सारंगीवादक पंडित ध्रुवज्योती घोष यांचे निधन
प्रख्यात सारंगीवादक पंडित ध्रुवज्योती घोष यांचे आज मुंबईमध्ये राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते.


घोष हे ‘संगीत महाभारती ‘चे संस्थापक पंडित निखिल घोष यांचे सुपुत्र आणि तबला वादक पंडित नयन घोष यांचे धाकटे बंधू होत. त्यांनी एकल सारंगी वादक म्हणून स्थान मिळवले होते. भा

रतात आणि युरोपात त्यांचे सतत कार्यक्रम होत असत. भारतीय विद्या भवनाच्या संगीत नर्तन विभागाचे ते प्रमुख म्हणून कार्यरत होते. मध्य प्रदेश सरकारतर्फे त्यांना सारंगी वादक ‘उस्ताद अब्दुल लतीफ खान यांच्या नावे पुरस्कारही मिळाला होता.



दूध उत्पादनात जगात भारतच ‘नंबर १’ 
२०२६ पर्यंत जगातील सर्वाधिक दुग्ध उत्पादन भारतात होईल. तसेच गव्हाच्या उत्पादनातही भारताचा क्रमांक वरचा राहील, असे संयुक्त राष्ट्रसंघ व आर्थिक सहकार्य व विकास परिषद (ओईसीडी) यांनी तयार केलेल्या अहवालात नमूद केले आहे.

“ओईसीडी -एफएओ (अन्न व कृषी संघटना) ऍग्रीकल्चरल आउटलुक २०१७-२०२६” या अहवालात म्हटले आहे की, पुढील दहा वर्षांत जगाच्या लोकसंख्येत ७.३ ते ८.२ अब्ज एवढी वाढ होणार आहे. त्या तुलनेत भारत व आफ्रिकेतील सहारा उपप्रदेशातील लोकसंख्येच्या वाढीचा दर ५६ टक्के राहील. 

वाढत्या लोकसंख्येच्या दरानुसार भारत व सहारा उपप्रदेशातील उत्पादनातही जागतिक पातळीवरही मोठी वाढ होणार असून, एकविसाव्या शतकाच्या पहिल्या तिमाहीत भारतातील दूध उत्पादनात जवळजवळ तिपटीने वाढ होणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. 

भारत २०२६ मध्ये जगातील सर्वाधिक दूध उत्पादक देश म्हणून ओळखला जाईल. दुसऱ्या क्रमांकावर युरोपीय समुदाय असेल. त्यांच्यापेक्षा एक तृतीयांश जास्त दूध भारतात उत्पादित होणार आहे.

भारतात गव्हाचे उत्पादनही वाढणार आहे.  आशिया व प्रशांत महसागराच्या प्रदेशांमध्ये सर्वाधिक गहू उत्पादन केला जाईल. या प्रदेशात व जागतिक पातळीवर भारतातील उत्पादनात सर्वाधिक म्हणजे १५ टनाने वाढ होईल. त्यानंतर पाकिस्तान (६ टन) आणि चीन (५.५ टन) या देशांमधील गहू उत्पादन वाढही उल्लेखनीय असेल

 भारत, अमेरिका, चीन, पाकिस्तान, ब्राझील, जर्मनी, रशिया, फ्रान्स, न्यूझीलंड, तुर्कस्तान हे जगातील सर्वाधिक दूध उत्पादक पहिले दहा देश  असतील.

उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र, हरियाना, बिहार,  तमिळनाडू भारतातील सर्वाधिक दूध उत्पादक पहिली दहा राज्ये आहेत.



ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर कालवश 
ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे १० जुलै रोजी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. 

शेवटच्या दिवसांमध्येही त्यांहे व्यंगचित्र काढणे सुरूच होते. मंगेश तेंडुलकर यांचे ९० वे व्यंगचित्रप्रदर्शन नुकतेच बालगंधर्व कलादालनात पार पडले होते. १९५४ मध्ये त्यांनी पहिले व्यंगचित्र काढले होते. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या मृत्यूवरही व्यंगचित्र काढले होते.

तसेच तेंडुलकर नाट्यसमीक्षकही होते. विनोदी आणि थोड्या तिरकस शैलीतील त्यांची नाट्य समीक्षा वाचनीय आहे. त्यांची स्वारी बुलेटवर बसून निघाली की भल्याभल्यांना आश्चर्य वाटायचे. 

व्यंगचित्रांमधून पुण्यातील वाहतूक कोंडी व बेशिस्त यावर त्यांनी प्रहार केला. बोचऱ्या, मार्मिक पुणेरी भाष्य करणाऱ्या या व्यंगचित्रांनी वाहतूक शाखेला मदतही केली.



राष्ट्रपतींच्या हस्ते ई-शिक्षणाविषयक ३ डिजिटल उपक्रमांचे उद्घाटन 
९ जुलै २०१७ रोजी नवी दिल्लीत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते देशभरात ई-शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी ‘स्वयंम, स्वयंम प्रभा आणि नॅशनल अॅकेडमिक डिपॉझिटरी’ या ३ डिजिटल उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले.

या पुढाकारांचा उद्देश म्हणजे २०२० सालापर्यंत उच्च शिक्षणामध्ये सकल नोंदणीचे प्रमाण २४.५% वरून ३०% पर्यंत वाढवणे हा आहे.


मोठ्या प्रमाणात खुले ऑनलाइन अभ्यासक्रम ‘स्वयंम’ उपक्रमामधून चालवले जाणार आहेत, ज्यामुळे कोणालाही, कुठुनही कुठेही प्रवेश घेता येऊ शकेल. यामध्ये इयत्ता ९ वी पासून ते पदव्युत्तर पदवीपर्यंत वर्गांमध्ये शिकवले जाणारे अभ्यासक्रम शिकवले जाणार. 

स्वयंम प्रभा हे जीसॅट-१५ उपग्रहाद्वारे संपूर्ण वेळ उच्च दर्जाचे शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित करण्यासाठी समर्पित ३२ डीटीएच  वाहिन्यांचे व्यासपीठ आहे.

नॅशनल अॅकेडमिक डिपॉझिटरी ही डिपॉझिटरी प्रमाणपत्रांची ऑनलाइन तपासणी सुलभ करणार.



ए. आर. रहमान यांना वर्ल्ड साउंडट्रॅक पुरस्कार जाहीर
ऑस्करविजेता संगीतकार ए. आर. रहमान यांना वर्ल्ड साउंडट्रॅक पब्लिक चॉइस अवॉर्ड २०१७  हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार ‘व्हाईसरॉयज हाऊस’ या चित्रपटातील त्यांच्या संगीतासाठी दिला जाणार आहे. 


हा पुरस्कार एक जनसामन्यांच्या आवडीतून देण्यात येणारा पुरस्कार आहे. गेल्या १२ महिन्यांतील सर्वोत्कृष्ट संगीतधुनींना निवडून जगभरातील चाहत्यांकडून पुरस्काराच्या विजेत्याला निवडण्यासाठी मतदान केले जाते.
‘व्हाईसरॉयज हाऊस’ हा चित्रपट ब्रिटिश चित्रपट निर्माते गुरिंदर चढ्ढा दिग्दर्शित आहे.



अभिनेत्री सुमिता संन्याल यांचे निधन 
बंगाली आणि हिंदी चित्रपटात अभिनेत्रीच्या भूमिका वठवलेल्या सुमिता संन्याल यांचे निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या.

१९७१ साली प्रदर्शित ‘आनंद’ या हिन्दी चित्रपटामधील भूमिकेसाठी त्या प्रसिद्ध होत्या. 



भारतीय रेल्वेला वैकल्‍पिक इंधनासाठी गोल्डन पीकॉक पुरस्कार मिळाला
भारतीय रेल्वेला वैकल्‍पिक इंधनासाठीची भारतीय रेल्वे संघटना (IROAF) येथे पर्यावरण अनुकूल पर्यायी इंधन क्षेत्रात २०१७ सालचा गोल्डन पीकॉक पुरस्कार मिळाला आहे.

IROAF ने विकसित केलेल्या DEMU प्रवासी ट्रेनमध्ये डीजलच्या जागी CNG चा इंधन म्हणून वापर करण्यासाठी ‘इको-इनोव्हेशन’ श्रेणीत हा पुरस्कार दिला आहे. CNG चा ट्रेनमध्ये इंधन म्हणून वापर करण्याची ही जगात पहिलीच घटना आहे.

भारतामधील इंस्‍टीट्यूट आफॅ डायरेक्‍टर्स तर्फे १९९१ सालापासून गोल्‍डन पीकॉक पुरस्कार दिला जात आहे.



ब्रिटिश कौन्सिल इंडियाचे ‘मुंबई फर्स्ट’ या संस्थेबरोबर सामंजस्य करार
मुंबईत शिक्षण, पर्यटन आणि कला क्षेत्रात एकत्र काम करण्यासाठी ब्रिटिश कौन्सिल इंडियाने ‘मुंबई फर्स्ट’ या संस्थेबरोबर सामंजस्य करार केला आहे. या कराराअंतर्गत दोन संस्थांकडून विविध क्षेत्रांत विकासासाठी प्रकल्प व उपक्रम राबविले जाणार आहेत.

शैक्षणिक क्षेत्रात अध्यापन कौशल्याच्या संवर्धनावर तसेच महानगर क्षेत्रातील स्वस्त खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची गुणवत्ता सुधारण्यावर भर दिला जाईल. 

भारतात येणाऱ्या पर्यटकांची मुंबई महानगर क्षेत्र हीच पहिली पसंत ठरावी, यासाठी क्षेत्रातील रचनात्मक आणि सांस्कृतिक अर्थव्यवस्थेला बळकटी देणे हा या कराराचा एक महत्त्वाचा भाग आहे