* कर्नाटक मधील जमखंडी येथे झालेल्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धा २०१५ मध्ये सोलापूर जिल्ह्यातील संगोल्याचा सुनील साळुंके विजयी हिंद केसरी ठरला. त्याने हरयाणाच्या रितेश याचा पराभव केला. 
* ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा २०१५ मध्ये पुरुष एकेरीत सर्बिया च्या नोव्हाक जोकोव्हीच ने ब्रिटन च्या एंडी मरे चा पराभव केला. तर महिला एकेरीत अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने रशियाच्या मारिया शारापोवा हिचा पराभव केला. 
* मिश्र दुहेरीत भारताच्या लिएंडर पेस याने स्वित्झरलैंड च्या मार्टिना हिंगीस हिच्या सोबत मिळून युगोस्लावियाच्या डैनियल नेस्टर व फ्रान्सच्या क्रिस्टीना म्लादनोव्हिक यांचा पराभव केला. 
* कॉमन मैन या नावाने ओळखले जाणारे ज्येष्ठ व्यंग चित्रकार आर.के. लक्ष्मण यांचे २६ जानेवारी २०१५ रोजी वयाच्या ९४ व्या वर्षी पुण्यात निधन झाले. 
* प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रचा चित्ररथ ‘पंढरीची वारी’ याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. हि संकल्पना संजय पाटील यांची होती. 
* ३५ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा केरळ येथे पार पडल्या. 
* डीआरडीओ चे माजी संचालक अविनाश चंदर हे अग्नी ५ क्षेपणास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात. 
* अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना “इंटरसर्व्हिस गार्ड ऑफ ऑनर” देणाऱ्या पथकाचे नेतृत्व विंग कमांडर ‘पूजा ठाकूर’ यांनी केले. 
* सेन्ट्रल बैन्किंग या ब्रिटीश मासिकाकडून “सेन्ट्रल बँकिंग अवार्ड्स २०१५” मध्ये “गवर्नर ऑफ द इयर” हा पुरस्कार भारतीय रिजर्व बँकेचे गवर्नर डॉ. रघुराम राजन यांना देण्यात आला.
* २०१५ या वर्षाचा ज्ञानपीठ पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना देण्यात आला. 
* ज्ञानपीठ मिळवणारे नेमाडे(२०१५) हे वि.स.खांडेकर (१९७४), वि.वा.शिरवाडकर (१९८७), विंदा करंदीकर (२००३) यांच्यानंतर चौथे मराठी साहित्यिक ठरले. 

* त्यांचे महत्वाचे कवितासंग्रह मेलडी (१९७०) व देखणी (१९९०) आहेत. 
* त्यांच्या महत्वाच्या कादंबऱ्या कोसला (१९६३), बिढार (१९७५), हूल (१९७५), जरीला (१९७७), झूल (१९७९), हिंदू-जगण्याची समृद्ध अडगळ (२०११) हे आहेत. 
* हिंदू हि कादंबरी तीन भागात प्रकाशित होणार आहे. 
* चौथे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन ७ फेब्रुवारी २०१५ पासून नांदेड येथे आयोजित करण्यात आले. याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. 
* राज्यात शासकीय महाविद्यालयात कार्यरत असलेल्या वैद्यकीय शिक्षकांचे सेवा निवृत्ती वय ६३ वरून ६४ वर्ष करण्यात आले आहे. मात्र अन्य विद्याशाखामध्ये हे वय ५८ वर्ष आहे.