चालू
घडामोडी १७ आणि
  १८  मार्च २०१७ – MPSC Academy

उत्तराखंडमध्ये त्रिवेंदसिंह रावत मुख्यमंत्रीपदाची शपथ
घेतील

 उत्तराखंडमधील ७० पैकी ५७ जागांवर
भाजपला विजय मिळाला. तर काँग्रेसला केवळ ११ जागांवर समाधान मानावे लागले.
उत्तराखंडमध्ये पक्षनेतृत्वाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक
त्रिवेंद्रसिंह रावत यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

मुख्यमंत्र्यांची
निवड करण्यासाठी आज भाजपच्या आमदारांची देहरादूनमध्ये बैठक झाली. या बैठकीत
विधीमंडळ नेतेपदी आमदार त्रिवेंद्रसिंह रावत यांची निवड करण्यात आली. त्यामुळे ते
उत्तराखंडचे मुख्यमंत्री असतील
, यावर शिक्कामोर्तब
झाले आहे.
 
उत्तराखंडमधील डोईवाला
मतदारसंघातून रावत निवडून आले आहेत. ते १९८३ ते २००२ या कालावधीत राष्ट्रीय
स्वयंसेवक संघात सक्रीय होते.

नव्या राष्ट्रीय आरोग्य धोरणात २००२ सालच्या धोरणाचीच पुनरावृत्ती

 केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री
जे. पी. नड्डा यांनी १६ मार्च रोजी जाहीर केलेले राष्ट्रीय आरोग्य धोरण म्हणजे
२००२ सालच्या धोरणालाच नवा मुलामा चढवला असल्याचे
इंडियास्पेंडआणि फॅक्टचेकरयांच्या विश्लेषणातून स्पष्ट झाले आहे.
 नव्या धोरणात बालक व माता मृत्युदर कमी
करण्याची व रोगनिवारणाची जी उद्दिष्टे आहेत
,
ती
१५ वर्षांपीर्वीही तशीच होती. आणि प्रत्यक्षात ती २०१० सालापर्यंत पूर्ण होणे
अपेक्षित होते.

 यंदाच्या धोरणात बालक मृत्युदर (दर हजार
बाळंतपणांमध्ये बालकांच्या मृत्यूचे प्रमाण) २०१९ पर्यंत २८ वर आणण्याचे उद्दिष्ट
ठेवले आहे. २००२ साली ते २०१० पर्यंत ३० वर आणण्याचे ठरले होते. २०१५-१६ या
वर्षांत हा दर ४१ इतका होता.

 यंदाच्या धोरणात माता मृत्युदर (१ लाख
बाळंतपणांमध्ये मातांच्या मृत्यूचे प्रमाण) २०२० सालापर्यंत १०० वर आणण्याचे
उद्दिष्ट ठरवले आहे.
 

शिवाजी,
म्याँगजी विद्यापीठाचा सामंजस्य करार 

शिवाजी विद्यापीठ आणि
दक्षिण कोरियातील म्याँगजी विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. शैक्षणिक
, संशोधन क्षेत्रांतील संबंध अधिक बळकट करण्यासह, दोन्ही विद्यापीठांनी परस्पर सहकार्य वाढविण्यासाठी हा करार
केला आहे.

विद्यापीठाच्या
नॅनो सायन्स आणि तंत्रज्ञान अधिविभागाच्या सभागृहात या करारावर कुलसचिव डॉ. विलास
नांदवडेकर आणि म्याँगजी विद्यापीठातर्फे प्रा. डॉ. जिआँग गिल सिओ यांनी
स्वाक्षऱ्या केल्या.

तसेच
यावेळी नॅनो सायन्स व तंत्रज्ञान अधिविभागाचे समन्वयक प्रा.डॉ. पी.एस पाटील
, संख्याशास्त्र अधिविभागाचे प्रा.डॉ. डी.टी. शिर्के, आंतरराष्ट्रीय संबंध कक्षाचे समन्वयक ए.व्ही. घुले उपस्थित
होते.

कुलसचिव
डॉ. नांदवडेकर म्हणाले
, या करारामुळे दक्षिण
कोरिया आणि शिवाजी विद्यापीठाचे संबंध आणखी दृढ होण्यास मदत होईल.

डॉ.
सिओ म्हणाले
, शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी दक्षिण
कोरियात उत्तम संशोधकीय योगदान देत असून
, या कराराच्या
माध्यमातून सहकार्यवृद्धी
 
होत आहे.

 काँग्रसचे ज्येष्ठ नेते
अमरिंदर सिंग
यांनी पंजाब मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 

यापूर्वी
२००२ ते २००७ या काळात अमरिंदर यांनी पंजाबची धुरा सांभाळली आहे. शपथविधीला माजी
पंतप्रधान मनमोहन सिंग
, काँग्रेस
उपाध्यक्ष राहुल गांधी व पक्षाचे इतर नेते उपस्थित होते.

सिद्धू
यांच्याशिवाय ब्रह्म महिंद्र तसेच मनप्रीत सिंग बादल
, धर्मसिंग धरमसोत, टी. राजेंद्र सिंह बाजवा, राणा गुरजिंत सिंग व
चरणसिंग चैनी हे कॅबिनेट मंत्री तर राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) म्हणून अरुणा
चौधरी व रझिया सुल्ताना यांनी शपथ घेतली. मंत्रिमंडळात सर्व जाती-धर्माना
प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न अमरिंदर यांनी केला आहे.

अमरिंदर
यांच्या पतियाळा या जिल्ह्य़ातून आलेले ब्रह्म महिंद्र ज्येष्ठतेमध्ये
मुख्यमंत्र्यांनंतर आहेत. नियमानुसार पंजाबमध्ये मुख्यमंत्र्यांसह १८ जणांच्या
मंत्रिमंडळाची मुभा आहे. मात्र सध्या मंत्रिमंडळ छोटेखानी आहे.

राज्याची
आर्थिक स्थिती बिकट असल्याने शपथविधी समारंभ साधा असेल अशी घोषणा यापूर्वीच
अमरिंदर यांनी केली होती. ११७ सदस्य असलेल्या पंजाब विधानसभेत काँग्रेसने ७७ जागा
जिंकल्या आहेत.




 

एमपीएससी परीक्षेत भूषण अहिरे राज्यात प्रथम
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे
(एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा
2016 चा अंतिम निकाल जाहीर झाला. या परीक्षेत नाशिक जिल्ह्यातील
भूषण अशोक अहिरे याने राज्यात प्रथम कमांक पटकावला.

तसेच
सातारा जिल्ह्यातील पूनम संभाजी पाटील हिने महिलांमधून प्रथम क्रमांक मिळवला आहे.

भूषण
अहिरे अभियांत्रिकी विद्याशाखेचा पदवीधर असून त्याची उपजिल्हाधिकारी पदाकरिता निवड
झाली आहे. तर पूनम पाटील हिची पोलीस उपअधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त या पदाकरिता
निवड झाली आहे.

उपजिल्हाधिकारी
पदासाठी भूषण अहिरेसह श्रीकांत गायकवाड
, संजयकुमार ढवळे, संदीप भास्के आणि नीलम बाफना यांची निवड झाली आहे. तर पोलीस उप
अधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त या पदाकरिता पूनमसह अमोल ठाकूर
, सागर पवार, अमोल मांडवे हे
अनुक्रमे प्रथम
, व्दितीय व तृतीय क्रमांकाने यशस्वी झाले
आहेत.

 
विद्युत पुरवठयासाठी उभारणार कृत्रिम बेट

ब्रिटनच्या
किनाऱ्याजवळ मानवनिर्मित बेट उभारण्याची योजना तयार करण्यात आली आहे. हे बेट
युरोपच्या काही भागांत अक्षय ऊर्जेचा पुरवठा करण्यास सक्षम असेल.

पवनचक्की
आणि सौर पॅनलचे जाळे असलेले हे बेट ब्रिटन
,
डेन्मार्क, जर्मनी, द नेदरलॅण्ड नॉर्वे
आणि बेल्जियम या सहा देशांचे ऊर्जा केंद्र म्हणून काम करील.


नेदरलॅण्ड
, डेन्मार्क आणि जर्मनीतील विद्युत
कंपन्यांच्या महासंघाने सुचविलेल्या या
1.1
अब्ज
पौंडाच्या प्रकल्पाला युरोपियन युनियन प्रमुखांनी यापूर्वीच पाठिंबा दिला असून
, ब्रुसेल्स 23 मार्च रोजी त्यावर
शिक्कामोर्तब करणार आहे.

25 चौरस
कि.मी.च्या या बेटावर कर्मचाऱ्यांसाठी रस्ते
,
कार्यशाळा, झाडे आणि कृत्रिम सरोवर असेल. याशिवाय 7000 किंवा त्याहून अधिक पवनचक्क्यांसह एक विमानतळ, बंदर, नियंत्रण कक्ष आणि
टर्मिनलचीही सोय असणार आहे.

बुलढाण्यात होणार पहिले जिल्हा मराठी संमेलन

अखिल भारतीय मराठी
साहित्य महामंडळाने त्याच्या घटक संस्थांच्या शाखांच्या सहकार्याने
जिल्ह्याजिल्ह्यांत संमेलन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिले एकदिवसीय
जिल्हा मराठी संमेलन बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करवंड या गावी
26 मार्च रोजी पार पडणार आहे.
या संमेलनाचे अध्यक्ष
प्रसिद्ध शायर डॉ. गणेश गायकवाड असणार आहेत.

करवंड येथील परिसराला
राजमाता जिजाऊ साहित्य नगरीअसे नाव देण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन 26 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजता महामंडळाचे
अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांच्या हस्ते होईल.

तसेचशेतकऱ्यांच्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी शासनासह
प्रसारमाध्यमे
, लेखक, कलावंत, उदासीन होत आहेतया विषयावर टॉक शो
होणार आहे. तर या संमेलनात बालमेळावाही आयोजित केला आहे.