बैजू पाटील यांना ‘नेचर बेस्ट एशिया’ पुरस्कार जाहीर
वन्यजीव छायाचित्रणात अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविणारे प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांना जपानचा ‘नेचर बेस्ट एशिया’ पुरस्कार जाहीर झाला आहे. 


जपानमधील टोकियो येथे ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या एका सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येईल. 

बैजू पाटील यांनी गोव्यातील महावीर अभयारण्यात काढलेल्या ‘मलबार ग्लायडिंग फ्रॉग’ची आशियातील ८५०० छायाचित्रांतून ‘हायली ऑनर्ड’ प्रकारात निवड झाली. या बेडकाचा रंग पूर्णपणे हिरवा असून एखादा कोळी (स्पायडर) झाडांच्या पानांवर जसा फिरतो त्याप्रमाणेच हा बेडूक फिरत असतो 



भारतातील ‘फेसबुक युजर्स’ची संख्या जगातील सर्वोच्चफेसबुक वापरणाऱ्या भारतीय युजर्सची संख्या ही आता तब्बल २४.१ कोटी इतकी झाल्याची माहिती फेसबुककडून देण्यात आली असून, ही संख्या कोणत्याही इतर देशामधील युजर्सच्या संख्येपेक्षा जास्त असल्याचेही निष्पन्न झाले आहे. 


अमेरिकेमध्ये फेसबुक वापरणाऱ्या युजर्सची संख्या २४ कोटी इतकी आहे. तर जगातील फेसबुक युजर्सची एकूण संख्या २ अब्ज इतकी झाली आहे.

गेल्या सहा महिन्यांत अमेरिकन फेसबुक युजर्सची संख्या ही १२ टक्‍क्‍यांनी वाढली; तर याच काळात भारतीय युजर्सची संख्या तब्बल २७ टक्‍क्‍यांनी वाढली. 

भारतामध्ये फेसबुक वापरणाऱ्या एकूण युजर्सपैकी तब्बल दोन तृतीयांश युजर्स हे पुरुष असल्याचेही निष्पन्न झाले आहे. तर अमेरिकेमधील एकूण फेसबुक युजर्सपैकी ५४% या महिला आहेत. 



अनुराग म्हामल भारताचा ४८ वा ग्रॅण्डमास्टरबुद्धिबळातील सर्वोच्च किताब असलेल्या ‘ग्रॅण्डमास्टर’चा मान अपेक्षितपणे अनुराग म्हामल याने पटकाविला. भारताचा तो ४८ वा ग्रॅण्डमास्टर आहे.

ग्रॅण्डमास्टर किताब मिळवणारा अनुराग हा पहिला गोमंतकीय खेळाडू ठरला. अनुराग सध्या स्पेन येथे ३७ व्या बेनास्क्वे आंतरराष्ट्रीय ओपन स्पर्धेत खेळत आहे. त्याने पाच फेऱ्यांत ४.४ एलो गुण मिळवले आणि २५०० रेटिंगचा टप्पा गाठला. या कामगिरीनंतर अनुरागने ‘ग्रॅण्डमास्टर’ किताबाला गवसणी घातली 



गंगा नदीचा परिसर ‘नो-डेव्हलपमेंट झोन’ म्हणून NGT कडून घोषित
राष्ट्रीय हरित अधिकरण (NGT) कडून उत्तरप्रदेशच्या हरिद्वार आणि उन्नाव शहरांच्या दरम्यान असलेल्या गंगा नदीच्या किनाऱ्यापासून १०० मीटरच्या आत असलेल्या परिसराला ‘नो-डेव्हलपमेंट झोन’ म्हणून घोषित केले गेले आहे.

नदीपासून ५०० मीटरच्या परिसरात कचरा टाकण्यावर बंदी घातली आहे. या बंदीचे उल्लंघन केल्यास पर्यावरणाची भरपाई म्हणून त्या व्यक्तीवर ५०००० रूपयांचा दंड आकारला जाईल. आता या क्षेत्रात व्यावसायिक किंवा निवासी अश्या कोणत्याही प्रकारचे बांधकाम होऊ शकत नाही.

शिवाय, जलसंसाधन मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक देखरेख समिती नेमली आहे. ही समिती NGT पुढे नियमित आपला अहवाल सादर करणार. 

उत्तरप्रदेश सरकारने चामड्याच्या उद्योगांपासून निघणार्‍या सांडपाण्याची वाट सहा आठवड्यात नदीपासून बदलण्यासाठी कार्य करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी शुल्क आकारणे आवश्यक आहे.
 
नदीच्या परिसरातील उद्योगांकडून केल्या जाणार्‍या भूजलांच्या अंदाधुंद उपसावर अंकुश आणले जावे. 



भारतीय रेल्वेने लाँच केली सौर ऊर्जेवर चालणारी ट्रेन
भारतीय रेल्वेने प्रथमच सौरऊर्जेवर चालणाऱ्या डिझेल ट्रेनचा वापर सुरु केला आहे. १४ जुलै रोजी दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकात या ट्रेनचे उदघाटन झाले. 

दिल्लीच्या सराई रोहिला ते हरयाणाच्या फारुख नगर या मार्गावर ही ट्रेन धावेल. ट्रेनच्या एकूण सहा डब्ब्यांवर सौर ऊर्जेचे १६ पॅनल बसवण्यात आले आहेत. 
मेक इन इंडिया कार्यक्रमातंर्गत या सोलार पॅनलची निर्मिती करण्यात आली असून, त्यासाठी ५४ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. 

जगात प्रथमच रेल्वेमध्ये सोलार पॅनलचा विद्युत ग्रीड म्हणून वापर करण्यात येणार आहे. या ट्रेनमध्ये पावर बॅकअपची सुविधा असून, ही ट्रेन ७२ तास बॅटरीवर चालू शकते. 



नोबेलविजेते ल्यू शाबो यांचे निधन
चीनमधील सरकारी दमनशाहीविरोधात सातत्याने आवाज उठवणारेज्येष्ठ लेखक ल्यू शाबो यांचे १३ जुलै रोजी वयाच्या ६१ व्या वर्षी निधन झाले. सरकार विरुद्ध आवाज उठविल्याने त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. कर्करोगाचे निदान झाल्यानंतरही योग्य उपचार न मिळाल्याने त्यांचे निधन झाले.त्यांच्या निधनाने चीनमधील लोकशाहीचा आवाज हरपला आहे. 

चीनमधील मानवी हक्कांची जपणूक व राजकीय रचनेत सुधारणा या मागण्यांसाठी सन २००८ मध्ये एक याचिका तयार करण्यात आली होती. तिच्या लेखनात ल्यू शाबो यांचा सहभाग होता. त्यासाठी त्यांना अटक झाली होती. 

तसेच पुढे २००९ मध्ये राष्ट्राच्या अधिकारांना आव्हान दिल्याचा ठपका ठेवून त्यांना ११ वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला. 

तुरुंगात असतानाच त्यांना शांततेचे नोबेल जाहीर झाले. मात्र ओस्लो येथे सन २०१० मध्ये झालेल्या नोबेल सोहळ्यात त्यांना सहभागी होता आले नव्हते. त्या सोहळ्यात ल्यू शाबो यांची खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती 



कोलंबो मध्ये भारतीय श्रीलंकेच्या हवाई युद्धाभ्यासाची सांगता
१४ जुलै २०१७ रोजी कोलंबो येथे आयोजित भारत आणि श्रीलंकेच्या हवाई दलांच्या संयुक्त युद्धभ्यासाची सांगता झाली. 

या अभ्यासात दोन्ही दलाने एकमेकांसोबत मानक कार्यान्वयन पद्धती तसेच त्यांचे अनुभव व कल्पना सामायिक केल्या. हा सराव ९ जुलै २०१७ पासून सुरू होता.