पृथ्वी

सर्वप्रथम निकोलस कोपर्निकस याने सूर्यकेंद्री सिद्धांत मांडला. त्याने रिव्हॅल्यूनिम्ब्स या ग्रंथात हा सिद्धांत मांडला.

गॅलिलिओने या सिद्धांताची पुष्टी केली. यासंदर्भात त्याने एका दुर्बिणीचा देखील शोध लावला. त्यामुळे गॅलिलिओवर खटला चालविण्यात आला. हा खटला १९९२ साली मागे घेण्यात आला. पण त्याच्या ३५० वर्ष पूर्वीच म्हणजे १६४२ सालीच गॅलिलिओचा मृत्यू झाला होता.

पृथ्वीला सूर्याभोवती एक परिभ्रमण पूर्ण करण्यासाठी ३६५ दिवस ५ तास ४८ मिनटे ४६ सेकंद लागतात.परिवलनालाच स्वांग परिभ्रमण असे म्हणतात.

पृथ्वीचे परिवलन पश्चिमेकडून पूर्वेकडे होते.पृथ्वीकेन्द्री सिद्धांताचा जनक टोलेमी आहे.

पृथ्वीची त्रिज्या – ६३७१ किमी

पृथ्वीचा विषुवृत्तीय व्यास – १२७५६ किमी

पृथ्वीचा विषुवृत्तीय परीघ – ४००७५ किमी

पृथ्वीचा परीघ मोजण्याचे काम सर्वप्रथम इरेस्टोथेनिसने केले.

पृथ्वीची सरासरी घनता ५.५ किमीपृथ्वीचा आस २३.५° कललेला असतो.

पृथ्वीचे एकूण क्षेत्रफळ – ५१.०५ कोटी चौकिमी
त्यापैकी पाणी – ३६.११ कोटी चौकिमी (७०.८०%)
त्यापैकी भूभाग – १४.८९ कोटी चौकिमी (२९.२०%)

पृथ्वीचा आकार लंबवर्तुळाकार जीऑईड आहे.

चंद्र

पृथ्वी ते चंद्र अंतर – ३८४००० किमी
उपभू स्थितीत अंतर – ३५६००० किमी
अपभू स्थितीत अंतर – ४०७००० किमी
पौर्णिमेला चंद्राचा ५९% भाग दिसत असतो. एकूण प्रकाशाच्या ७% भाग चंद्रावरून परावर्तीत असतो.
चंद्राचा परिभ्रमण काळ – २७ दिवस ७ तास ४३ मिनटे ११.५ सेकंद
याच्याइतकाच चंद्राचा परिवलन काळ आहे. यालाच नक्षत्रमास म्हणतात. चांद्रमास म्हणजे २९ दिवस १२ तास ४४ मिनटे २ सेकंद.
चांद्रवर्ष – ३५५ दिवस
सौरवर्ष – ३६५ दिवस

चंद्रावर तापमान

– ज्या भागात प्रकाश असतो त्या भागात – १२१°C
– ज्या भागात प्रकाश नसतो त्या भागात – १५६°C
चंद्र दर पुढील दिवशी ५२ मिनटे उशिरा उगवतो.समुद्राला येणारी भरती व ओहोटी चंद्रावर विसंबून असते.
एका दिवसातून समुद्राला दोन वेळा भरती व दोन वेळा ओहोटी येते. दोन ओहोटी किंवा दोन भरती मधील अंतर १२ तास ५२ मिनटे असते.
भरती व ओहोटी मधील अंतर ६ तास २६ मिनटे असते.

चंद्रग्रहण व सूर्यग्रहण

चंद्रग्रहण वर्षातून २ ते ३ वेळा होते.पृथ्वीची परिभ्रमण कक्षा आणि चंद्राची परिभ्रमण कक्षा यांच्यात ५°८’ चा कोण होतो. म्हणून प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण होत नाही.
खग्रास चंद्रग्रहण प्रच्छायेत असते. त्याचा कालावधी १ तास ४७ मिनटे असतो. खंडग्रास चंद्रग्रहण उपछायेत असते.
सूर्यग्रहण अमावास्येलाच होत असते. एका वर्षात २ ते ५ वेळा सूर्यग्रहण होते.
खग्रास सूर्यग्रहण कालावधी – १५ मिनटे
कंकणाकृती सूर्यग्रहण कालावधी – ७.५ मिनटे
अक्षवृत्त व रेखावृत्त सर्वात मोठ्या अक्षवृत्ताला विषुवृत्त म्हणतात. तर सर्वात लहान बिंदू स्वरूप अक्षवृत्ताला ध्रुव म्हणतात.
विषुवृत्तामुळे पृथ्वीचे दक्षिण गोलार्ध व उत्तर गोलार्ध असे दोन भाग पडतात.अक्षवृत्ताचे विषुवृत्तापासूनचे अंतर अंशामध्ये सांगितले जाते. त्यास अक्षांश म्हणतात.
पृथ्वीवर १८१ अक्षवृत्ते मानली जातात. सर्व रेखावृत्तांची लांबी सारखीच असते. दोन रेखावृत्तामधील अंतर विषुवृत्तावर जास्तीत जास्त असते.
यु.के. मधील ग्रीनिच शहरातून जाणारे रेखावृत्त शून्य रेखावृत्त मानले जाते. त्यास मूळ रेखावृत्त असेही म्हणतात.
पृथ्वीच्या पृष्ठभागावर ३६० रेखावृत्त मानली जातात. रेखावृत्तातील अंतर मूळ रेखावृत्तापासून अंशात सांगतात. त्यास रेखांश असे म्हणतात.
अक्षवृत्त व रेखावृत्त यांच्या जाळीस वृत्तजाळी असे म्हणतात.
दोन अक्षवृत्तामधील अंतर १११ किमी असते. अक्षवृत्ताचा उपयोग हवामानासाठी होतो.
विषुवृत्त तसेच दोन समोरासमोरील रेखावृत्ते मिळून तयार होणाऱ्या वर्तुळास बृहद्वृत्त म्हणतात.
बृहद्वृत्ताची लांबी पृथ्वीच्या परिघाइतकी असते. प्रकाशवृत्त हेसुद्धा बृहद्वृत्त आहे.
प्रत्येक एक अंश अंतरावरील रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत ४ मिनटांचा फरक असतो.
आपल्याकडे अरुणाचल प्रदेश व गुजरात यांच्यात साधारणतः १ तास ५६ मिनटाचा फरक पडतो. 
भारताची प्रमाणवेळ हि ८२°३०’ पूर्व या रेखावृत्तावरून ठरवली आहे. हे रेखावृत्त अलाहाबाद वरून जाते.
भारताची प्रमाणवेळ ग्रीनिच वेळेपेक्षा ५ तास ३० मिनटानी पुढे आहे.
जागतिक संकेतानुसार पृथ्वीवर तारीख व वार १८०° रेखावृत्तावर बदलले जातात. आंतरराष्ट्रीय वाररेषा वॉन वायहेक या शास्त्रज्ञाने शोधून काढली.
भारताचा अक्षवृत्तीय विस्तार ८°४’ उत्तर ते ३७°६’ उत्तर आहे.भारताचा रेखावृत्तीय विस्तार ६८°७’ पूर्व ते ९७°२४’ पूर्व आहे.
रेखावृत्ताची आवश्यकता जागतिक प्रमाणवेळेसाठी असते. दोन रेखावृत्तामधील अंतर १११.३२ किमी असते.
इंदिरा पॉईंट हे भारताचे मालकीचे सर्वात दक्षिणेकडील भाग आहे. अक्षवृत्तीय स्थान ६°४५’ आहे.
कुठल्याही देशाची प्रमाणवेळ त्या देशाच्या मध्य भागातून जाणाऱ्या रेखावृत्तावरून ठरते.