‘नीट’ मध्ये प्रश्नपत्रिकेचा एकच संच 
एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमात प्रवेशासाठी घेण्यात येणा-या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेत (नीट) बसणा-या विद्यार्थ्यांसाठी यावर्षीपासून प्रश्नपत्रिकेचा एकच संच राहणार असल्याची माहिती केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डने (सीबीएसई) उच्च न्यायालयात दिली.


संकल्प चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्तीद्वय अरुण मिश्रा आणि एफ. ए. नजीर यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. 

सीबीएसईने न्यायालयात सांगितले की, पूर्वी विद्यार्थ्यांना हिंदी आणि इंग्रजीसह १० भाषांमध्ये ‘नीट’ परीक्षा देण्याची मुभा होती. 

सीबीएसईने न्यायालयाच्या सूचनांवर होकार दर्शवीत सध्याच्या शैक्षणिक सत्रापासून प्रश्नपत्रिकेचा एकच संच राहील आणि त्याचा अनुवाद वेगवेगळ्या भाषांमध्ये करण्यात येईल, असे सांगितले



लष्करी कर्मचार्‍यांना प्रदान करण्यासाठी शौर्य पुरस्कारांची घोषणा
२०१८ सालच्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारतीय लष्कराच्या कर्मचार्‍यांना एक किर्ती चक्र आणि नऊ शौर्य चक्र प्रदान केले जाणार आहेत.

जम्मू-काश्मीर लाइट इन्फंट्री विभागाच्या चौथ्या तुकडीचे मेजर विजयन बिस्त यांना किर्ती चक्र दिला जाईल. मेजर अखिल राज आर.व्ही., कॅप्टन रोहित शुक्ला, कॅप्टन अभिनव शुक्ला, कप्तान प्रदीप शौरी आर्य, हवलदार मुबारक अली, हवालदार रवींद्र थापा, नाईक नरेंद्र सिंह, लान्स नाईक बदर हुसेन आणि पॅराट्रूपर मांचू यांना शौर्य चक्र प्रदान केले जाईल.

किर्ती चक्र आणि शौर्य चक्र (१९५२ सालापासून) हे लष्कराच्या कर्मचार्‍यांना शांती काळात दाखविलेल्या शौर्यासाठी दिले जाणारे राष्ट्रीय पदक आहेत. महावीर चक्र नंतर किर्ती चक्र आणि शौर्य चक्र हे अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या श्रेणीत मोडणारे सन्मान आहेत.


वर्ष २०१६ साठी ‘प्रधानमंत्री श्रम पुरस्कार’ यांची घोषणा
वर्ष २०१६ साठी प्रधानमंत्री श्रम पुरस्‍कारांची घोषणा करण्यात आली आहे. हे पुरस्‍कार विभागीय उपक्रम, केंद्र आणि राज्‍य शासनाच्या सार्वजनिक क्षेत्राचे उपक्रम आणि खाजगी क्षेत्राचे संयंत्रामध्ये (plant) कार्यरत ५० कामगारांना प्रदान केले जातील.

यावेळी श्रम पुरस्‍कारांची एकूण संख्‍या ३२ आहे, मात्र त्यात ३ महिलांसह ५० कामगारांचा समावेश आहे. यामध्ये सार्वजनिक क्षेत्राचे ३४ तर खाजगी क्षेत्राचे १६ कामगार सामील आहेत. 

यावेळी श्रम रत्‍न पुरस्‍कारासाठी कोणाही पात्र ठरले नाही. १२ जणांना श्रम भूषण पुरस्‍कार, १८ जणांना श्रम वीर/श्रम वीरांगना, २० जणांना श्रम श्री/श्रमदेवी पुरस्‍कार दिले जाणार.

श्रम पुरस्‍कार (१९८५ सालापासून) चार श्रेणींमध्ये प्रदान केला जातो. ते आहेत – श्रम रत्‍न पुरस्‍कार, श्रम भूषण पुरस्‍कार, श्रम वीर/श्रम वीरांगना, श्रम श्री/श्रमदेवी पुरस्‍कार. 

या पुरस्काराच्या निवड प्रक्रियेत ५०० हून अधिक कामगार असलेल्या उपक्रमांमधून ‘औद्योगिक विवाद अधिनियम-१९४७’ अनुसार विजेत्या कामगारांची निवड केली जाते. 

श्रम भूषण पुरस्‍कार स्वरूप १ लाख रुपये रोख पुरस्‍कार आणि एक सनद, श्रमिक श्रम वीर/श्रम वीरांगना पुरस्‍कार स्वरूप ६०००० रुपये रोख आणि एक सनद, श्रम श्री/श्रमदेवी पुरस्‍कार स्वरूप ४०००० रुपये रोख आणि एक सनद प्रदान जाते.



शीला दीक्षित लिखित ‘दिल्ली मेरी दिल्ली: बिफोर अँड आफ्टर १९९८’ पुस्तक प्रकाशित
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित याच्या ‘दिल्ली मेरी दिल्ली: बिफोर अँड आफ्टर १९९८’ पुस्तकाचे अनावरण करण्यात आले आहे.

दिल्लीच्या उत्क्रांतीबाबत आणि प्रकाशात न आलेल्या अनेक छोट्या-छोट्या गोष्टींना उजाळा या पुस्तकाच्या माध्यमातून मिळालेला आहे. दिल्लीच्या रहिवासी शीला दीक्षित या १५ वर्षे मुख्यमंत्री म्हणून सेवेत होत्या.



चीनी शास्त्रज्ञांनी जगातला प्रथम क्लोन मकाउ बंदर तयार केला
चीनी शास्त्रज्ञांनी क्लोनिंग तंत्राचा वापर करून जगातले प्रथम दोन क्लोन मकाउ बंदर तयार केले आहेत. या दोन्ही बंदरांना हुआ हुआ आणि चोंग चोंग असे नाव दिले आहे.

त्यांचा जन्म शंघाई स्थित चायना अकॅडेमी ऑफ सायंसेज (CAS) इंस्टिट्यूट ऑफ न्यूरोसायंस येथे प्रयोगशाळेत झाला. यासाठी सिमॅटिक सेल न्यूक्लियर ट्रांसफर नावाच्या क्लोनिंग तंत्राचा वापर केला गेला.

२० वर्षाआधी चीनी शास्त्रज्ञांनी डॉली नामक मेंढी तयार केली होती. या यशानंतर क्लोनिंग तंत्रामधील अडथळे संपुष्टात आले आहे असा दावा करण्यात आला आहे. प्रयोगशाळेमध्ये प्रयोगादरम्यान बंदरांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.