आंतरराष्ट्रीय व्यापार

भारताचा परकीय व्यापार
दोन भागांत वर्गीकरण

अंतर्गत व्यापार (Internal Trade)

०१. घाउक व्यापार
०२. किरकोळ व्यापार

आंतरराष्ट्रीय व्यापार

०१. आयात व्यापार
०२. निर्यात व्यापार
०३. पुनर्निर्यात व्यापार

परकीय चलन भांडार (Foreign Exchange Reserve)

कोणत्याही अर्थव्यवस्थेत कोणत्याही वेळी विदेशी चलनाची जी व्यवस्था असते. त्यास परकिय चलन भांडार असे म्हणतात. ही एक व्यापक संकल्पना असुन यामध्ये
०१. विदेषी मुद्रा भांडार (RBI कडे)
०२. RBI स्वर्ण भांडार (Gold Reserve)
०३. SDR (Special Drawing Right) प्रत्येक देशाचा IMF मधील वाटा.
०४. RIP (Reserve Tranche Position) IMF कडील सुरक्षित रक्कम
ही एका प्रकारे IMF मधील देशाची पत असते. ज्याद्वारे परकिय चलन तात्काळ उपलब्ध होउ शकते. या चारींना एकत्र करून कोणत्याही देशाचा परकिय चलन साठा तयार होतो यास Forex असे म्हणतात.
हेForeignExchange चे लघुरूप आहे.
चलनाचा विनिमय दरजगामध्ये सर्व देशाची अर्थव्यवस्था एक दुसऱ्यांवर अवलंबुन असते. त्यासाठी चलनाचे मुल्य निर्धारण (विनिमय दर) झाले पाहिजे. म्हणजेच विनिमय दर निर्धारित केल्याशिवाय वैश्विक व्यापार असंभव आहे.
जगातील विविध चलनाचे विनिमय दर निर्धारित करणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेस मुद्रा व्यवस्था असे म्हणतात हा विनिमय दर खालील ३ संस्था ठरवु शकतात.
०१. IMF
०२. Market
०३. स्वतः देश

चलनाच्या विनिमय दराचे प्रकार

स्थिर विनिमय दर (Fixed Currency Rate)या व्यवस्थेमध्ये IMF द्वारे सदस्य राष्ट्रांच्या चलनाचा विनिमय दर निश्चित करण्यासाठी जगातील पाच सर्वात महत्वपुर्ण चलनाच्या दरावरून एक बास्केट तयार केला जातो.
व ज्या देशात स्थिर विनिमय दर वापरांत असेल ते देश त्या बास्केट दराशी तुलना करून विनिमय दर ठरवत असतात.
मुक्त विनिमय दर (Floating Currency Rate)
ज्या वेळेस बाजारातील शक्तीवर (Market Forces) आधारित विनिमय दर व्यवस्था असते त्यास मुक्त विनिमय दर असे म्हणतात.
इंग्लड मध्ये १९६० च्या दशकापर्यंत स्थिर विनिमय दर वापरात होता. पण १९६० च्या दशकात इंग्लड मध्ये परकीय चलनाचे संकट गंभीर बनले आणि त्यांनी मुक्त विनिमय दर स्वीकारला.
नियंत्रित विनिमय दर (Managed Exchange Rate)
स्थिर व मुक्त विनिमय दराचे एकत्रिकरण करून ज्यावेळेस त्या दरावर शासन नियंत्रण ठेवते त्यास नियंत्रित विनिमय दर असे म्हणतात.
आज जगात बहुतांश देशानी मुक्त विनिमय दर स्वीकारला आहे पण ज्यावेळेस विनिमय दर खुपच उग्र होतो. त्यावेळेसच सरकार त्यामध्ये हस्तक्षेप करते.

व्यवहार तोल [Balance of Payment] एका आर्थिक वर्षात भारताचे जगातील सर्व देशाशी झालेल्या सर्व प्रकारच्या व्यापाराचा एकत्रित ताळेबंद म्हणजे व्यवहार तोल होय.

यात खालील दोन बाबी येतात
चालु खाते (Current Account)चलु खाते हा शब्द दोन अर्थ सुचित करतो.
०१. एखादया व्यावसायिक किंवा कंपनीद्वारे बैकेत काढलेले अकाउंट
०२. हे विदेशी व्यवहारासंबंधी ज्यामध्ये ज्यामध्ये सर्व चालु स्वरूपाच्या आयात निर्यातीचा समावेश होतो.
भारतामध्ये या खात्याचे प्रबंधन RBI द्वारे केले जाते. या मध्ये कमी कालावधीसाठी होणाऱ्या व्यवहारांचा समावेश होतो.
वस्तु व सेवांचा अल्प कालावधीसाठीचा व्यापार म्हणजे चालु खाते होय.याचे दोन प्रकार पडतात.
०१. दृष्य खाते (व्यापार खाते)  (किंवा वस्तु व्यापार खाते)
यामध्ये आपल्याला दिसु शकणाऱ्या वस्तु व्यापाराचा समावेश होतो म्हणुन त्यांस दृष्य खात्यावरील व्यापार असे म्हणतात.  उदा. पेट्रोल आयात, साखर निर्यात.
०२. अदृश्य खाते (सेवा व्यापार खाते)
ज्या खात्यांवर सेवांची देवाण घेवाण नोंदवली जाते त्यास सेवा व्यापार खाते असे म्हणतात. तो व्यवहार डोळ्यांना प्रत्यक्ष दिसत नसल्यामुळे त्यास अदृश्य खात्यावरील व्यवहार असे म्हणतात.
भांडवली खाते (Capital Account)
जगातल्या विविध देशांमध्ये होणाऱ्या सर्व दीर्घ मुदतीच्या व्यवहाराची नोंद भांडवली खात्यावर होते. यामध्ये परकीय कर्ज तसेच FDI यांचाही समावेश होतो.
भारतामध्ये या खात्याचे प्रबंधन RBI कडे आहे.