अर्थव्यवस्थेचे सामान्य प्रकार
भांडवलशाही अर्थव्यवस्था
सैद्धांतिक मांडणी : एडम स्मिथ (स्कॉटलंड)
 १७७६ : द वेल्थ ऑफ नेशन ग्रंथ प्रकाशित
अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, युरोपियन देश, जपान ही राष्ट्रे भांडवलशाही राष्ट्रे मानली जातात.

या अर्थव्यवस्थेत ग्राहक सार्वभौम असतो. या अर्थव्यवस्थेत शासनाचा अल्प हस्तक्षेप असतो. 

परचक्रापासून संरक्षण आणि अंतर्गत शांतता व सुव्यवस्था यांचे संस्थापन, एवढीच सरकारची मुख्य कार्ये असतात. सरकारने यापलीकडे जाऊन अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप करण्याचे कारण नाही असा विचार समाजात प्रसृत असतो.


या अर्थव्यवस्थेत नफ्याला प्राधान्य असते. खाजगी मालकी असते व बाजारपेठेत स्पर्धेचे प्राबल्य असते

ज्यांच्याकडे क्रयशक्ती (Purchasing Power) असते त्यालाच वस्तू व सेवांचे वितरण केले जाते. 

या अर्थव्यवस्थेत किमत ठरवण्याची प्रक्रिया मुक्तपणे चालते. या अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्था, हस्तक्षेपविरहित बाजार, Laissez Faire, बाजार अर्थव्यवस्था, Market Economy असेही म्हणतात. उत्पादनाबाबत कुठलेही नियोजन नसल्यामुळे अशा अर्थव्यवस्थेला अनियोजित (Unplanned economy) असेही म्हणतात. 

एडम स्मिथ यांच्या मते बाजारपेठेत स्पर्धा असणे आवश्यक आहे. त्यांच्या मते एकाधिकार हे ग्राहकाविरुद्ध षड्यंत्र आहे. स्मिथ यांच्या मते बाजार अर्थव्यवस्था हि सर्वश्रेष्ठ आहे कारण याच्यामुळे सामान्य माणसाच्या हितात वाढ होते. यालाच ‘कल्याणकारी अर्थव्यवस्थेचा प्रथम मुलभूत प्रमेय’ म्हणतात.

आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण,  नफा जास्त वेतन कमी, बेकारी वाढणे आणि आर्थिक विषमतेत होणारी वाढ हे बाजार अर्थव्यवस्थेचे दोष आहेत.  

या अर्थव्यवस्थेत उत्पन्नाची साधने खाजगी मालकीची असतात आणि उत्पादनाचे कार्य व विभाजन हे बाजारयंत्रणेच्या माध्यमातुन होते. म्हणुन अशा अर्थव्यवस्थांना भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणतात.


वैशिष्ट्ये :-
०१. खाजगी मालकी हक्क हे भांडवलषाही अर्थव्यवस्थेचे मुलभूत वैषिश्टे आहे.

०२. या अर्थव्यवस्थेत उदयोग व्यवसाय उभारणी निवड यासंबंधीचे निर्णय मालक स्वतः व स्वतंत्रपणे घेउ शकतो.

०३. या प्रकारच्या अर्थव्यवस्थेत स्पर्धेचे प्राबल्य असते.

०४. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत ग्राहक सार्वभौम असतो.

०५. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत किंमत ठरवण्याची प्रक्रिया मुक्तपणे चालते. यामध्ये सरकारी हस्तक्षेप केला जात नाही. म्हणुनच या अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्था म्हणतात.

०६. या अर्थव्यवस्थेत वस्तु व सेवांच्या किंमती या बाजारातील मागणी व पुरवठा यांवर अवलंबुन असतात. म्हणुनच या अर्थव्यवस्थेला बाजार अर्थव्यवस्था असे म्हणतात.

०७. या अर्थव्यवस्थेत नफा मिळविणे या हेतुने उत्पादन केले जाते.

०८. या अर्थव्यवस्थेत संयोजन कौशल्याला पुर्णपणे वाव असतो.

०९. उत्पादनामध्ये कुठलेही नियोजन नसल्याने या अर्थव्यवस्थेला अनियोजित अर्थव्यवस्था असे म्हणतात.


दोष:-
०१. आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण तसेच आर्थिक विषमता मोठया प्रमाणात दिसुन येते.
०२. जास्तीत जास्त नफा मिळवणे हे प्राथमिक उद्दिष्ट असल्यामुळे बेरोजगारी कामगार कल्याण पर्यावरण गरिबी इत्यादींचा विचार केला जात नाही.समाजवादी अर्थव्यवस्था
सैद्धांतिक मांडणी – कार्ल मार्क्स
पुस्तके : १.दास कॅपिटल
             २.कम्युनिस्ट मैनिफेस्टो

१८६७, १८८३, १८९३ मध्ये दास कॅपिटलचे अनुक्रमे पहिला दुसरा व तिसरा खंड प्रकाशित झाला.

बोल्शेविक क्रांतीनंतर पूर्व सोविएत संघात या अर्थव्यवस्थेचा उदय झाला. रशिया, क्युबा, चीन ही समाजवादी राष्ट्रे मानली जातात.

या अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनावर शासनाची मालकी असते. या अर्थव्यवस्थेत ग्राहक सार्वभौम नसतो सर्व निर्णय शासनाचे असतात. 

नफा कमवणे हे एक उद्दिष्ट असते मात्र तो नफा जनकल्याणार्थ वापरला जातो.

या अर्थव्यवस्थेला राज्य अर्थव्यवस्था (State Economy), राज्य भांडवलशाही (State Capitalism) , केंद्रीय अर्थव्यवस्था (Centralised Economy), केंद्रीय नियोजित अर्थव्यवस्था असेही म्हणतात.

याचा दोष म्हणजे व्यक्तीला वैयक्तीक फायदा नसल्याने जास्त उत्पादन करण्याची प्रेरणा मिळत नाही व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतो.

सर्व प्रथम समाजवादाचा स्विकार रशिया (USSR) ने केला. त्याचे १९९० ला विघटन होऊन १५ राष्ट्रे निर्माण झाली. त्यांना CIS (Common Wealth of Independent States) म्हणतात. 

या अर्थव्यवस्थेचे पहिले प्रारूप म्हणजे सोविएत संघाचा समाजवादी प्रारूप (Socialist) आणि दुसरे प्रारूप म्हणजे चीनचा साम्यवादी (Communist) प्रारूप आहे.

१९५० च्या दशकात पोलंडचे प्रा.ऑस्कर लांज यांनी  ‘बाजार समाजवाद’ ची कल्पना मांडली.  समाजवादी अर्थव्यवस्थाना त्यांनी हा पर्याय सुचवला.  

साम्यवादी चीनने १९८५ मध्ये ‘बाजार समाजवाद’ ला आपल्या ओपनडोर नीती अंतर्गत स्वीकारले. याच वेळी पूर्व सोविएतने ‘ग्लासनॉस्ट’ आणि ‘प्रेस्टोयका’ नावाने याला स्वीकारले. 


या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने सरकारी किंवा सार्वजनिक मालकिची असतात व उत्पादनकार्य आणि विभाजन सरकारमार्फत केले जाते.


वैशिष्ट्ये :-
०१. उत्पादन व संपत्तीबाबत करार करणे, उदयोग सुरू करणे इत्यादी निर्णय सरकार घेते, याबाबत व्यक्तिंना स्वातंत्र्य नसते.
०२. या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने सरकारी मालकीची असतात तसेच साधन सामग्रीचा वापर समाजहितासाठी केला जातो.

०३. या अर्थव्यवस्थेत वस्तु व सेवांचे उत्पादन वैयक्तिक नफ्यासाठी होत नाही.

०४. मुलभुत गरजेच्या वस्तु सर्वांना कमीत कमी व किमान प्रमाणात प्राप्त करून देण्याचा निर्णय घेतला जातो.

०५. वस्तु व सेवांच्या उत्पादन वाटप किंवा वितरण किंमत इत्यादी बाबी बाजारयंत्रणेवर अवलंबुन नसतात.

०६. याबाबतचे निर्णय शासन घेते त्यामुळे ग्राहक सार्वभौम ठरत नाही


दोष:-
०१. या अर्थव्यवस्थेत व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतो.

०२. या अर्थव्यवस्थेत सरकारी नियंत्रणाचा अतिरेक तसेच राज्यकर्त्यांची हुकुमशाही दिसुन येते.

०३. साधनसाम्रग्रीचा अपव्यय होतो.

०४. कार्यक्षमता व उत्पादकता कमी होते.

१९९१ मध्ये रशिया या देशाचे १५ देशांत विभाजन झाले तेव्हा बऱ्याच देशांनी भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा त्याग केलेला आहे. तरीही चीन, क्युबा, उत्तर कोरिया, व्हिएतनाम या देशांमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था असल्याचे दिसुन येते.


मिश्र अर्थव्यवस्था 
लॉर्ड जॉन मेनार्ड केंस यांनी १९२९ च्या जागतिक महामंदीचा अभ्यास करताना याची सैद्धांतिक मांडणी केली.

१९४० मध्ये फ्रांसने याचा स्वीकार केला. त्यानंतर युएसए व तिसऱ्या जगातील अनेक देशांनी याचा स्वीकार केला. 

भांडवलशाही व समाजवाद यांच्यातील दोष टाळून चांगल्या गुणांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न याच्यात केला गेला. 

यामध्ये खाजगी व सार्वजनिक क्षेत्राचे सहअस्तित्व असते. खाजगी क्षेत्रातील निर्णय बाजारपेठेतील मागणी पुरवठ्यावरअवलंबून तर सार्वजनिक क्षेत्रातील निर्णय शासन न नफा न तोटा या तत्वावर स्वतंत्रपणे घेते. 

१९९३-१९९९ च्या मध्यात आयएमएफ व जागतिक बँकेने या आर्थिक प्रणालीला अधिकृत पृष्ठी दिली. आर्थिक विकास व सामाजिक न्याय प्रथापित करने हा प्रमुख उद्देश या अर्थव्यवस्थेचा असतो.

यालाच ‘कल्याणकारी अर्थव्यवस्था’ व ‘लोकशाही अर्थव्यवस्था’ असेही म्हणतात.विकासानुसार अर्थव्यवस्था
विकसित अर्थव्यवस्था
दरडोई मोठे उत्पन्न, औद्योगीकरण, शहरीकरण, साक्षरता मोठ्या प्रमाणात, घटता जन्मदर, घटता मृत्युदर ही याची वैशिष्ट्ये आहेत.
युएसए, युके, जर्मनी, फ्रांस, स्वित्झर्लंड ही याची उदाहरणे आहेत.

विकसनशील अर्थव्यवस्था
वरील वैशिष्ट्ये कमी प्रमाणात असतात.
भारत, पाकिस्तान, श्रीलंका इत्यादी देशांचा यात समावेश होतो.