शिवजयंती सोहळ्यास राष्ट्रपती प्रमुख पाहुणे 
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे दिल्ली येथे होणाऱ्या शिवजयंती सोहळ्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांना सोहळ्यासाठी आमंत्रित केले.


छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीत थाटामाटात साजरी करण्यात येत आहे. 

देशभरातून हजारो शिवभक्तांची दिल्लीत उपस्थिती असणार आहे. या सोहळ्यासाठी संभाजीराजे यांनी श्री. कोविंद यांची भेट घेऊन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले. हे आमंत्रण श्री. कोविंद यांनी स्वीकारले आहे. 

तसेच याबरोबर लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत , नौसेनाप्रमुख ॲडमिरल सुनील लांबा , जनरल पनू , श्रीमंत शाहू छत्रपती महाराज विशेष उपस्थित राहणार आहेत.



पंजाब नॅशनल बँकेच्या एकाच शाखेत $1.77 अब्जचा घोटाळा
पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईमधील एकाच शाखेत तब्बल $1.77 अब्ज (जवळपास ११३०० कोटी रुपये) चा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे.

बँकेत झालेल्या व्यवहारांच्या आधारावर अन्य बँकांनी बहुतेक काही ग्राहकांना परराष्ट्रात कर्ज दिलेले आहे. या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी प्रकरण कायदा अंमलबजावणी संस्थांकडे सोपवण्यात आले आहे.



दिल्लीत देशातला पहिला ‘रेडियो महोत्सव’ साजरा
दिल्लीमध्ये १५ फेब्रुवारी २०१८ रोजी भारतातला पहिला ‘रेडियो महोत्सव’ साजरा करण्यात आला.

UNESCO च्या सहकार्याने हा महोत्सव ‘इंटरनॅशनल ऑफ विमेन इन रेडियो अँड टेलिव्हिजन’ तर्फे आयोजित केला गेला. याप्रसंगी थेट कलाप्रदर्शन, प्रदर्शनी आणि चर्चासत्रे अश्या कार्यक्रमांचे आयोजन केले गेले.

इंटरनॅशनल ऑफ विमेन इन रेडियो अँड टेलिव्हिजन (IAWRT) ही प्रसारण उद्योगातील महिलांची एक संघटना आहे. 

१९४९ साली IAWRT ची स्थापना करण्यात आली. याचे अँस्टरडॅममध्ये मुख्यालय आहे. ही इलेक्ट्रॉनिक आणि संबंधित प्रसार माध्यमांच्या शिक्षण क्षेत्रात कार्यरत व्यावसायिक महिलांची संघटना आहे. IAWRT ला संयुक्त राष्ट्रसंघ वित्तीय व सामाजिक परिषद (ECOSOC) सह सल्लागार दर्जा प्राप्त आहे.


NTPC बांग्लादेशाला 300 MW वीज पुरविणार
NTPC विद्युत व्यापार निगम (NVVN) ने बांग्लादेशाला १५ वर्षांपर्यंत ३०० मेगावॉट (MW) वीजपुरवठ्याचे कंत्राट मिळविलेले आहे.

कंत्राटानुसार, बांग्लादेशाला ही वीज ३.४२ रुपये प्रति यूनिट या अंदाज दराने उपलब्ध करून दिली जाणार. यापासून NTPC ला दरसाल ९०० कोटी रुपये महसूल प्राप्त होणार.

भारत आणि बांग्लादेश दरम्यानचा ५०० MW ‘हाय-व्होल्टेज डायरेक्ट करंट (HVDC) इंटर-कनेक्शन’ प्रकल्प चालू झाल्यानंतर वीजपुरवठा जून २०१८ पासून सुरू होण्याचे अपेक्षित आहे. भारत सध्या 600 MW वीज बांग्लादेशकडे निर्यात करीत आहे.



देशात २५ वैद्यकीय महाविद्यालयांच्या स्थापनेस केंद्र शासनाची मंजुरी
केंद्र शासनाने देशात २५ वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास मान्यता दिली आहे.

संस्थेच्या स्थापनेसाठी केंद्राकडून प्रत्येक २५० कोटी रुपयांची तरतूद मान्य करण्यात आली आहे. एकट्या बिहारमध्ये पाच विभागांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येणार आहेत.



नेपाळच्या पंतप्रधानपदी के.पी. शर्मा ओली
के.पी. शर्मा ओली यांनी १५ फेब्रुवारी रोजी नेपाळचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. 

सीपीएन माओवादी पक्षासोबतच्या ओली यांच्या डाव्या आघाडीने संसदेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर या देशात राजकीय स्थैर्य प्रस्थापित होईल, अशी आशा पल्लवित झाली आहे.

महाराजगंज येथील राष्ट्रपतींच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी ६५ वर्षांचे ओली यांच्यासह सीपीएन-यूएमएलच्या दोन इतर मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तसेच के.पी. शर्मा ओली हे नेपाळचे ४१ वे पंतप्रधान आहेत.



दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती जॅकोब जुमा यांचा राजीनामा
दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती जॅकोब जुमा यांनी आपल्या राष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला आहे. यासोबतच जुमा यांचा नऊ वर्षांचा कार्यकाळ दुसर्‍या आणि अंतिम कार्यकाळाच्या नऊ महिन्याआधीच संपुष्टात आला.

उपराष्ट्रपती सायरिल रामाफोसा यांना अंतरिम राष्ट्रपती बनविण्याचा निर्णय आफ्रिकन नॅशनल कॉंग्रेस (ANC) या सत्तारूढ पक्षाचा आहे. नव्या निवडणुका होईपर्यंत रामाफोसा पदावर असतील. ANC सोबत चाललेल्या विरोधाभासाच्या पार्श्वभूमीवर जॅकोब जुमा यांनी हा निर्णय घेतला.

दक्षिण आफ्रिका हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला असलेला एक देश आहे. केपटाउन ही देशाची राजधानी (वैधानिक) आहे. रँड हे देशाचे चलन आहे.