०१. राज्यातील पहिले कायम स्वरूपी बालन्यायालय नाशिक जिल्ह्यात सुरु करण्यात आले आहे. 

०२.  राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ धुळे शहरात आहे. 

०३. आदिवासी वन संरक्षण कायदा २००४ साली पारित झाला. 

०४. मुंबई पुणे द्रुतगती मार्गास यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्यात आले आहे. 

०५. आंध्र प्रदेश राज्यातील एका दलित वस्तीस नुकतेच म्यानमार च्या नेत्या आन सान्ग स्यू की ह्यांचे नाव देण्यात आले आहे.

०६.  महाराष्ट्रात जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष पालक मंत्री असतात. 

०७. अमरावती येथे सन १९३२ मध्ये ‘श्री शिवाजी शिक्षण संस्थे’ची स्थापना डॉ. पंजाबराव देशमुख यांनी केली.

०८. रघुनाथराव परांजपे यांना ‘काळकर्ते परांजपे’ म्हणून ओळखले जाते.

०९. मालदीवची राजधानी माले आहे.  

१०. भारतातील पहिले कृषी विद्यापीठ जी. बी. पंत कृषी विद्यापीठ, पंतनगर.

११. आंध्र राज्य हे भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य 1953 साली अस्तित्वात आले.
 
१२. चीन ने भारतावर हल्ला केला, त्यावेळी भारताचे संरक्षण मंत्री व्ही. के. कृष्ण मेनन होते.

१३. कला व कलेचा प्रचार करण्यासाठी १९५४ मध्ये ललित कला अकादमी या संस्थेची स्थापना केली गेली होती.

१४. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची ची स्थापना 1989 या वर्षी झाली.

१५. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासन सुकन्या योजना राबवित आहे.

१६. हिमाचल प्रदेशात दसरा सण देशातील इतर स्थानांपेक्षा तीन दिवस नंतर साजरा केला जातो. 


१७. ‘निन्गोल चाकौबा’ हा सण मणिपूर मध्ये साजरा केला जातो.

१८. . राज्यातील महिला विकासासाठी काम करणारे कार्यकर्ते आणि संस्थांना अहिल्याबाई होळकर पुरस्कार देण्यात येतो.

१९. ‘ज्ञानवाणी’ हा प्रकल्प इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ यांचा आहे.

२०. भारतातील जतिंगा ठिकाण प्रवासी पक्षांसाठी प्रसिद्ध आहे जेथे त्यांचा मृत्यु होतो.

२१. लाहोर द्वार लाल किल्ला या  स्मारकाचे मुख्य प्रवेशद्वार आहे.

२२. भारत आणि चीन यांच्या दरम्यान झालेला पंचशील करार 1954 यावर्षी मान्य करण्यात आला.

२३. गंगा नदीच्या पाणी वाटपाच्या प्रश्नावर यशस्वी समझोता आय.के.गुजराल यांनी केला होता


२४. अर्जुन, पद्मश्री आणि राजीव गांधी खेल रत्न सन्मानाने गौरविण्यात आलेला भारतीय टेनिस खेळाडू लिएंडर पेस आहे. 

२५. स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद होते. 

२६. अलाई दरवाजा कुतुब मीनार या स्मारकाचा हिस्सा आहे. 

२७. मानस वाघ राखिव उद्यान हे वन्यपशु उद्यान माथंगुरी या नावाने देखील ओळखले जाते. 

२८. कुंजूराणी देवी हे नाव वेटलिफ्टींग खेळाशी संबंधित आहे.
 

२९. नवाझ शरीफ – अटलबिहारी वाजपेयी या दोन नेत्यांमध्ये लाहोर वार्तालाप झाला .
 

३०. सार्क परिषदेचे पहिले अधिवेशन बांगलादेश येथे भरले होते.


३१. वेरूळ येथील लेण्या हिंदू, बौध्द आणि जैन धर्माशी संबंधित आहेत.


३२. बॉलिवूडची पहिली ‘क्वीन’ आणि ‘मदर इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणार्या बॉलिवूडमधील नर्गिस दत्त या सुप्रसिद्ध दिवंगत अभिनेत्रीच्या ८६व्या जयंतीनिमित्त गुगलने डुडलच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहिली आहे. 


३३. नर्गिस यांचे ०३ मे १९८१ रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. सरकारतर्फे मानाचा पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या नर्गिस दत्त या पहिल्या अभिनेत्री आहेत. त्या पहिल्या अभिनेत्री होत्या ज्यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्रींच्या श्रेणीमध्ये राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला.


३४. दरवर्षी होणा-या राष्ट्रीय फिल्म पुरस्कारांमध्ये राष्ट्रीय एकतेवर बनलेल्या सर्वश्रेष्ठ सिनेमाला ‘द नर्गिस दत्त अवॉर्ड‘ दिला जातो. नर्गिस दत्त १९८० मध्ये राज्यसभेच्या खासदार झाल्या होत्या.  ‘तलाश-ए-इश्क’ या सिनेमातून १९३५ साली नर्गिस यांनी बालकलाकार म्हणून हिंदी सिनेसृष्टीत पहिलं पाऊल ठेवले होते.


३५. मिराणी समिती हि अग्निशमन यंत्रणेसंबंधीत समिती आहे. 


३६. मणिपूरमधील हल्ल्यानंतर केंद्र सरकारने NSCN(K) नॅशनॅलिस्ट सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड (खापलांग) या अतिरेकी संघटनेवर बंदी घातली आहे. याचा संस्थापक एस.एस.खापालांग आहे. 


३७. देशातील पहिल्या तृतीयपंथी मुख्याध्यापक मनाबी बंडोपाध्याय ठरल्या आहेत. प. बंगालच्या नाडिया जिल्ह्यात कृष्णानगर विमेन्स कॉलेजमध्ये त्यांनी मुख्याध्यापक पदाचा कारभार सांभाळला आहे.


३८. ‘द स्कॅटर हिअर इज टू ग्रेट’  कादंबरीचे लेखक बिलाल तन्वीर आहेत. 


३९. १९५५ साली विधी आयोगाची पुनर्रचना करण्यात आली. 

४०. पहिले विधी आयोग अध्यक्ष एम.सी.सेटलवाड हे होते. 


४१. आय.पी.सी. चे कलम ३०९ (आत्महत्येचा प्रयत्न) रद्द करण्यात आले. हे कलम रद्द करण्याची शिफारस ए.पी.शहा यांनी केली होती. 


४२. ए.पी.सहा २० व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. ते मुळचे सोलापूरचे असून विधी आयोगाचे अध्यक्ष बनणारे पहिले मराठी व्यक्ती आहेत. 


४३. ब्रिटीश संसदेने ९ जानेवारी १८८४ रोजी इस्ट इंडिया कंपनी पूर्णपणे बरखास्त केली. 


४४. १९८८ साली भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम निर्माण करण्यात आला.२०१५ साली या कायद्यात सुधारणा करण्यात आल्या. यात भ्रष्टाचाराचे प्रकरण दोन वर्षाच्या आत सोडवणे आणि भ्रष्टाचाराचा गुन्हा सिद्ध झाल्यास शिक्षेची तरतूद ५ वर्षांवरून ७ वर्षे करणे या तरतुदी आहेत.


४५. DRDO (Defense Research & Development Organisation) संरक्षण संशोधन व विकास संस्था याची स्थापना १९५८ साली करण्यात आली असून याचे मुख्यालय हैद्राबाद येथे आहे.


४६. बांगलादेश फ्रेंडशिप पुरस्कार हा बांगलादेशचा नागरी सन्मान असून आतापर्यंत तीन भारतीयांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. २०१२ साली श्रीमती इंदिरा गांधी, २०१३ साली प्रणब मुखर्जी, २०१५ साली अटलबिहारी वाजपेयी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 


४७. महाराष्ट्र सरकारने २ जून २०१५ रोजी अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर केले. या धोरणानुसार २०१९ पर्यंत १४४०० mW ऊर्जा नवीन व नवीनीकरणीय साधनांपासून निर्माण करायची आहे. सौरऊर्जा (७५०० mW), पवनऊर्जा (५००० mW), सहवीज ऊर्जा (१००० mW), लघु जलविद्युत प्रकल्प (४०० mW), कृषीजन्य टाकाऊ पदार्थ (३०० mW), औद्योगिक ऊर्जा (२०० mW)


४८. भारतीय राष्ट्रपतींचे अधिकृत निवास्थान दिल्ली, हैद्राबाद  शिमला येथे आहे.


४९. रशियाच्या राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान क्रेमलिन आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान व्हाईट हाऊस आहे. इंग्लंडच्या पंतप्रधानाचे अधिकृत निवासस्थान १०, डाउनिंग स्ट्रीट आहे. इंग्लंडच्या राणीचे अधिकृत निवासस्थान बर्मिंगहॅम पॅलेस आहे. दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत निवासस्था नब्लु हाऊस आहे.


५०. वर्ल्ड बँकेची स्थापना १९४४ साली करण्यात आली असून याचे मुख्यालय वॉशिंग्टन डी सी येथे आहे. वर्ल्ड बँकेचा सर्वात मोठा कर्जदार ब्राझील आहे.