चालू घडामोडी १९
आणि २०
मार्च २०१७


आयडिया आणि
व्होडाफोनचे विलिनीकरण होणार


भारतीय दूरसंचार
बाजारपेठेतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी व्होडाफोनने आयडियासोबत विलिनीकरणाच्या
प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले आहे.
व्होडाफोन इंडिया आणि
याअंतर्गत येणारे व्होडाफोन मोबाईल सर्व्हिसेस लिमिटेड आता आदित्य बिर्ला
ग्रुपच्या आयडिया सेल्यूलरमध्ये विलीन होणार आहे.
विलिनीकरणाची ही प्रकिया
पुढील वर्षापर्यंत पूर्ण होईल.
केंद्र सरकारच्या कर
तगाद्याने त्रस्त मूळच्या ब्रिटनमधील व्होडाफोनने आपला भारतातील व्यवसाय स्पर्धक
आयडिया सेल्युलरला विकण्याचा निर्णय घेतला होता.

रॉजर फेडररला
पाचव्यांदा इंडियन वेल्सचे जेतेपद


टेनिसचा बादशहा रॉजर
फेडररने स्टान वॉवरिन्कावर मात करून एटीपी इंडियन वेल्स मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद
जिंकले. या स्पर्धेचे हे फेडररचे पाचवे जेतेपद ठरले.
इंडियन वेल्सचे जेतेपद
पटकावून फेडररने आता नोव्हाक जोकोव्हीच याच्या पाच वेळा स्पर्धेचे जेतेपद
जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
 याआधी फेडररने २००४, २००५, २००६ आणि २००६
साली ही स्पर्धा जिंकली होती

संयुक्त
राष्ट्रांच्या वैद्यकीय गटात सौम्या स्वामिनाथन यांची नेमणूक


भारतीय वैद्यकीय संशोधन
परिषदेच्या संचालक सौम्या स्वामिनाथन यांची संयुक्त राष्ट्रांच्या जीवाणूविरोधी
लढ्यासाठीच्या उच्चस्तरीय गटात नेमणूक करण्यात आली आहे.
स्वामिनाथन (वय ५७) यांची
जीवाणूरोधक समन्वय गटात नेमणूक झाली असून या गटात उप सरचिटणीस अमीन महंमद या
सहअध्यक्ष असतील
स्वामिनाथन या भारताच्या
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयात आरोग्य संशोधन विभागाच्या सचिव आहेत. त्या
प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ असून त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. क्षयावर त्यांनी
संशोधन केले असून १९९२ मध्ये त्या चेन्नईतील क्षयरोग संशोधन केंद्रात काम करू
लागल्या. गेली २३ वष्रे त्या आरोग्य संशोधनात काम करीत आहेत.

अर्थ मंत्री
सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला


राज्याचा अर्थसंकल्प सादर
केल्यानंतर सामान्य माणसाला सर्वाधिक उत्सुकता असते ती काय स्वस्त झाले आणि काय
महाग झाले हे जाणून घेण्याची.
१ जुलैपासून २०१७ पासून
देशभरात जीएसटी लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार
यांनी केवळ काहीच वस्तूंची किंमत कमी किंवा अधिक केली आहे.
 जीएसटी लागू झाल्यानंतर निरनिराळ्या वस्तूसाठी
किंमत ठरवली जाईल तोपर्यंत का होईना काही वस्तुंची किंमत कमी-अधिक झाली आहे.
ऑनलाइन व्यवहारांना चालना
देण्यासाठी स्वाईप मशीनवरील कर काढण्यात आला आहे. त्यामुळे मशीन्स स्वस्त होणार
आहेत.
राज्यामध्ये शेतीबरोबरच
दुग्धविक्री हा व्यवसाय केला जातो. त्यानुसार
, मिल्क टेस्टिंग किटवरील
कर माफ करण्यात आला आहे. छोट्या शहरातील विमातळावरील कर कमी केला आहे.

देशातील सर्वांत
मोठा बोगदा सुरू होणार


 भारतातील सर्वात मोठा बोगदा जम्मू-काश्मीरमध्ये
आकाराला येत असून
, मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बोगद्याचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे.
काश्मीरवासीयांसाठी हा
आशेचा बोगदा असल्याचे संबोधले गेले असून
, या बोगदा खुला झाल्यानंतर
जम्मू ते काश्मीर या मार्गातील
38 किमीचा खडतर मार्ग कोणत्याही मोसमात खुला
राहणार आहे.
विशेष म्हणजे या
बोगद्याचे भूमिपूजन
2011 साली राहुल गांधी यांच्या हस्ते झाले होते.
 बर्फवृष्टी आणि हिमस्खलनामुळे वारंवार ठप्प
होणा-या राष्ट्रीय महामार्ग एकची या बोगद्यामुळे वाहतुकीची समस्या मिटणार आहे.
अडतीस किमीचा फेरा वाचणार आहे.
उत्तर प्रदेशचे
नवे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ


उत्तर प्रदेशचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांनी 19 मार्च रोजी शपथ घेतली.
तर
, केशवप्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांनी उपमुख्यमंत्रीपदासह
अन्य
44 जणांनी शपथ घेतली.
 लखनौमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान
नरेंद्र मोदी
, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, भाजपशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि सर्व प्रमुख भाजप नेते, आमदार उपस्थित होते.राष्ट्रीय राजकारणात अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेल्या
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी भारतीय जनता पक्षाने गोरखपूरचे खासदार योगी
आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केले होते.
 तसेच याबरोबर प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्य
आणि लखनौचे महापौर दिनेश शर्मा या दोघांना उपमुख्यमंत्रिपद देण्याचेही या वेळी
जाहीर करण्यात आले होते.
गोरखपूर लोकसभा
मतदारसंघातून सलग पाच वेळेस खासदार म्हणून निवडून आलेले योगी आदित्यनाथ यांची
मुख्यमंत्रिपदासाठी निवड केल्याने भाजपवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे.
गोरखपूरमधील गोरखनाथ
मठाचे प्रमुख असलेले आदित्यनाथ हे विज्ञान शाखेचे पदवीधर असून
, आपल्या आक्रमक भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत.

भारतीय रेल्वे
तंत्रज्ञान निर्यात करणार


मेक इन इंडियाअंतर्गत पहिली लोकल सेवेत
दाखल झाल्याचा सार्थ अभिमान वाटत आहे. आतापर्यंत रेल्वेने तंत्रज्ञान आयात
करण्यावर भर दिला होता
; पण हे चित्र पूर्ण बदलले आहे.
तंत्रज्ञान आयातीचे
प्रमाण तीन टक्‍क्‍यांवर आणले आहे. यापुढे भारतीय तंत्रज्ञान परदेशात निर्यात
करण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे
,
असे रेल्वेमंत्री सुरेश
प्रभू यांनी जाहीर केले.
 भारतीय बनावटीच्या मेधालोकलबरोबर विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्‌घाटन
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये
करण्यात आले.
एलटीटी-टाटानगर या
अंत्योदय एक्‍स्प्रेसला रेल्वेमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला. ही एक्‍स्प्रेस
सर्वसाधारण श्रेणीतील प्रवाशांसाठी असून
, त्यात कुठलेही आरक्षण
नाही. या गाडीला
20 डबे असून, त्यात दोन हजार आसने
आहेत.
    तसेच याबरोबर भुसावळ-जळगावदरम्यान चौथ्या
मार्गिकेचे भूमिपूजन
, मिरज-सोलापूर एक्‍स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनसवर 13 हजार चादरी धुण्याची क्षमता असलेली आधुनिक
लॉण्ड्री व इतर सुविधांचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे उद्‌घाटन करण्यात आले.

    सोलापूर, गुलबर्गा, सुरत, इंदूर व राजकोट स्थानकात वाय-फाय सुविधा व
चर्चगेट आणि भुसावळ येथील सौरऊर्जा प्रणालीचे उद्‌घाटनही करण्यात आले.