राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2015

१. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट’चा देशातील यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून सुवर्णकमळ देऊन गौरव झाला.

 २. सुवर्णकमळासोबतच चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शक यांना प्रत्येकी अडीच लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
३. कोर्टबरोबरच किल्ला, एलिझाबेथ एकादशी, ख्वाडा या मराठी चित्रपटांचाही राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान झाला. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘एलिझाबेथ एकादशी’ सर्वोत्तम बालचित्रपट अविनाश अरुण दिग्दर्शित ‘किल्ला’चा मराठी भाषेतील सर्वोत्तम चित्रपट पुरस्काराने गौरव झाला.   रवींद्र जाधव दिग्दर्शित व अथांश कम्युनिकेशन्स निर्मित ‘मित्रा’ला सर्वोत्तम लघुपट पुरस्काराने गौरविण्यात आले.  ‘ख्वाडा‘ या चित्रपटासाठी महावीर सब्बनवाल यांना लोकेशन साऊंड रेकॉर्डिस्टचा पुरस्कार, तर भाऊराव कऱ्हाडे यांना विशेष ज्युरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘किल्ला’ आणि ‘भूतनाथ रिटर्न्स’ या चित्रपटांतील बाल कलाकाराच्या भूमिकांसाठी पार्थ भालेरावला विशेष उल्लेखनीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
४.  ‘क्वीन’ हा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला. ‘क्वीन‘ चित्रपटातील भूमिकेसाठी कंगना राणावत हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
५. ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना मानाच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.’मेरी कोम’ ठरला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट
६. सुखविंदर सिंगला ‘हैदर‘मधील गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा पुरस्कार

७. ‘हैदर’ चित्रपटाने पाच वेगवेगळ्या श्रेणींमध्ये राष्ट्रीय पुरस्कार पटकावले
८. ‘नानू अवनल्ला अवलू’ या कन्नड चित्रपटातील अभिनयासाठी अभिनेता विजयला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची यादी:

०१. सर्वोत्कृष्ट सिनेमा– कोर्ट (मराठी)
२. सर्वोत्कृष्ट लोकप्रिय सिनेमा – मेरी कोम (हिंदी)
०३. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – श्रीजीत मुखर्जी (चतुष्कोन) बांगला
०४. सर्वोत्कृष्ट अभिनेता – नानू अवानल्ला अवालू (विजय)
५. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – कंगना राणावत (क्वीन)
०६. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पण – अशा जोआर माझे
०७. सर्वोत्कृष्ट हिंद सिनेमा – क्वीन
८. सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा – किल्ला
०९. सर्वोत्कृष्ट बालचित्रपट – एलिझाबेथ एकादशी
१०. सर्वोत्कृष्ट लघुपट – मित्रा – रवी जाधव
११. सर्वोत्कृष्ट विशेष उल्लेखनीय सिनेमा
१२. मराठी – किल्ला
१३. हिंदी – भूतनाथ रिटर्न
१४. कोंकणी – नाचोम
१५. मल्याळम – ऐन
१६. सर्वोत्कृष्ट ज्युरी पुरस्कार – ख्वाडा
१७. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – सुखविंदर सिंग (बिस्मिल – हैदर)
१८. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – उत्तरा उन्निकृष्णन (सैवम)
१९. सर्वोत्कृष्ट ओरिजनल साऊंड पुरस्कार – ख्वाडा
२०. सर्वोत्कृष्ट वेशभूषा – डॉली अहलूवालिया (हैदर)
२१. सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक – विशाल भारद्वाज (हैदर)
२. सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक – बिस्मिल (हैदर)