Official Answer Key Released Please Download it From Below Link Download Now

०१. स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव मूलशंकर तिवारी असे होते.


०२. नानासाहेब टोपे यांनी १८५७ च्या उठावानंतर नेपाळमध्ये आश्रय घेतला. 


०३. जोड्या
सार्वजनिक बांधकाम – खाते लॉर्ड डलहौसी
१८५७ च्या वेळी गव्हर्नर जनरल – लॉर्ड कॅनिंग
व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट – लॉर्ड लिटन 
भगवद्गीता इंग्रजी भाषांतर – लॉर्ड कॉर्नवॉलिस


०४. १८२८ साली लॉर्ड विल्यम बेंटिक याने इनाम कमिशन नेमले.


०५. १८५८ च्या भारत सरकारच्या कायद्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील राजवट संपुष्टात आली.


०६. वासुदेव बळवंत फडकेंनी पहिला दरोडा दौलतराव नाईक याच्या मदतीने ‘धामरी‘ गावावर टाकला. दरोड्यात त्यांना फक्त ३००० रुपये मिळाले. 


०७. स्त्रियांची सर्वात जास्त संख्या अनुक्रमे ठाणे, पुणे, मुंबई उपनगर, नाशिक आणि नागपूर या जिल्ह्यांत आहे. तर स्त्रियांची सर्वात कमी संख्या सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली, वाशीम, भंडारा या जिल्ह्यांत आहे.


०८. २२ जून १८४४ रोजी दादोबा पांडुरंग तर्खडकर आणि दुर्गादास मेहता यांनी मानवधर्म सभा स्थापन केली.


०९. महादेव गविंद रानडे आणि पुणे सार्वजनिक सभा स्थापन केली. गणेश वासुदेव जोशी (जी.व्ही. जोशी) हे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्वपूर्ण संस्थापक सदस्य होते. 


१०. जोड्या
सर विल्यम वेडरनबर्न – ब्रिटिश कमिटी ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस
अॅलन ह्यूम – पीपल्स फ्रेंड
मॅक्स म्युलर – रिग्वेद इंग्रजी भाषांतर
कोलब्रुक – एशियाटिक संस्था स्थापन


११. महात्मा फुले यांनी मुलींच्या शिक्षणास उत्तेजन आणि प्रसारास सुरुवात केली.


१२. भारत छोडो चळवळीत क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले.


१४. दादाभाई नौरोजी, गोपाळ कृष्ण गोखले, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, न्या.के.टी. तेलंग, आनंदमोहन बोस, बद्रुद्दीन तय्यबजी, व्योमेशचंद्र बॅनर्जी, फिरोजशाह मेहता, दिनशा वाच्छा हे मवाळयुगातील नेते मानले जातात.


१५. जोड्या
नाशिक – ९३४
चंद्रपूर – ९६१
रत्नागिरी – ११२२
सिंधुदुर्ग – १०३६


१६. कलकत्त्याजवळ रिशरा येथे पहिला ताग उद्योग १९५५ मध्ये सुरु झाला. भारतातील पहिला आधुनिक लोह पोलाद उद्योग झारखंड मधील जमशेदपूर येथे सुरु करण्यात आला. भारतातील पहिला खत कारखाना झारखंड मधील धनबाद जिल्ह्यातील सिंद्री येथे सुरु करण्यात आला. 


१७. ‘राष्ट्रीय रसायन आणि खत निर्मिती’ उद्योग थळ वायशेत येथे आहे.


१८. जोड्या
मुंबई – वर्सोवा
ठाणे – सातपाटी
रायगड – श्रीवर्धन
रत्नागिरी – वेंगुर्ला


१९. २०११ च्या जनगणनेनुसार कमी ते उच्च लोकसंख्या घनता मिझोराम, सिक्कीम, नागालँड आणि जम्मू काश्मीर येथे आहे.
हा पर्याय उपलब्ध नाही. सर्वात जवळचा पर्याय ड,ब,अ,क


२०. नर्मदा आणि तापी नदी विंध्य आणि सातपुडा पर्वताच्या मधून उगम पावतात आणि खंबायतच्या आखातास जाऊन मिळतात.


२१. बीड आणि जळगाव जिल्ह्य़ांत बाल-लिंग गुणोत्तर सर्वात कमी म्हणजे, दर एक हजार मुलांमागे अनुक्रमे ८०७ व ८४२ मुली एवढे आहे.


२२. भारतात जल मनुष्य म्हणून राजेंद्र सिंह यांना ओळखले जाते.


२३. जोड्या 
आर्कियन – नांदेड सिंधुदुर्ग
धारवाड – पूर्व नागपूर, भंडारा, गोंदिया, कोल्हापूर
विंध्य – चंद्रपूर
गोंडवाना – यवतमाळ, गडचिरोली, अमरावती 


२४. आंबोली येथे उष्ण कटिबंधीय निमहरीत अरण्य आढळते.


२५. धरण प्रकल्पांची क्षमता द.ल.घ.मी. भंडारदरा (३०४), भाटघर (६६६), वारणा (७७९), पेंच तोतलाडोह (१०४५), जायकवाडी (२१७१) . [इ,ब,अ,ड,क]


२६. वर्धा नदीचा उगम मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यात होतो. तिच्या पूर्वेकडे वाहणाऱ्या पूर्ण नदीपासून वेगळे करणारा तकलादू जलविभाजक आहे. वेमला, निगुडा, बोर आणि नंद या उपनद्या आहेत. वर्धा नदी अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातले सरहद निर्माण करते.


२७. दहाव्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटी राष्ट्रीय उत्पन्नाचा वृद्धी दर ७.५ एवढा उच्चतम होता.


२८. २०११ च्या जंगणनेनुसार भारताची लोकसंख्या १२१ कोटी इतकी होती.


२९. जोड्या लावा
पिवळी क्रांती – तेल बियाणे
निळी क्रांती – माशे उत्पादन
श्वेत क्रांती – दूध उत्पादन
हरित क्रांती – अन्नधान्य


३०. केन्स यांच्यानुसार पैशाची मागणी ही व्यवहार हेतू, दक्षता हेतू आणि सट्टेबाजीचा हेतू वरील सर्वांसाठी असते.


३१. भारतात विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीत सर्वात जास्त मुख्य स्रोत मॉरिशस या देशाचा आहे. 


३२. भारताच्या राज्यघटनेच्या कलम २८० नुसार वित्त आयोगाची स्थापना झाली आहे. १४ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष वाय.व्ही.रेड्डी हे होते.


३३. १३ व्या वित्त आयोगानुसार उत्तर प्रदेशला सर्वाधिक वाटा मिळाला आहे.


३४. जोड्या लावा
विभवांतर – व्होल्ट
विद्युतप्रवाह – अँपिअर
प्रभार – कुलम्ब
कंडक्टन्स – म्हो


३५. बेक्वेरेल हे किरणोत्साराचे एस.आय. पद्धतीतील एकक आहे.


३६. मानवी डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा व्यवस्थित गोलाकार नसल्यास उद्भवणाऱ्या दोषाला ऍस्टिग्माटीसम म्हणतात.



३७. अणूक्रमांक म्हणजे प्रोटॉनची संख्या होय.


३८. अमोनिया हरितगृह परिणामास कारणीभूत ठरत नाही.


३९. आर्किओऑप्टेरिक्स हा सरीसृप आणि पक्षी या दोन वर्गांना जोडणारा पृष्ठवंशीय प्राणी होता.


४०. सॅलॅमँडर यूरोडेला गणात मोजले जातात.


४१. मलेरियास कारणीभूत ठरणाऱ्या प्लजमोडिअमचा समावेश प्रोटोझोआ फायलम मध्ये होतो.


४२. गंधक या पोषण मूलद्रव्यांपासून बनलेली अमिनो आम्ले मिथिओनाईन आणि सिस्टीन ही आहेत.


४३. आयक्लर (१८१३) प्रमाणे ब्रायोफायटा विभाग क्लास हिपेटासी आणि मसाय या भागात आहे. 


४४. पहिली वनस्पतीशास्त्र जागतिक परिषद १८६४ साली ब्रुसेल्स येथे आंतरराष्ट्रीय फलोत्पादन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने भरली. चौथी वनस्पतीशास्त्र जागतिक परिषद व पहिली स्वतंत्र वनस्पतीशास्त्र जागतिक परिषद १८६७ साली पॅरिस येथे भरली.


४५. वरील सर्व प्रकारे काळजी घेतल्यास एड्सचा प्रसार थांबविता येतो.


४६. मॉर्समास आणि क्वाशीओरकोर या दोन्ही अवस्थांमध्ये नवजात बालकांची ऊर्जा व प्रथिने यांच्या कुपोषणामुळे उपासमार होते. क्वाशीओरकोर  मध्ये शरीरावर सूज असते तरस मॉर्समास मध्ये सूज नसते.


४७. क्षयरोग या रोगावर BCG ही प्रतिबंधक लस म्हणून वापरली जाते.


४८. योग्य निष्कर्ष
क. सर्व भाज्या फळे आहेत
ड. कहि खरबूज भाज्या आहेत


४९. पहिल्या स्तंभातील शब्द दुसऱ्या स्तंभात संकेत स्वरूपात दिलेले आहेत. परंतु ते त्याच क्रमाने नाहीत. D या अक्षराचा संकेत १ आहे.


५०. pr


५१. संयुक्त संरक्षण आघाडीवर C चे २५ सैनिक होते.


५२. १६ वस्तूंचे सरासरी वजन = ३३.२५


५३. जर गाडीने स्वतःची गती ताशी ५ किमी ने वाढविली असती तर २१० किमी प्रवासाला एक तास कमी वेळ लागला असता, तर गाडीचा सुरुवातीचा वेग ३० किमी ताशी होता. 


५४. खालील शृंखला पूर्ण करा PRLN 


५५. साधना यांनी भारतातील पहिला सिंधी भाषिक चित्रपट अबाना मध्ये भूमिका केली होती. ‘साधना कट’ या केशरचनेमुळे त्या प्रसिद्ध झाल्या.  प्रसिद्ध गीत ‘झुमका गिरा रे बरेली के बझार मे’ हे तिच्या मेरा साया या चित्रपटामधील आहे.


५६. १४ सप्टेंबर २०१६ रोजी दीपक गुप्ता हे संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष होते. त्यांच्यानंतर अलका सिरोही यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला. सध्या डेव्हिड आर सीमलीह हे आयोगाचे अध्यक्ष आहेत.


५७. पुष्प कमल उर्फ प्रचंड दहल हे सध्या नेपाळचे पंतप्रधान आहेत. २००८ साली ते पहिल्यांदा पंतप्रधान बनले होते. त्यांचा जन्म कास्की नेपाळ येथे झाला. मे १९९९ मध्ये ते माओवादी पक्षाचे सरचिटणीस बनले. ते कृषी विषयाचे पदवीधर आहेत.


५८. बराक-८ ची सर्व वैशिष्ट्ये बरोबर आहेत


५९. झिका विषाणू एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस डासांमार्फत पसरतो. झिका विषाणू युगांडातील झिका जंगलातून आला आहे. तेथे तो १९४७ साली प्रथम सापडला होता. झिका विषाणूची लागण गरोदर स्त्रीकडून तिच्या बाळाला होऊ शकते.


६०. कोपा अमेरिकन फुटबॉल स्पर्धेत 
अलेक्सीज सांचेज गोल्डन बॉल विजेता आहे.
एदुआर्दो व्हर्गोस गोल्डन बूट विजेता आहे.
क्लौडिओ ब्रावो हा गोल्डन ग्लोव्ह्ज विजेता आहे.


६१. नेपाळ संविधान जोड्या लावा
वरिष्ठ सभागृह जागा – ५९
कनिष्ठ सभागृह जागा – २७५
एकूण कलम – ३०८
एकूण विभाग – ३५


६२. २२ मार्च १९४५ रोजी अरब लीगची स्थापना झाली.  इराक हा अरबलीगचा संस्थापक सदस्य आहे. नोव्हेंबर २०११ पासून अरब लीगमधून सीरियाचे निलंबन करण्यात आलेले आहे.


६३. मंत्री जोड्या लावा
डी.व्ही. सदानंद गौडा – कायदा व न्याय
अरुण जेटली – माहिती व प्रसारण
श्रीमती मनेका गांधी – महिला व बालविकास
राधा मोहन सिंह – कृषी व शेतकरी


६४. २० एप्रिल २०१६ रोजी दिल्लीतील ‘नॅशनल म्युसिअम ऑफ नॅचरल हिस्ट्री‘ हे महत्वाचे राष्ट्रीय संग्रहालय भीषण आगीत जवळपास नष्ट झाले.


६५. साहित्य अकादमी २०१४
अश्विन मेहता – गुजराती
जयंत नारळीकर – मराठी
गोपाळ कृष्ण रथ – उडिया
रमेश चंद्र शाह – हिंदी


६६. बलुतं या आत्मकथनाबाबत वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहेत.


६७. डी.सी.बी. बँकेने बंगलोर येथे आधार आधारित ATM च्या वापराची सोया प्रथमतः उपलब्ध केली.


६८. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी पार पडली. संविधान सभेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान स्वीकारले. डॉ. सच्चिदानंद सिंह संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष होते. संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद होते.


६९. राज्य सरकार आणि राज्यपाल यांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी भारतीय कलम 165 नुसारच एक महाधिवक्त्याचे पद निर्माण केलेले आहे. भारतीय राज्यघटनेत महाधिवक्त्याच्या तसा कार्यकाल ठरवून दिलेला नाही परंतु त्याचे निवृत्ती वय 62 वर्षे ठरवून दिलेले आहे.महाधिवक्त्याला दरमहा रुपये 80,000/- वेतन प्राप्त होते. त्याशिवाय त्याच्या पदाला साजेल व शोभेल अशा सर्व सुविधांनी युक्त त्याला निवासस्थान मोफत दिले जाते. सभागृहात मतदानाव्यतिरिक्त राज्य विधिमंडळ सदस्यांना मिळणारे सर्व विशेषाधिकार माधिवक्त्याला उपाभोगता येतात.


७०. मार्गदर्शक तत्वे जोड्या
गो हत्या प्रतिबंध – कलम ४८
समान नागरी कायदा – कलम ४४
 राष्ट्रीय स्मारकांचे संरक्षण – कलम ४९
ग्राम पंचायत – कलम ४०


७१. भारतीय राज्यघटनेच्या कलम २१-अ नुसार सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केलेली आहे.


७२. ७३ वी घटनादुरुस्ती जोड्या
पर्याप्त अधिकारांसह ग्रामसभेची स्थापना – २४३ अ
ग्रामपातळीवर ग्रामपंचायतींची स्थापना – २४३ ब 
सामान्यपणे ग्रामपंचायतीचा कार्यकाळ – २४३ इ 
अनुसूचित जाती जमाती आरक्षण – २४३ ड


७३. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये न्याय या शब्दाचा प्रथम उल्लेख करण्यात आलेला आहे.


७४. भारतीय राज्यघटनेतील कलम ४० हे पंचायत राजशी संबंधित आहे.


७५. मूलभूत कर्तव्यासंबंधी सर्व विधाने बरोबर आहेत.