गुलाम वंश
काझी फखरुद्दीन अब्दुल अजीज कुफी यांनी कुतुबुद्दीन ऐबकला लहानपणीच गुलाम म्हणून विकत घेतले होते. त्यांनी त्यास मुहम्मद घोरी यास विकले. पुढे तो आपल्या पराक्रमाने बादशाह पदावर पोहोचला.


कुतुबुद्दीन ऐबकाने राज्याभिषेकाच्यावेळी त्याच्या नावाचा खुतबा घेतला नव्हता. किंवा त्याने स्वतःच्या नावाची वेगळी नाणीसुद्धा पाडली नाहीत. मृत्यूनंतर ऐबकाचा लाहोर येथे दफनविधी करण्यात आला.

दिल्लीच्या किला राय पिथौरा जवळील ‘कुब्बत उल इस्लाम’ या मस्जिदीचे निर्माण कुतुबुद्दीन ऐबकने केले होते.


अजमेर येथील ‘अढाई दिन के झोपडे’ या प्रसिद्ध मस्जिदीचे निर्माण कुतुबुद्दीन ऐबकने केले होते.

शमशुद्दीन अल्तमश (इल्तुतिमीश) हा कुतुबुद्दीन ऐबकाचा जावई होता. अल्तमशने शम्सी वंशाची स्थापना केली. एलदौज उर्फ नासिरुद्दीन कुबाचा अल्तमशचा प्रमुख प्रतिद्वंद्वी होता.


अल्तमशने आपल्या ४० गुलाम सरदारांचा एक गट बनविला होता. तो गट इतिहासात ‘तुर्कान-ए-चिहीलगानी’ नावाने प्रसिद्ध झाला. अल्तमशने ‘इक्ता’ सेना नावाच्या संघटनेचे गठन केले होते.


अल्तमशने चांदीच्या ‘टका’ तसेच तांब्याच्या ‘जितल’ नावाच्या मुद्रा सुरु केल्या. शुद्ध अरबी भाषेत नाणी सुरु करणारा अल्तमश हा पहिला तुर्क सुलतान होता.


१८ फेब्रुवारी १२२९ रोजी बगदादच्या सुलतानाचा एक प्रतिनिधी दिल्लीमध्ये आला होता. त्याने इल्तुतिमीषच्या सन्मानार्थ सम्मान पत्र प्रदान केले. यामुळे खलिफाद्वारे अल्तमशचा सुलतान म्हणून स्वीकार करण्यात आला. त्यामुळे दिल्ली वैध रूपात एक स्वतंत्र राज्य बनले.


बल्बन हा सुद्धा एक मध्ययुगीन काळातील एक महत्वाचा सुलतान होता. बरणी या इतिहासकाराच्या अनुसार बल्बनच्या दरबाराचे गठन इराणी परंपरेच्या अनुसार करण्यात आले होते.


बल्बनने त्याच्या कार्यकाळात ‘सिजदा’ प्रथेचा आरंभ केला. बल्बनचा राज्यकारभार सिद्धांत, शक्ती, प्रतिष्ठा आणि न्याय यांच्यावर आधारित होता. त्याचे प्रमुख लक्ष्य प्रशासकीय अधिकाऱ्यांवर नियंत्रण प्राप्त करणे हा होता.






खिलजी वंश
जलालुद्दीन फिरोजशाह खिलजीचा राज्याभिषेक इ.स. १२९० मध्ये किलोखारी येथील अपूर्ण महाल येथे झाला. या महालाचे निर्माण कैकुबाद याने केले होते.


दिल्लीच्या गादीवर बसल्यानंतर अलाउद्दीन खिलजीने ‘अबुल मुजफ्फर सुलतान अलाउद्दुनिया’ व ‘दीन मुहम्मद शाह खिलजी’ ही उपाधी ग्रहण केली.


जलालुद्दीन फिरोजशाह खिलजीने अलाउद्दीन खिलजीला ‘अमीर-ए-तुजक’ हे पद प्रदान केले.


खिलजीची प्रशासनव्यवस्था अत्यंत सुसज्ज होती. सैनिकांची भरती करणे, वेतन वितरित करणे, सैन्य सुसज्ज करणे, सैन्य निरीक्षण करण्याची व्यवस्था अतिशय चोख होती. हे कार्य करणाऱ्या अधिकाऱ्याला ‘दिवाण-ए-आरीज’ असे म्हटले जात असे.


अलाउद्दीन खिलजीने दैनिक वापरात येणाऱ्या वस्तूंची एक यादी तयार करण्यास लावली होती. त्या यादीतील सर्व वस्तूंची किंमत निश्चित करण्यात आली होती.


अलाउद्दीन खिलजीच्या शासनकाळात बाजाराची गुप्तरुपात माहिती सुलतान पर्यंत पोहोचवण्यासाठी ‘मूनहीयान’ अर्थात ‘गुप्तचरांची’ नियुक्ती करण्यात आली.


बाजारातील वस्तू योग्य आहेत कि नाहीत याची चौकशी करून ती माहिती सुलतान पर्यंत पोहोचविणाऱ्या अधिकाऱ्यास ‘वरीद-ए-मंडी’ म्हणण्यात येत असे.


युद्धातील लुटीच्या मालावर ‘खमस’ नावाचा कर लावण्यात येत असे. लुटीच्या मालातील ४/५ भाग राजकोषात जमा केला जात असे. आणि उर्वरित १/५ भाग सैनिकांमध्ये वितरित केला जात असे.


अलाउद्दीन खिलजीने प्रशासनातील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘दिवाण-ए-मुस्तखराज’ या नवीन विभागाची स्थापना केली.


‘अलाई दरवाजा’ ज्याला इस्लामिक स्थापत्य कलेचे सर्वाधिक बहुमूल्य रत्न समजले जाते त्याचे निर्माण अलाउद्दीन खिलजी याने केले होते.


‘सिरी’ येथे अलाउद्दीन खिलजीने नवीन शहर वसविले होते. सिरी येथील ‘हजार सीतून’ नावाच्या महालाचे निर्माण अलाउद्दीन खिलजीने केले होते.


राजकारण आणि प्रशासनातून उलेमांचा हस्तक्षेप नाकारणारा अलाउद्दीन खिलजी हा पहिला सुलतान होता.


अलाउद्दीनच्या नंतर कुतुबुद्दीन मुबारकशाहने अलाउद्दीन खिलजीच्या कठोर नियमांना रद्द करून ‘क्षमा धोरणा’चा स्वीकार केला.






तुघलक वंश 
गियासुद्दीन तुगलक गाजी ‘करौना’ जातीचा तुर्क होता. १३२० साली तो दिल्लीच्या गादीवर बसला. याने कृषी उत्पादनात वाढ करण्यावर भर दिला. याशिवाय कालव्यांची निर्मिती देखील केली.


राजकोषांत धनाची कमतरता आणि साम्राज्य विस्ताराच्या नीतीला कार्यरूपात परिणत करण्यासाठी मुहम्मद-बिन-तुघलकने सांकेतिक मुद्रेचे प्रचलन केले. मुहम्मद बिन तुघलकाने इराक तसेच खुरासान विजयाची योजना तयार केली होती.


मुहंमद बिन तुघलकाने स्वतंत्र कृषी विभागाची निर्मिती केली होती. त्या विभागाचे नाव ‘दिवाण ए कोही’ असे ठेवण्यात आले.


तुघलकाने दरबारात योग्यतेच्या आधारावर पद देण्यास सुरुवात केली. 

तुघलकाने आपली राजधानी दिल्लीहून दौलताबाद येतेच हलविली होती. व नंतर परत दौलताबादहून दिल्लीला हलविली होती. एल्फिन्स्टन हा पहिला इतिहासकार होता, ज्याचा विश्वास होता कि मुहम्मद बिन तुगलक मध्ये वेडसरपणाचा अंश होता.


फिरोजशाह तुघलकने सुलतान बनल्यानंतर २४ कर रद्द केले. इस्लाममधील नियमानुसार त्याने केवळ चार कर लागू केले. खराज, खमस, जंजिया आणि जकात हे केवळ चारच कर ठेवण्यात आले. यातील जकात कर हा केवळ मुस्लिमांसाठी होता. तर जजिया कर हा केवळ मुस्लिमेतर लोकांसाठी होता.

फिरोजशाह तुघलक हा हिंदू मातेच्या पोटी जन्माला आलेला पहिला मुस्लिम राजा होता. फिरोजशाह तुघलकने अशोकाचे खिज्रबाद आणि मेरठ येथील स्तंभ दिल्लीत मागवून स्थापित केले होते.


बर्नीद्वारे लिखित ‘फतवा-ए-जहांदारी’ तसेच ‘तारीख-ए-फिरोजशाही’ हे ग्रंथ फिरोजशाह तुघलकाच्या शासनकाळातच लिहिले गेलेले आहेत. फिरोजशाह तुघलकाने स्वतःचे ‘फतूहाते फिरोजशाही’ नावाचे आत्मचरित्र लिहिले होते. त्याचा ‘दलायले फिरोजशाही ‘ हा फारसीमधील अनुवादित ग्रंथ आहे.


फिरोजशाह तुघलकाने दिल्लीमध्ये एक नवीन दान विभाग स्थापन केला होता. त्या विभागाला ‘दिवाण-ए-खैरात’ असे नाव देण्यात आले होते.






लोदी वंश
सय्यद घराण्यानंतर बहलोल लोदी गादीवर बसला. या राजाने बहलोल नावाचा शिक्का तयार केला होता.


हा पहिला असा राजा होता जो सैनिक उभे राहिल्यासस्वतःदेखील उभे राहायचा.


यांनतर सिकंदर लोदी गादीवर बसला. सिकंदर लोदी स्वर्णकार हिंदू मातेचा पूर होता. त्याच्या आईचे नाव जयबंद होते. 


सिकंदर लोदीने संस्कृतमधील एका आयुर्वेद ग्रंथाचे ‘परहांगे सिकंदरी’ असे फारसीमध्ये भाषांतर केले होते.


सिकंदर लोदीने मुस्लिम स्त्रियांना पीर तसेच संतांकडे जाण्यास बंदी घातली होती.


सिकंदराने १५०४ मध्ये आग्रा हे शहर वसविले.


प्रसिद्ध संत कबीरदास हा सिकंदर लोदीचा समकालीन होता.


त्याच्यानंतर गादीवर बसलेल्या इब्राहिम लोदीने विक्रमजीत या राजाला हरवून ग्वाल्हेर दिल्ली संस्थानास जोडले.


२१ एप्रिल १५२६ रोजी इब्राहिम लोदी बाबरकडून पराजित झाला व येथेच लोदी घराणे संपुष्टात आले.