मौर्य काळ
सम्राट अशोक
प्राचीन अभिलेखांमध्ये अशोकाचा उल्लेख ‘देवनामप्रिय’ आणि ‘प्रियदर्शी’ असेही करण्यात आला आहे. सिंहली भाषिक ग्रंथ दीपवंश मध्ये त्याचा उल्लेख ‘प्रियदर्शन’ असा करण्यात आला आहे.


अशोकाने त्याच्या साम्राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात ‘महामात्रो’ ची नियुक्ती केली होती.


‘उपगुप्त’ हा मथुरेचा एक बौद्ध भिक्षु होता. त्याच्या प्रभावाखाली अशोकाने धर्मपरिवर्तन करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला. लघु शिलालेख मध्ये अशोकाने स्वतःचा उल्लेख ‘बुद्ध शक्य’ असा केला आहे. 


अशोकाने बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठविले. अशोकाने मज्जहानतिकाला बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी काश्मीरला पाठविले.


१७५० मध्ये टीफेंथैलरने सर्वप्रथम दिल्लीमध्ये अशोक स्तंभ शोधून काढला. १९१५ मध्ये बीडनं ने मस्की येथे अशोकाचा अंतिम शिलालेख शोधून काढला.


अशोकाच्या लघुशिलालेखाचे दोन प्रकार आहेत. हे इ.पु. २५९ ते २३२ मध्ये लिहिण्यात आले होते.


अशोकाचे प्रथम प्रकारचे शिलालेख रुपनाथ (मध्य प्रदेश), सहासराम (बिहार), मस्की (रायचूर), आणि बैराट (राजस्थान) मध्ये उपलब्ध आहेत. द्वितीय प्रकारचे शिलालेख सिद्धपूर, जेटिंग, रामेश्वर आणि ब्रह्मगिरी येथे सापडले.


भाब्रु शिलालेख राजस्थानमधील जयपूरजवळील बैराट येथून प्राप्त झाला आहे. या शिलालेखात बौद्ध धर्मातील सात उदाहरणे दिली गेलेली आहेत. ही सात उदाहरणे अशोकाला खूप आवडत होती. त्याला वाटत असे कि जनतेने हि उदाहरणे वाचावीत आणि त्यानुसार आचरण करावे. सध्या हा शिलालेख कोलकाता येथील संग्रहालयात सुरक्षित आहे.


जवळपास १५ ठिकाणाहून अशोकाचे लघु शिलालेख प्राप्त झाले.