शहरांच्या जागतिक क्रमवारीत पुणे तेराव्या क्रमांकावर
सर्वाधिक वेगाने बदलणाऱ्या शहरांच्या जागतिक क्रमवारीत पुण्याने तेरावे स्थान पटकावले आहे. पुण्याप्रमाणेच हैदराबाद पाचव्या स्थानावर, तर बंगळूर पहिल्या स्थानावर आहे. 

जगभरातील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे मानले जाणारे हे मूल्यांकन ‘जेएलएल’ या अमेरिकी गुंतवणूक व्यवस्थापन कंपनीने केले आहे.

जगातील सर्वाधिक ‘डायनॅमिक सिटी’ म्हणजे वेगाने बदलणारी शहरे असलेल्या देशांच्या क्रमवारीत भारताने पहिला क्रमांक पटकावला आहे. या बाबतीत आपल्या देशाने चीनला मागे टाकले आहे.

देशांतर्गत शहरांमध्ये बंगळूर शहराने प्रथम क्रमांक, तर हैदराबादने दुसरा आणि पुण्याने तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्यापाठोपाठ चेन्नई, दिल्ली व मुंबईचा क्रमांक लागतो.



यूपीएससी परीक्षेमध्ये कर्नाटकच्या नंदिनी के.आर. देशात प्रथम
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) जाहीर झालेल्या निकालामध्ये कर्नाटकच्या नंदिनी के.आर. हिने देशात अव्वल स्थान पटकावले. अनमोल शेर सिंग बेदी अणि जी. रोनान्की यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळविले. 

आयएएस (भारतीय प्रशासकीय सेवा), आयएफएस (भारतीय विदेश सेवा), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) आणि केंद्रीय सेवांच्या नियुक्तीसाठी एकूण १०९९ उमेदवारांची निवड करण्यात आली.



राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे नवे उपाध्यक्ष जॉर्ज कुरियन
राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे नवे उपाध्यक्ष म्हणून जॉर्ज कुरियन यांना नियुक्त करण्यात आले आहे.

राष्ट्रीय अल्पसंख्यांक अधिनियम १९९२ अंतर्गत राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग (NCM) ची स्थापना झाली. भारतात अल्पसंख्याकमध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी आणि जैन हे सहा धार्मिक समुदाय आहेत.






भारत, जर्मनी दरम्यान १२ महत्त्वाच्या JDI व करारांवर स्वाक्षर्‍या
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ २९ मे २०१७ पासून जर्मनी, स्पेन, रशिया आणि फ्रान्स या चार युरोपीय देशांच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. भारतासोबतचे द्वीपक्षीय आर्थिक संबंध मजबूत करण्याच्या दृष्टीने ही भेट आहे.


प्रवासात प्रथम त्यांनी जर्मनीची भेट घेतली. या दरम्यान भारत-जर्मनी यांच्यात विविध क्षेत्रात सहकार्यासाठी ३ सामंजस्य करारांवर आणि ८ संयुक्त हेतूपरस्पर जाहीरनामे (JDI) स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. 


भारताने पश्चिम जर्मनी आणि पूर्व जर्मनी या दोघांशीही आपले राजनैतिक संबंध प्रस्थापित केले होते आणि १९९० साली त्यांच्या एकत्रीकरणालासुद्धा पाठिंबा दर्शविला होता. युरोपीय समुदायात जर्मनी हा भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे. भारतात जर्मनीच्या १६०० कंपन्या असून ६०० संयुक्त प्रकल्प आहेत.






भारत, स्पेन यांच्यात ७ करार
जर्मनीच्या यशस्वी भेटीनंतर भारताचे पंतप्रधान ३० जूनला स्पेनमध्ये दाखल झालेत. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रात ७ करार करण्यात आले आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३१ जून २०१७ रोजी स्पेनचे राष्ट्राध्यक्ष मारिआनो राजॉय यांच्याशी चर्चा केली.


भारतात अधिक गुंतवणूक करण्यासाठी स्पेनला मोठा वाव असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अलीकडेच स्पेनच्या राष्ट्रीय नवीकरणीय ऊर्जा केंद्र (CENER) आणि भारताच्या राष्ट्रीय पवन ऊर्जा संस्था (NIWE) दरम्यान सामंजस्य करार झाला आहे. 


याशिवाय नील-अर्थव्यवस्था, खगोलशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जीव-विज्ञान अश्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी दोन्ही देशांनी मान्य केले आहे.


१९७८ साली स्पेनमध्ये लोकशाही आल्यापासून भारत आणि स्पेन यांच्यातील संबंधात वाढ झाली. १९५६ साली नवी दिल्लीत स्पॅनिश दूतावास सुरू करण्याबरोबरच भारत आणि स्पेन यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झालेत. 


महाराजा सवाई मान सिंह II (जयपूरचे महाराज) यांना १९६५ मध्ये स्पेनमधील भारताचे प्रथम राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले.






चारा लागवडीचा अंदाज घेण्यासाठी अमूलचा ISRO सोबत करार
गुजरात सहकारी दूध विपणन संघ (GCMMF) ने भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) सोबत करार केला आहे.


कराराअंतर्गत, ग्रामीण भागातील खाद्यान्न पिके व चारा यांची ओळख पटण्यासाठी आणि ग्राम पातळीवर चारा लागवडीस योग्य ठिकाण शोधण्यास ISRO मदत करणार.


GCMMF ‘अमूल’ या ब्रँड नावाखाली आपली उत्पादने बाजारात आणते.






NASA सूर्याच्या कक्षेत ‘पार्कर सोलर प्रोब’ सोडणार
नॅशनल एरोनॉटिक्स ऍण्ड स्पेस अॅडमिनिसट्रेशनने डेल्टा IV हेवी अग्निबाणच्या सहाय्याने ३१ जुलै २०१८ रोजी थेट सूर्याच्या वातावरणात ‘पार्कर सोलर प्रोब’ सोडणार असल्याची घोषणा केली आहे.


६.३ दशलक्ष कि.मी. सूर्याच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करणार. यानावर कार्बन-संमिश्र ४.५ इंच जाड आच्छादन असेल.






महिला कार्यदलात १३१ देशांमध्ये भारत १२० व्या स्थानी
जागतिक बँकने देशातील अर्थव्यवस्थेत व विकासात हातभार लावणार्‍या मानवी कार्यदलात स्त्री-पुरूषांचे प्रमाण याविषयी १३१ देशांचा अभ्यास केला आहे. प्रसिद्ध अहवालासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेकडून (ILO) आकडेवारी प्राप्त करण्यात आली.


‘इंडिया डेवलपमेंट रिपोर्ट २०१७’ नुसार, कर्मचार्‍यांच्या संख्येत महिलांची भागीदारी यासंदर्भात १३१ देशांमध्ये भारताचा १२० वा क्रमांक लागतो. 


सेवा व उद्योग क्षेत्रात भारतीय महिलांची भागीदारी २०% इतकी कमी आहे. महिला कर्मचार्‍यांची भागीदारी पाकिस्तानमध्ये २४.६%, अरब देशात २३.३% आहे, तर नेपाळमध्ये ७९.९%, चीनमध्ये ६३.९% आहे.


समान उत्पन्न मिळवणार्‍या देशांमध्ये, भारत यमन, पाकिस्तान आणि इजिप्त यांच्या बरोबरीने यादीत शेवटी आहे.


या सोबतच प्रसिद्ध महिला उद्योजकता निर्देशांकमध्ये भारताचा ७७ देशांमध्ये ७० वा क्रमांक लागतो.






UNGA चे नवे प्रेसिडेंट मिरोस्‍लाव लाजकक
संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेचे (UNGA) पुढील प्रेसिडेंट म्हणून मिरोस्‍लाव लाजकक यांची निवड झाली आहे. ते वर्तमान UNGA प्रेसिडेंट पीटर थॉमसन यांच्या जागेवर येतील.


१२ सप्टेंबर २०१७ पासून सुरू होणार्‍या १९३ सदस्यीय या UNGA च्या ७२ व्या सत्रात ते प्रेसिडेंटपद भूषवतील.


मिरोस्‍लाव लाजकक यांचे नामांकन यूरोपियन राष्ट्र ‘स्लोवाकीया’ सरकारने दिले होते. त्यांनी स्लोवाक राजदूत म्हणून सेवा दिली आहे तसेच अनेक मंत्रिपद भूषवलेली आहेत.