०१. भारताच्या संविधानानुसार राज्यपाल हा राज्यप्रमुख असून त्याचे अधिकार औपचारिक स्वरूपाचे असतात. राज्य सरकारच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी मुख्यमंत्री व त्याच्या मंत्रीमंडळावर असते. 
 

 

०२. राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर राज्यपाल सर्वाधिक जागा मिळालेल्या राजकीय पक्षाला सरकार बनवण्यासाठी आमंत्रित करतो. हा सत्ताधारी पक्ष आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करतो.मुख्यमंत्र्याचा कार्यकाळ साधारणपणे ५ वर्षांचा असून ह्यादरम्यान सत्ताधारी पक्ष कधीही मुख्यमंत्री बदलू शकतो.


०३. राज्यपाल पदासाठी विशिष्ट असा कार्यकाळ नाही. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल त्या पदावर राहू शकतो. राज्यपाल हे पद फक्त घटकराज्यांसाठीच असते. केंद्रशासित प्रदेशांसाठी नायब राज्यपाल किंवा प्रशासकाची तरतूद करण्यात आलेली आहे.


०४. १९८५ पासून पंजाबचे राज्यपाल चंदीगडचे प्रशासक म्हणून कार्य पाहतात.


०५. दादरा व नगर हवेली, दमण व दीव आणि लक्षद्वीप यांचे प्रशासक हे भारतीय प्रशासकीय सेवेतील पदाधिकारी असतात.

घटकराज्यांचे राज्यपाल
राज्याचे नाव राज्यपालांचे नाव
आंध्र प्रदेश इ.एस.एल. नरसिम्हन
अरुणाचल प्रदेश पद्मनाभ आचार्य
आसाम बनवारीलाल पुरोहित
बिहार राम नाथ कोविंद
छत्तीसगड बलराम दास टंडन
गोवा मृदुला सिन्हा
गुजरात ओम प्रकाश कोहली
हरियाणा कप्तान सिंग सोळंकी
हिमाचल प्रदेश आचार्य देव व्रत
जम्मू आणि काश्मीर नरेंद्र नाथ व्होरा
झारखंड द्रौपदि मुरमु
कर्नाटक वजुभाई वाला
केरळ पी. सताशिवम
मध्यप्रदेश ओम प्रकाश कोहली
महाराष्ट्र सी. विद्यासागर राव
मणिपूर नजमा हेपतुल्ला
मेघालय बनवारीलाल पुरोहित
मिझोराम निर्भय शर्मा
नागालँड पद्मनाभ आचार्य
ओडिशा एस.सी. जमीर
पंजाब व्ही.पी. सिंग बदनोरे
राजस्थान कल्याण सिंग
सिक्कीम श्रीनिवास पाटील
तामिळनाडू सी. विद्यासागर राव
तेलंगणा इ.एस.एल. नरसिम्हन
त्रिपुरा तथागत रॉय
उत्तर प्रदेश राम नाईक
उत्तराखंड कृष्णकांत पॉल
पश्चिम बंगाल केशरी नाथ त्रिपाठी


केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल व प्रशासक 
केंद्रशासित प्रदेश नायब राज्यपाल / प्रशासक
अंदमान व निकोबार जगदीश मुखी (नायब राज्यपाल)
चंदीगड व्ही.पी. सिंग बदनोरे (प्रशासक)
दादरा व नगर हवेली प्रफुल खोडा पटेल (प्रशासक)
दमण व दीव प्रफुल खोडा पटेल (प्रशासक)
दिल्ली अनिल बैजल (नायब राज्यपाल)
लक्षद्वीप फारूक खान (प्रशासक)
पुडुचेरी किरण बेदी (नायब राज्यपाल)