ओडिशाच्या पहिल्या महिला चित्रपट दिग्दर्शक पारबती घोष यांचे निधन
प्रसिद्ध ओडिया अभिनेत्री, निर्माता आणि दिग्दर्शक पारबती घोष यांचे निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या.


ओडिशाच्या पारबती घोष यांना त्यांच्या कारकि‍र्दीत ‘लक्ष्मी’, ‘का’ आणि ‘स्त्री’ यासारख्या चित्रपटांमधील भूमिकेसाठी ‘राष्ट्रीय फिल्म पुरस्कार’ ने सन्मानित करण्यात आले होते. 

वर्ष १९७३ मध्ये गौरा प्रसाद घोष यांच्यासह पारबती घोष यांनी ‘संसारा’ या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. १९८० च्या दशकात त्यांना तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.



चंद्रशेखर कंबार साहित्य अकादमीचे नवे अध्यक्ष
साहित्‍य अकादमीच्या अध्‍यक्ष पदावर चंद्रशेखर कंबार यांची निवड करण्यात आली आहे.

चंद्रशेखर कंबार कन्‍नड भाषेचे कवी आणि लेखक तसेच चित्रपट दिग्दर्शक आहेत. पूर्वी ते हम्‍पीमधील कन्‍नड विद्यापीठाचे संस्‍थापक कुलगुरू देखील होते.

शिवाय, हिंदी कवी माधव कौशिक यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. अनंथामुर्थी यांच्यावेळी झालेल्या निवडणुकीनंतर ही या पदासाठीची दुसऱ्यांदा निवडणूक होती.

साहित्य अकादमी ही भारतीय साहित्याच्या विकासासाठी सक्रिय कार्य करणारी राष्ट्रीय संस्था आहे. याची स्थापना १२ मार्च १९५४ रोजी भारत सरकारकडून केली गेली. उच्च साहित्यीक मानदंड स्थापित करणे आणि साहित्य क्षेत्राला पोशाक वातावरण देणे या उद्देशाने याची स्थापना करण्यात आली.



भारतात प्रथमच ‘वैश्विक रंगभूमी ऑलंपिक’ होणार
१७ फेब्रुवारी ते ८ एप्रिल २०१८ या कालावधीत भारतात आठवे ‘वैश्विक रंगभूमी ऑलंपिक (Global Theatre Olympics)’ चे आयोजन केले जाणार आहे. हा कार्यक्रम ‘फ्लॅग ऑफ फ्रेंडशिप’ या विषयाखाली चालणार. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या (NSD) वतीने करण्यात येणार आहे.

यावर्षी भारतात प्रथमच या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. या कार्यक्रमात जगभरातील ३० देशांचा सहभाग असणार आहे. दिल्लीत लालकिल्यात उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात येणार आणि मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया वर या कार्यक्रमाचा समारोप होणार.

२५ हजारांहून अधिक कलाकारांचा यात सहभाग असणार आहे. याचे आयोजन दिल्ली, चेन्नई, बेंगळूरू, भोपाल, चंदीगड, कोलकाता, तिरुअनंतपुरम, पटना, आगरतळा, गुवाहाटी, जयपुर, जम्मू, अहमदाबाद आणि मुंबई याखेरीज देशाच्या आणखी १७ शहरांमध्ये होणार.

वर्ष १९९५ मध्ये ग्रीसच्या डेल्फाई शहरात प्रथम वैश्विक रंगभूमी ऑलंपिक आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर जपान (१९९९), रशिया (२००१), टर्की (२००६), दक्षिण कोरिया (२०१०), चीन (२०१४), पोलंड (२०१६) मध्ये ऑलंपिकचे आयोजन केले गेले.



पूर्व चंपारण जिल्ह्यातील पहिल्या दुग्धालयाची कोणशीला ठेवली गेली
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री राधामोहन सिंह यांच्या हस्ते मोतिहारीमध्ये पूर्व चंपारण जिल्ह्यामधील पहिल्या दुग्धालयाची कोणशीला ठेवण्यात आली आहे.

भारत दूध उत्‍पादनात जागतिक पातळीवर पहिल्या क्रमांकावर आहे. वर्ष २०१६-१७ मध्ये दूध उत्‍पादन १६५.४ दशलक्ष टनवर पोहचलेले आहे. वर्ष २०१३-१४ च्या तुलनेत वर्ष २०१६-१७ मध्ये दूध उत्‍पादनात २०.१२% ची वाढ झालेली आहे. 

वर्ष २०१६-१७ मध्ये दर व्यक्तीला ३५५ ग्राम दूध उपलब्‍धता असे प्रमाण होते. मागील तीन वर्षांमध्ये भारतात दूध उत्‍पादनात वार्षिक ६.३% च्या वृद्धी नोंदवली गेली, जी वैश्विक वृद्धीदर २.१% हून अधिक आहे.

देशात जवळपास ८ कोटी शेतकरी दुग्ध व्‍यापाराशी जुळलेले आहेत. दुधाच्या देशी जातींचे संरक्षण आणि विकास करण्यासाठी डिसेंबर २०१४ मध्ये पहिल्यांदा देशात ‘राष्‍ट्रीय गोकुल अभियान’ सुरू केले गेले.


भारताचा द. आफ्रिकेत ऐतिहासिक मालिका विजय
रोहित शर्माने केलेली शतकी खेळी आणि त्यानंतर भारतीय फिरकीने उडवलेली यजमानांची दाणादाण याच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. 

भारताने १३ फेब्रुवारी रोजी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७३ धावांनी पराभव केला. रोहितच्या शतकी खेळीनंतर कुलदीपने चार गडी बाद करत भारताच्या विजयात मोलाची कामगिरी केली. 



आशियाई खेळांमध्ये बास्केटबॉलचे रौप्यपदक भारताकडे
जकार्ता (इंडोनेशिया) मध्ये सुरू असलेल्या ‘आशियाई खेळ’ मध्ये भारतीय पुरुष बास्केटबॉल संघाने ५x५ बास्केटबॉल चाचणी प्रकारात रौप्यपदक पटकावले. भारतीय संघाचा थायलंडकडून पराभव झाला.

आशियाई खेळ (Asian Games) किंवा एशियाड ही दर चार वर्षांनी आशियामधील देशांदरम्यान भरवली जाणारी एक बहु-क्रीडा स्पर्धा आहे. या स्पर्धेचे आयोजन आशिया ऑलंपिक मंडळाकडून केले जाते. 

आशिया ऑलंपिक मंडळ ही आंतरराष्ट्रीय ऑलंपिक मंडळाची (IOA) एक पाल्य संस्था आहे. १९५१ साली नवी दिल्ली (भारत) मध्ये पहिल्यांदा आशियाई खेळांचे आयोजन केले गेले होते. 



दुबईत ६ वी ‘जागतिक सरकार शिखर परिषद’ संपन्न
११-१३ फेब्रुवारी २०१८ रोजी सहावी ‘जागतिक सरकार शिखर परिषद (WGS)’ दुबई (संयुक्त अरब अमीराती) मध्ये संपन्न झाली. भारत यावर्षी या कार्यक्रमाचा अतिथी देश होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केले गेले होते.

या परिषदेत १४० देशांमधून ४००० हून अधिक प्रतिनिधींनी भाग घेतला. याप्रसंगी आयोजित पुरस्कार सोहळ्यात UAE ने सर्वोत्कृष्ट मोबाईल सेवांकरिता दोन पुरस्कार पटकावले, ते म्हणजे – दुबई पोलीसचे अॅप (प्रोटेक्टिंग ह्यूमन लाइफ श्रेणी) आणि UAE ह्यूमन रिसोर्सेज अँड एमिरेटायझेशन मिनिस्ट्रीचे अॅप (अनेबलिंग बिजनेस श्रेणी).

जागतिक सरकार शिखर परिषद (WGS) हा विश्वव्यापी सरकारच्या भवितव्याला आकार देण्यासाठी समर्पित वैश्विक मंच आहे. वर्ष २०१३
 मध्ये पहिल्यांदा ही परिषद आयोजित केली गेली होती.



दक्षिण आफ्रिकेत दुष्काळामुळे ‘राष्ट्रीय आपत्ती’ घोषित
दक्षिण आफ्रिकेत १३ फेब्रुवारी २०१८ रोजी देशातील उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे देशात ‘राष्ट्रीय आपत्ती’ घोषित करण्यात आली आहे.

देशात स्थानिक नळाला पाणी नसण्याचा धोका उद्भवलेला आहे. देशात सलग तीन वर्षांपासून दुष्काळाची तीव्र परिस्थिती आहे. त्यामुळे धरणामधील पाण्याची पातळी अत्याधिक खाली आली आहे.

दक्षिण आफ्रिका हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला असलेला एक देश आहे. केपटाउन ही देशाची राजधानी (वैधानिक) आहे. रँड हे देशाचे चलन आहे.