या प्रकरणातील नोट्स विशेषतः राज्यसेवा परीक्षेसाठी आहेत

आकस्मिक शक्ती (शीघ्रगतीने) 
भूकंप
वर्चेस्टर यांच्या मते भूकंप म्हणजे, “पृथ्वीच्या पृष्ठभागातील खडकांचे संतुलन क्षणिक बिघडणे होय.” 


पृथ्वीच्या पृष्ठभागास सरासरी दर तीन मिनिटाला एक भूकंप होतो. बहुतेक भूकंप हे सागरपातळीशी होतात. भूकंपाची नोंद ‘सिस्मोग्राफ’ यंत्रावर होतो. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल मध्ये मोजतात.


भूकंपाची कारणे
०१. ज्वालामुखी विस्फोट
१८८३ मध्ये आग्नेय आशियातील जावा-सुमात्रा जवळील क्राकाटोंआ 

०२. प्रस्तरभंग

तणाव व हालचाली मधून 
भारतात १९४३ साली बिहारमध्ये व १५ ऑगस्ट १९५० मधील आसाम भूकंप.

०३. स्फटिकीकरण / स्फटीकीभवन

०४. समस्थायीस्त्वाचे असमायोजन किंवा संतुलन मूलक सिद्धांत 
१८८९ मध्ये त्याठिकाणाचा ‘डटन’ येथे हा सिद्धांत मांडला.

०५. प्रत्यास्थ / प्रतिस्कंदन सिद्धांत.
डॉ. रीड यांनी मांडला.
गाळाच्या खडकांमध्ये मोठ्या प्रमाणात संचयनामुळे तेवढा भाग खचला जातो.
१९६७ मध्ये कोयनाचे भूकंप.

०६. पृथ्वीचे आकुंचन

डॅना नावाच्या शास्त्रज्ञानाने मांडला (अमेरिकन)
पृथ्वीचे अंतरंग तापमान हळूहळू कमी होत आहे त्यामुळे आकुंचन होत आहे. 

०७. भूगर्भातील तप्त वायू.

भूगर्भातील वायू बाहेर येण्याच्या प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या शक्तीमुळे.

०८. अभिसरण प्रवह

‘आर्थर होम्स’ अभिसरण सिद्धांत.  (१९२८-१९२९)
किरणोत्सारी पदार्थ 

०९. भूपट्ट सांरचनिकी (plates)

प्लेट एकमेकांजवळ येत असल्याने. 

१०. उल्कापात 

११. परमाणु उर्जा स्फोट होणे. 

१२. पर्वताचा भाग कोसळणे

उदा.दगडी कोळसाचे उत्खननामुळे जमीन पोखरल्याने.भूकंपनाभी आणि भूकंपलहरी – अधिकेंद्र
भूकंपनाभी
भूकंपाची तीव्रता सर्वात जास्त जेथे असते त्याला अधिकेंद्र किंवा पृथ्वी पृष्ठभागावर सर्वात प्रथम भूकंपाची जाणीव होते त्याला भूकंप म्हणतात. 

पृथ्वीच्या अंतरंगात सुमारे ७०० किमी अंतरापर्यंत भूकंपाची निर्मिती होते. भूकंप केंद्र रेषेच्या स्वरुपात सुद्धा असू शकते. 

समकंप रेषा (१५० Seismal Lines)पृष्ठभागावरील ज्या सर्वस्थानी भूकंपाची तीव्रता समान असते. त्या सर्व बिंदुला जोडणाऱ्या रेषेस समकंप रेषा असे म्हणतात. 

सहकंप रेषा ( Homo Seismal Lines)

ज्या सर्व स्थानी एकाचवेळी भूकंप जाणवतो त्या सर्व स्थानास जोडणाऱ्या रेषेस सहकंप रेषा असे म्हणतात.भूकंपाचे वर्गीकरण
खोलीनुसार वर्गीकरण
गटेनबर्ग व सी.एफ. रिश्टर  यांनी वर्गीकरण केले.

०१. सामान्य भूकंप 
पृष्ठभागापासून ७० किमी पर्यंत 

०२. मध्यवर्ती भूकंप

उगमस्थान ७० किमी ते ३०० किमी

०३. पातालीय भूकंप

उगमस्थान ३०० किमी ते ७०० किमी


उत्पत्तीच्या कारणावरून भूकंपाचे वर्गीकरण

०१. भूविवर्तनिकी भूकंप
०२. ज्वालामुखी भूकंप
०३. संतुलनमूलक भूकंप
०४. पातालिक भूकंप
०५. स्फटीकीभवनाच्या प्रक्रियेतून होणारे भूकंप 


स्थिती आधारे 
०१. स्थलीय भूकंप
०२. सागरीय भूकंप
०३. जलाशय प्रेरित भूकंप भूकंपाची तीव्रता मापन .
मेकार्ली या शास्त्रज्ञाने भूकंपाची श्रेणी तयार केली आहे. 


भूकंपलेखीय भूकंप
तीव्रता ३.४ रिक्टर स्केल
न जाणवणारी तीव्रता
तीव्र भूकंप मापन यंत्रावर नोंद.

मध्यम भूकंप तीव्रता ४.८ रिश्टर स्केल 

जोरदार भूकंप

तीव्रता ५.४ रिक्टर स्केल
वस्तू हलण्याचे आढळते. 

विध्वंसक भूकंप

तीव्रता ६.२ रिक्टर स्केलची
कारखान्याचे धुराडे कोसळतात, कच्च्या इमारती.

अनर्थकारी भूकंप

७.३ रिक्टर स्केलचा भूकंप आहे.
पृष्ठभागाला मोठ्या भेगा पडतात.

पराकोटीचा संहारक भूकंप

तीव्रता ८.५ ते ८.९ रिक्टर स्केल.
सागराप्रमाणे लहरी जाणवतात. कच्च्या,पक्क्या सर्वाना नुकसान. भूकंपाचे जागतिक प्रदेश.
पॅसिफिक महासागर पट्टा
जगातील ६३% भूकंप या पट्ट्यात होतात. 
जपानला ‘भूकंपाचा देश’ म्हणून ओळखले जाते. तो याच पट्ट्यात येतो. 

मध्य भूखंडीय पट्टा

जगातील २१% भूकंप या पट्ट्यात होतात. 
पूर्ण दक्षिण युरोप,मध्य पूर्वेकडील देश 
पूर्ण दक्षिण म्यानमार व चीन चा उत्तर भाग. 

मध्य अटलांटिक पट्टा

स्पीटबर्जन,आईसलैड, मेदोरा,कनारी सेंट हेलेना,प्रिन्स एडवर्ड द्विप. 

पूर्व आफ्रिकेचा पट्टा.
सुएझ कालवा, तांबडा समुद्र, टांझानिया, युगांडा, मादागास्कर.भूकंपाचे परिणाम
०१. नवीन भूखंडाची निर्मिती होते.

०२. जलस्तर वाढतो. किंवा कमी होतो. 

०३. अंतर्गत भागातील खनिजे पृष्ठभागावर येतात.

०४. भूकंपामुळे बंदराची निर्मिती होते. 

०५. खाड्यांची निर्मिती होते. 

०६. पृथ्वीचे अंतर्गत भागाची माहिती समजते. 
१८१९ मध्ये कच्छ रणात भूकंप झाल्याने ३२०० चौकिमी भाग खचला. 
तर सुमारे ९६० चौकिमी भाग वर चढला.

०७. जलाशय बदलतात
आसाममध्ये १९५० मध्ये झालेल्या भूकंपामुळे ब्रम्हपुत्रा व तिच्या उपनद्यांना पूर आला.

०८. त्सुनामी लाटांची निर्मिती

२६ डिसेंबर २००४ मध्ये या भूकंपात इंडोनेशियात १.५ लाख जीवितहानी झाली. (जावा सुमात्रा बेट)
२५ ते ३० मी उंच लाटा निर्माण झाल्या
सन १८८३ मध्ये काक्राटोआ
सन १९५५ मध्ये लिसबन.
२००४ मध्ये त्सुनामी ची झळ भारत, श्रीलंका, थायलंड,मालदीव , मलेशिया, म्यानमार आणि इंडोनेशिया.

०९. आगी लागणे हा सुद्धा भूकंपाचा परिणाम आहे.

१९२३ मध्ये जपानचा भूकंप.
मिथेन वायू बाहेर येऊन वातावरणात पेट घेतला. 

१०. प्रचंड आवाज होणे.