०१. मालमत्तांची मोजदाद आणि नोंदी भौगोलिक माहिती यंत्रणेद्वारे (जीआयएस गुगल मॅपिंग) केली जाणार आहे. त्यामुळे सर्व मालमत्ताकरांच्या नोंदी अचूक होणार असल्याने गैरमार्गाला काहीसा आळा बसणार आहे. 


०२. जीआयएस गुगल मॅपिंग यंत्रणा- 
उपग्रहाच्या मदतीने पालिका हद्दीतील भौगोलिक रचना, सीमारेषा, बांधकाम, ठिकाण यानुसार स्थावर मालमत्ता आदींचे अद्ययावत अचूक नकाशे तयार होणार असून, त्याची नोंद या यंत्रणेत ऑनलाइन राहणार आहे. रेडी रेकनरमधील दर तक्त्या नुसार वसुली, दंड आकारणी होईल. 


०३. चतुर्वेदी समिती, चक्रवर्ती समिती आणि एम. के. प्रभू अहवाल हे भारतातील भूकंपप्रवण क्षेत्राबाबतचा अहवाल आणि अणुऊर्जा प्रकल्प यांच्याबाबत आहे. 

०४. फ्रान्सला अरेवा  कंपनीने दिलेल्या अणुभट्टीच्या काही पोलादी भागांत कार्बनचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे तेथील अणुऊर्जा नियामक आयोगाने गेल्या वर्षी केलेल्या तपासणीत आढळले आहे. 


०५. या अणुभट्टीला तडे जाण्याची भीतीही तज्ज्ञांनी व्यक्त केली असून, अन्य देशांतील नियोजित अणुप्रकल्पांनाही ही माहिती देण्यात आली आहे. फिनलॅंड, चीन तसेच इंग्लंडमध्ये “अरेवा‘मार्फत अणुभट्ट्या उभारल्या जात आहेत. तमिळनाडूतील कुडनकुलम प्रकल्पातही याच कंपनीचे उपकरण वापरण्यात आले आहे. 

०६. महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी प्रकल्पासह अमृत प्रकल्पाचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २५ जून २०१५ रोजी  होणार आहे. स्मार्ट सिटी आणि अमृत प्रकल्पांचे उद्दिष्ट शहरी भागातील पायाभूत सुविधांची उणीव भरून काढणे आणि गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण तयार करून गरिबांचा विकास करण्याचे आहे.


०७. स्मार्ट सिटी प्रकल्पात सुरवातीला विकसित करणार असलेल्या २० शहरांची यादी करण्यात आली आहे.  तर पुढच्या टप्प्यात ४० शहरे निवडण्यात येणार आहेत. त्यानंतर पुन्हा ४० शहरे निवडण्यात येणार आहेत. नागरी विकास मंत्रालयातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सुरवातीला १०० स्मार्ट शहरे आणि त्यानंतर ४०० अमृत शहरे विकसित करण्यात येतील.


०८. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना झेड-प्लस सुरक्षा कवच प्रदान करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. एखाद्या बिगर सरकारी व्यक्तीला ‘झेड प्लस’ संरक्षण दिले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. 



०९. आता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान (सीआयएसएफ) भागवतांच्या सुरक्षेसाठी तैनात केले जातील. भागवत यांना एक बुलेटप्रूफ ‘बीएमडब्लू’ कार देण्यात येईल. तसेच त्यांच्या ताफ्यामध्ये चार “एसयूव्ही‘चाही समावेश असेल. भागवत ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणाची एका विशेष पथकाच्या माध्यमातून एक तास आधी पाहणी करण्यात येईल. अशा प्रकारची सुरक्षा केवळ पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनाच देण्यात येते.


१०. अधिकृत शासकीय ब्लॉग तयार करणारा पहिला देश इस्राईल आहे. 
जॉन बर्गर यांनी १९९० मध्ये वेबलॉग ही संकल्पना आणली. पुढे तीच ब्लॉग म्हणून नावारूपास आली.

११. मंगळाच्या कक्षेत स्थिरावलेले भारताचे महत्त्वाकांक्षी मंगळयान ८ जून २०१५ पासून  पंधरा दिवसांसाठी “ब्लॅक आऊट‘ टप्प्यात प्रवेश करणार आहे.या काळात मंगळयानाचा पृथ्वीवरील केंद्राशी संपर्क तुटणार आहे. 



१२. पृथ्वी आणि मंगळादरम्यान सूर्य येणार असल्याने ८ जून ते २२ जून या काळात पृथ्वीवरील उपग्रह आणि मंगळयानामधील संपर्कात अडथळा येणार आहे. या काळात मंगळयान “ऑटोनॉमस‘ स्थितीत चालणार असून स्वतःचे निर्णय स्वतः घेणार आहे.


१३. मंगळयानात अतिरिक्त इंधन असल्याने त्याचा कार्यकाल सहा महिने वाढविला आहे. सहा महिन्यांनंतर कार्यकाल पुन्हा वाढल्यास पुढील वर्षी मे महिन्यातही मंगळयानाला ब्लॅक आऊटला सामोरे जावे लागणार आहे.


१४. समाजसुरक्षा आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल भारतातील प्रसिद्ध समाजसेवक आणि सुधारणावादी नेते अच्युत सामंत यांना बाहरीन राजवटीने ‘इसा’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले. मानपत्र, सुवर्णपदक आणि १० लाख डॉलरची रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप असून सामंत यांना ३ जून रोजी बाहरीनचे राजे हमीद बिन इसा अल् खलिफा यांच्या हस्ते एका विशेष समारंभात हा पुरस्कार देण्यात आला.



१५. महाराष्ट्राच्या ललिता बाबरने वुहान येथे सुरू असलेल्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. ३००० मीटर स्टीपलचेस शर्यत ललिताने ९ मिनिटे, ३४ सेकंदांत पूर्ण केली. सुवर्णपदकासह ललिता पुढील वर्षी होणाऱ्या रिओ ऑलिम्पिक तसेच यावर्षी बीजिंगमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघातर्फे आयोजित जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. 


१६. याआधी इंदरजीत सिंगने सुवर्णपदकावर कब्जा केला होता.२६ वर्षीय ललितासाठी हा हंगाम पदकदायी ठरला आहे. गेल्या वर्षी इन्चॉन, दक्षिण कोरिया येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत याच प्रकारात ललिताने कांस्यपदकाची कमाई केली होती. पदकासह ललिताने सुधा सिंगचा ९ मिनिटे आणि ४७ सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम मोडला होता. ललिताने ९ मिनिटे आणि ३५ सेकंदात शर्यत पूर्ण केली होती. 


१७. जबरदस्त फॉर्मात असलेल्या विकास गौडाने थाळीफेक प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरले. विकासने ६२.०३ अंतरावर थाळी फेकत अव्वल स्थान मिळवले. २०१३मध्ये पुणे येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत ६४.९० मीटर अंतरासह विकास सुवर्णपदकाचा मानकरी ठरला होता. 


१८. म्हैसूरमध्ये जन्मलेल्या मात्र अमेरिकेत प्रगत प्रशिक्षण घेत असलेल्या ३१ वर्षीय विकाससाठी २०१५ वर्ष फलदायी ठरले आहे. शांघाय येथे झालेल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत विकासने ६३. ९० मीटर अंतरावर थाळी फेकत कांस्यपदक पटकावले होते. त्यानंतर ट्रिटॉन निमंत्रितांच्या स्पर्धेत विकासने अव्वल स्थान मिळवले होते. सॅन डिएगो येथे झालेल्या स्पर्धेत विकासने ६५.७५ मीटर अंतरावर थाळी फेकण्याचा विक्रम केला होता.


१९. गुगलच्या बहुचर्चित चालकरहित स्वयंचलित मोटारीशी स्पर्धा करण्यासाठी आता चीनमधील “बैदू‘ ही कंपनी अशाप्रकारची मोटार विकसित करत आहे.“बैदू” ही चीनमधील वेब सेवा देणारी कंपनी आहे आणि एका ऑटोमोबाईल कंपनीच्या साहाय्याने “बैदू” स्वयंचलित मोटार तयार करत आहे. 


२०. “बैदू” ने यापूर्वी बीएमडब्ल्यूच्या सहकार्याने सेमी ऍटोनोमस तंत्रज्ञान असलेली मोटार विकसित केली होती.या नवीन स्वयंचलित मोटारीमध्ये बैदू नकाशा, बैदू डेटा, बैदू ब्रेन तसेच कृत्रिम बुद्धिमत्ताही असल्याचे म्हटले आहे. यात विशेष आकर्षण म्हणजे “बैदू ब्रेन” असेल, जे की मानवी मेंदुच्या पद्धतीप्रमाणे कार्य करेल.


२१. जगातील १९३ पैकी १९२ देशांत व या देशांमधील सुमारे २५० शहरांत, संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय, तसेच भारतातील ६७६ पैकी ६५० जिल्ह्यांमध्ये २१ जून रोजी “आंतरराष्ट्रीय योग दिवस” साजरा करण्यात येणार आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत राजपथावर ३५ हजार लोकांच्या सहभागाने तो साजरा केला जाणार आहे.



२२. एवढ्या प्रचंड व सरकारच्या दाव्याप्रमाणे वैश्‍विक स्तरावर साजरा केल्या जाणाऱ्या या दिवसाचा समावेश “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्‌” मध्ये समावेश करण्यासाठी सरकारने अर्ज केला आहे. या दिवसानिमित्त १०० रुपये आणि १० रुपयांचे विशेष नाणे जारी केले जाणार आहे आणि त्याचप्रमाणे सरकारतर्फे टपाल तिकिटही प्रकाशित केले जाणार आहे.


२३. भारताच्या अत्यल्प खर्चात यशस्वीपणे पार पडलेल्या मंगळमोहिम प्रकल्पास अमेरिकेच्या राष्ट्रीय अवकाश संस्थेचा (एनएसएस) २०१५ चा “स्पेस पायोनिअर‘ पुरस्कार मिळाला आहे. कॅनडातील टोरांटोमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय अवकाश विकास परिषदेच्या ३४ व्या वार्षिक परिषदेत हा पुरस्कार इस्रोला प्रदान करण्यात आला आहे.


२४. रशिया, अमेरिका, युरोप या देशांना मागे टाकत इस्रोने मागील वर्षी पहिल्याच प्रयत्नात अत्यल्प खर्चात मंगळयान मोहिम यशस्वी करून दाखविली होती.


२५. संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (युनितार) प्रमुखपदावर निखिल सेठ या वरिष्ठ भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याची निवड करण्यात आली आहे.संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून यांनी त्यांची या संस्थेच्या कार्यकारी संचालकपदावर नियुक्ती केली आहे. “युनितार” या संस्थेतर्फे दरवर्षी जगभरात राबविल्या जाणाऱ्या विविध विकास आणि संशोधन कार्यक्रमांद्वारे जवळपास २५ हजार जणांना लाभ होत असतो.