कनिष्ठ खेळाडूंसाठी ‘टारगेट ऑलंपिक पोडियम स्कीम (TOPS) ज्युनियर’ योजना जाहीर

2024 पॅरिस ऑलंपिक आणि 2028 लॉस एंजेलिस ऑलंपिक खेळांमध्ये वयाने लहान असलेल्या तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, युवा कल्याण व क्रिडा मंत्री किरेन रिजुजू यांनी ‘टारगेट ऑलंपिक पोडियम स्कीम (TOPS) ज्युनियर’ या योजनेची घोषणा केली आहे.

ही घोषणा “फिट है तो हिट है: फिट इंडिया” वेबिनार दरम्यान करण्यात आली.

वयवर्ष 10-12 या वयोगटातल्या खेळाडूंसाठी ही योजना सुरू करण्याची सरकारची योजना आहे.

भारत सरकारच्या केंद्रीय युवा कल्याण व क्रिडा मंत्रालयाने 2017 सालापासून वरिष्ठ गटातल्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंना 50000 रूपयांचे मासिक मानधन देण्याची टारगेट ऑलंपिक पोडियम स्कीम (TOPS) सुरू केली आहे.

खेळाडूंना त्यांची तयारी करण्यास मदत देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय क्रिडा विकास निधी (NSDF) मधून योजनेचा खर्च उचलला जातो.

फ्रान्सचे पंतप्रधान एदुआर्द फिलीप यांचा राजीनामा

फ्रान्सचे पंतप्रधान एदुआर्द फिलीप यांनी राजीनामा दिला असून त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.

मॅक्रॉन यांच्या पक्षाला निवडणुकीत अनेक मोठय़ा शहरात पराभवाचा फटका बसला आहे.

ग्रीन पार्टीने त्यात आघाडी घेतली. मार्च व एप्रिलमध्ये करोनाची साथ शिखरावस्थेत होती त्यावेळी त्यांच्यावर टीका झाली.

‘आंध्रप्रदेश कॉर्पोरेशन फॉर आऊटसोर्स सर्व्हिसेस’ (APCOS) याचे उद्घाटन

आंध्रप्रदेश सरकारने स्थापन केलेल्या ‘आंध्रप्रदेश कॉर्पोरेशन फॉर आऊटसोर्स सर्व्हिसेस’ (APCOS) या मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाचे 30 जून 2020 रोजी अमरावती येथे उद्घाटन करण्यात आले.

‘आऊटसोर्स’ म्हणजे कार्यालयात उपलब्ध असलेल्या क्षमतेचा वापर न करता मोबदला देऊन बाहेरून काम करवून घेणे.

या मंडळाच्या देखरेखित चालविलेल्या योजनेच्या अंतर्गत राज्य सरकार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांक समुदायात मोडणाऱ्या लोकांसाठी आउटसोर्सिंग नोकऱ्यांमध्ये 50 टक्के आरक्षण देणार आहे.

जिल्हा पातळीवर महिलांसाठी आउटसोर्सिंग नोकऱ्यांमध्ये 50 टक्के आरक्षित ठेवल्या आहेत.

2.8 किलोमीटर लांबीची मालगाडी चालवून भारतीय रेल्वेचा इतिहास

नुकताच भारतीय रेल्वेनं 2.8 किलोमीटर लांबीची मालगाडी चालवून इतिहास रचला आहे.

या मालगाडीला रेल्वेनं शेषनाग असं नाव दिलं आहे.भारतातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी रेल्वेगाडी आहे.

भारतीय रेल्वेनं शेषनाग या मालगाडीला चार मालगाड्यांचे डबे एकत्र जोडले आहे. या मालगाडीत एकूण 251 डबे जोडण्यात आले होतं.

तसंच ही मालगाडी खेचण्यासाठी सात इलेक्ट्रिक इंजिनही लावण्यात आली होती.

सुरूवातीला तीन आणि मध्यभागी चार अशा इंजिनच्या मदतीनं ही रेल्वे चालवण्यात आली.

जागतिक बँकेने भारताला 5.13 अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले

भारतातील 15 कोटी सुयोग्य लघु व मध्यम उद्योगांसाठी 75 कोटी डॉलर्सची अर्थसंकल्पीय मदत देणार आहे, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.

2020 या आर्थिक वर्षांत ( जुलै 2019 ते जून 2020) जागतिक बँकेने भारताला 5.13 अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले होते

कोविड 19 साथीचा मुकाबला करण्यासाठी त्यातील 2.75 अब्ज डॉलर्सचे कर्ज लगेच मंजूर करण्यात आले होते

30 नोव्हेंबरपर्यंत गरीबांना मोफत धान्य

30 नोव्हेंबरपर्यंत गरीबांना धान्य मोफत दिलं जाणार आहे अशी अत्यंत महत्त्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

याचा लाभ देशातल्या 80 कोटी जनतेला होणार आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

एवढंच नाही तर संपूर्ण देशात वन नेशन वन रेशन कार्ड योजनाही लवकरच लागू केली जाणार आहे अशीही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

चिनी संसदेत हाँगकाँगसाठी बनवण्यात आलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा मंजूर

चिनी संसदेमध्ये मंगळवारी खास हाँगकाँगसाठी बनवण्यात आलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा मंजूर झाला.

त्यामुळे संपूर्ण हाँगकाँगवर कब्जा करण्याचा चीनचा मार्ग मोकळा झाला आहे.

कधीकाळी ब्रिटिशांची वसाहत असलेले हाँगकाँग 23 वर्षांपूर्वी चीनकडे सोपवण्यात आले.

हाँगकाँग हे जगातील महत्वाचे वित्तीय केंद्र आहे. हाँगकाँग 1997 पासून चीनच्या नियंत्रणाखाली आहे.

IIT मद्रासचा जगातला पहिला ऑनलाईन बी.एस्सी. पदवी अभ्यासक्रम

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी 30 जून 2020 रोजी प्रोग्रामिंग आणि डेटा सायन्स या विषयासाठी जगातल्या पहिल्या ऑनलाईन बी.एससी. पदवी अभ्यासक्रमाचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले.

हा कार्यक्रम भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मद्रास या संस्थेनी तयार केला आहे.

हा पदवी कार्यक्रम दहावीमध्ये इंग्रजी आणि गणित विषयासह उत्तीर्ण झालेल्या आणि इयत्ता 12वी उत्तीर्ण झालेल्या आणि कोणत्याही विद्यापीठात पदवी अभ्यासक्रमासाठी आपले नाव नोंदलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुला आहे.

डेटा विज्ञान हे वेगाने विकसित होणार्‍या क्षेत्रांपैकी एक असून 2026 सालापर्यंत या क्षेत्रात रोजगाराच्या 11.5 दशलक्ष संधी निर्माण होणार असा अंदाज आहे.

विस्डेन कडून रवींद जडेजा मोस्ट व्हॅल्यूलेबल प्लेयर घोषित

Wisden ने भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाला 21व्या शतकातला भारताचा Most valuable player म्हणून घोषित केलं आहे.

गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही प्रकारांत जाडेजा सर्वोत्तम कामगिरी करत असल्यामुळे त्याची या बहुमानासाठी निवड झालेली आहे.

तिन्ही क्षेत्रात जाडेजाच्या कामगिरीचा अभ्यास केल्यानंतर विस्डनने जाडेजाचं नाव घोषित केलं आहे. 97.3 गुण मिळवत जाडेजाने हा मान पटकावला आहे.

कोविड-19 चाचणीसाठी NBRI संस्थेनी प्रगत जीवरेणुशास्त्र प्रयोगशाळेची स्थापना केली

उत्तरप्रदेशाच्या लखनऊ शहरातल्या राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्थेनी (NBRI) कोविड-19 चाचणीसाठी “प्रगत जीवरेणुशास्त्र प्रयोगशाळा (Advanced Virology Lab)” याची स्थापना केली आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR), जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे ही सुविधा विकसित करण्यात आली आहे.

ही जैवसुरक्षा स्तर (BSL) 3 या प्रकारची सुविधा आहे. जैवसुरक्षा स्तर हे कोणत्या प्रकारच्या परजीवीशी संबंधित आहे, हे स्पष्ट करते.

ICMRच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोविड-19 साठी BSL 2 स्तराच्या सुविधेची शिफारस करण्यात आली आहे, परंतू ही एक प्रगत आवृत्ती आहे.

या प्रगत आवृत्तीत एक “ऋण दबाव” (Negative Pressure) आहे, अर्थात त्यात सक्शनची सुविधा आहे जी हवेतले कोणतेही कण शोषून घेण्यास सक्षम आहे आणि फिल्टरमधून पाठवते.

कोविड-19 ची सुरक्षित चाचणी सुविधा प्रदान करण्यासाठी ही सुविधा विषाणू किंवा जीवाणू गाळू शकते आणि त्यांना वेगळे करते.

59 अ‍ॅपवर केंद्र सरकारतर्फे बंदी जाहीर

लडाख सीमेवरील धुमश्चक्रीनंतर भारत-चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी टिकटॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण 59 अ‍ॅपवर बंदी घातली.

वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे बंदी घालण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान खात्याने निवेदनाद्वारे स्पष्ट केले.

माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ‘69अ’ मधील तरतुदींचा आधार घेत 59 अ‍ॅपवर बंदी आणण्यात आल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले.

“प्रोजेक्ट प्लॅटिना”: महाराष्ट्रात चाललेला जगातला सर्वात मोठा प्लाझ्मा थेरपी ट्रायल प्रकल्प

कोविड-19च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर प्रभावी ठरतो.

या थेरपीचा वापर व्यापक प्रमाणात होण्यासाठी महाराष्ट्र राज्यात जगातला सर्वात मोठा प्लाझ्मा थेरपी ट्रायल प्रकल्प राबवविला जात आहे.

या प्रकल्पाला “प्रोजेक्ट प्लॅटिना” असे नाव देण्यात आले आहे.

नागपूरच्या शासकीय महाविद्यालयात ‘प्लॅटिना’ प्रकल्प केंद्राचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

याप्रसंगी प्लाझ्मा डोनेशन, प्लाझ्मा बॅंक, प्लाझ्मा ट्रायल आणि इर्मजन्सी ऑथराजेशन या चार सुविधांचेही उद्घाटन करण्यात आले.

महाराष्ट्रात 23 ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये, पालिका रुग्णालये या ठिकाणी या उपचार पद्धतीचा वापर करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.

यापैकी 17 ठिकाणी ही उपचार पद्धती कोविड रुग्णांसाठी सुरु होत आहे.

राज्यात ज्या 10 ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयांची सुविधा नाही, तिथे आरोग्य विभागामार्फत प्लाझ्मा संकलनासाठी लागणारे यंत्र पुरविले जाणार आहेत. हा संकलीत केलेला प्लाझ्मा वैद्यकीय महाविद्यालयात पुरविला जाणार.

रशियाची एनर्जिया कंपनी 2023 साली स्पेस वॉक करण्यासाठी पर्यटक पाठविणार

अंतराळात स्पेस वॉक करण्यासाठी खासगी पर्यटकांना पाठविण्याच्या शर्यतीत रशियाच्या एनर्जिया स्पेस कॉर्पोरेशन या कंपनीने देखील उडी घेतली आहे. कंपनी 2023 साली अंतराळ प्रवासी पाठविणार अशी योजना तयार करण्यात आली आहे.

त्यासाठी अमेरिकेच्या स्पेस अँडव्हेंचर या कंपनीसोबत एनर्जिया कंपनीने करार केला आहे, ज्याच्यानुसार 2023 साली 2 अंतराळ पर्यटकांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) स्पेस वॉकसाठी नेले जाणार आहे.मोहिमेत सहभागी झालेल्या एकाला रशियाच्या नेतृत्वात एका प्रशिक्षित रशियन अंतराळयात्रीसह स्पेसवॉक करू दिले जाणार आहे.

याव्यतिरिक्त, अमेरिकेच्या NASA संस्थेने खासगी अंतराळ मोहिमांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रिचर्ज ब्रॅनसनच्या व्हर्जिन गॅलेक्टिक स्पेस टुरिझम कंपनीसोबत करार केला आहे. ही कंपनी अंतराळयात्रींना अंतराळ पर्यटनासाठी पाठण्याच्या दिशेने काम करते. तसेच स्पेसएक्स कंपनीने देखील मार्चमध्ये घोषणा केली होती की क्रू ड्रॅगनमार्फत पुढच्या वर्षी तीन जणांना अंतराळ पर्यटनासाठी घेऊन जाणार.