR)
कमकुवत दृष्टी केंद्रे आणि मनुष्यबळ विकासअमेरिकेच्या राष्ट्रपतींनी मुख्य प्रशासकीय पदांसाठी भारतीय वंशाच्या तीन निवासी नागरिकांचे नामांकन दिले
व्हाईट हाऊसने संसदेच्या सिनेट या सर्वोच्च नियामक मंत्रिमंडळाकडे पाठविलेल्या ज्येष्ठ उमेदवारांच्या नव्या यादीनुसार, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मुख्य प्रशासकीय पदांसाठी भारतीय वंशाच्या तीन निवासी नागरिकांचे नामांकन दिले गेले आहे.

त्या व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे आहेत –

असिस्टेंट सेक्रेटरी ऑफ एनर्जी (न्यूक्लियर एनर्जी) पदासाठी – रीटा बरनवाल
प्रायव्हसी अँड सिव्हिल लिबर्टिज ओव्हरसाइट बोर्डचे सदस्य – आदित्य बमझई
असिस्टेंट सेक्रेटरी ऑफ ट्रेझरी – बिमल पटेल