दहशतवाद विरोधात भारत चीनचे सहकार्य
०१. दहशतवादाशी मुकाबला व अन्य क्षेत्रांत उच्च पातळीवर मैत्रीपूर्ण संबंध ठेवून देवाणघेवाण करण्याचे भारत व चीनने ठरविले आहे. दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या चर्चेत हा निर्णय झाला.


०२. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांग जियेची यांची हैदराबाद येथे चर्चा झाली.
गेल्या दोन महिन्यांत यांग हे तिसऱ्यांदा भारत भेटीवर आले आहेत. या चर्चेत द्विपक्षीय, या प्रदेशातील तसेच आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. 

०३. राजकीय, आर्थिक, संरक्षण व दहशतवादाशी मुकाबला या क्षेत्रांत उच्च पातळीवर माहितीची देवाणघेवाण करीत शांततेचे वातावरण ठेवण्याचे या वेळी ठरविण्यात आले.



भारतीय व्यावसायिकांसाठी ब्रिटनची व्हिसा योजना
०१. सीआयआय च्या वतीने आयोजित शिखर परिषदेत ब्रिटिश पंतप्रधान टेरेसा मे यांनी भारतीय व्यावसायिकांसाठी विशेष व्हिसा योजनेची घोषणा केली.  नियमितपणे ब्रिटनला जाणाऱ्या लोकांना या योजनेचा लाभ होईल.

०२. पंतप्रधान टेरेसा मे यांनी आपल्या भाषणात टाटा उद्योग समूहाचा विशेष उल्लेख केला. 
ब्रिटनमध्ये ८०० भारतीय कंपन्या आहेत. जग्वार लँड रोव्हरची मालक कंपनी टाटा ही त्यांची सर्वांत मोठी वस्तू उत्पादन कंपनी आहे.



विशाल सानप अहमदाबाद विभागाचे नवे सहसंचालक
०१. सक्त वसुली संचालनालयाच्या (ईडी) अहमदाबाद विभागाचे सहसंचालक म्हणून परभणी जिल्ह्यातील ३६ वर्षीय विशाल सानप यांची पदोन्नतीवर नियुक्ती करण्यात आली आहे. 

०२. अहमदाबाद विभागाच्या कार्यक्षेत्रात गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांसह दीव व दमण या केंद्र शासित प्रदेशांचा समावेश होतो. त्याचे प्रभारी अधिकारी म्हणून विशाल सानप काम पाहतील.



१००० व ५०० च्या नोटा व्यवहारातून बाद
०१. काळा पैसा आणि अवैध व्यवहार रोखण्यासाठी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा ८ नोव्हेंबर मध्यरात्रीपासून चलनातून बंद करण्यात आल्या आहेत. 

०२. यातील एक हजाराच्या नोटा चलनातून पूर्णपणे बंद होणार असून, पाचशे रुपयांच्या नव्या नोटा लवकरच चलनात येतील. दोन हजार रुपयांची नोटही चलनात येणार आहे.

०३. काळ्या पैशाबाबत विशेष तपासणी पथक स्थापन करण्यात आले आहे. परदेशांत ठेवलेला काळा पैसा साठ टक्के कर भरून तीन महिन्यांत जाहीर करण्यासाठी २०१५ मध्ये कायदा संमत आला होता.

०४. बॅंक व्यवहारांच्या माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी अमेरिकेसह अनेक देशांबरोबर करार करण्यात आला आहे.



महाराष्ट्र पर्यटन विकास विभागाला जपानकडून मदत
०१. जगभरातील व देशाच्या कानाकोपऱ्यातील पर्यटकांना औरंगाबाद येथील अजिंठा-वेरूळ लेण्यांचे मोठे आकर्षण आहे. 

०२. तसेच त्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील संवर्धनासाठी जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी (जेआयसीए) आता महाराष्ट्र पर्यटन विकास विभागाला (एमटीडीसी) मदत करणार आहे. पहिला टप्पा १९९३ ते २००४ दरम्यान पूर्ण झाला. दुसरा टप्पा २०१६ आणि २०१७ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे.

०३. बाह्य मूल्यांकनाविषयी नुकतेच जेआयसीएच्या भारतातील कार्यालयाने ‘एमटीडीसी’ला पत्र पाठवले होते.

०४. २७ नोव्हेंबरपासून २४ डिसेंबरपर्यंत ‘जेआयसीए‘चे प्रतिनिधी या स्थळांना भेट देतील. त्यानंतर जवळपास वर्षभर म्हणजेच ऑक्‍टोबर २०१७ पर्यंत याविषयी अभ्यास केला जाईल.

०५. निश्‍चित करण्यात आलेल्या समितीवर केंद्र सरकारच्या ‘एएसआय’, ‘एएआय’ या संस्थांबरोबर ‘एमटीडीसी’ आणि इतर राज्यांतील सरकारी संस्थांच्या प्रतिनिधींचीही निवड करण्यात आली आहे.