या प्रकरणातील नोट्स विशेषतः राज्यसेवा परीक्षेसाठी आहेत

बहिर्गत शक्ती याला पृष्ठजात शक्ती असे म्हणतात. या पृथ्वीच्या पृष्ठभागात संतुलन निर्माण करतात.
बहिर्गत शक्तीच्या कार्याचे स्वरूप
A) अनाच्छादन
B) समतलीकरण

समतलीकरण (श्रेणीयन) GRADATIONश्रेणीयन मध्ये तीन प्रकारच्या प्रक्रिया आहेत.पहिल्य प्रक्रियेत भूपृष्ठाचे अपक्षय आणि अपक्षरण होते.

अपक्षय – खडकाचे जागच्या जागी फुटणे
अपक्षरण– वाहत असताना एकावर एक आदळून बारीक तुकडे होणे.
क्षरण – खडकाची विस्तृत अशी झीज होणे.

दुसऱ्या प्रक्रियेत अपक्षय व अपक्षरणातून निर्माण झालेल्या पदार्थाचे वहन होते.

तिसऱ्या प्रक्रियेत सर्वसाधारणपणे भूपृष्ठाच्या निम्न स्तरावर याचे निक्षेपण (संचयन) होते.

थोडक्यात श्रेणीयन ही अशी प्रक्रिया आहे कि पृथ्वीच्या भूपृष्ठ भागावरील मूळ उंच सखलपणा कमी करून भूप्रदेश समपातळीत सर्व श्रेनियन प्रक्रिया गुरुत्वानुसार दिग्दर्शित होतात.

श्रेणीयन प्रक्रियेचे दोन गटांत विभागणी होते.

०१. निच्चयन (अवनती )पृथ्वीच्या अंतर्गत शक्तीमुळे काही भाग वर येतो.त्याला सपाट करण्यासाठी त्या भागाचे निच्चय केले जाते.

०२. उच्चयननिर्मित प्रक्रोयेतून सकल प्रदेशाची उंची वाढते.

अनाच्छादन (Denudation)पृथ्वीच्या पृष्ठभागचा वरचा थर नाहीसा होण्याच्या प्रक्रियेला अनाच्छादन म्हणतात.

आनाच्छादनाच्या या प्रक्रियेमध्ये चार प्रक्रियांचा समावेश होतो.

०१. अपक्षय ( विदारण)
०२. अपक्षरण
०३. वहन
०४. निक्षेपण (संचयन)

या चार प्रक्रीयेमुळे भूपृष्ठाच्या स्वरुपात बदल घडवून आणले जाते.

विदारण (अपक्षय)

ही बाह्यशक्तीच्या कार्याचा शुभारंभ विदरणाची क्रिया म्हणजे बाह्यकारकांमुळे खडकाचे जागच्या जागी फुटून तुकडे होणे.

या मध्ये ४ प्रक्रियांचा समवेश होतो. मूळ खडकाचे ज्या स्वरुपात अपक्षयण होते त्यांना भूगर्भशास्त्रात पुढील परिभाषा आहेत.

विघटनही क्रिया म्हणजे सौर शक्ती, पाणी अशा भौतिक कारणांमुळे खडकाचे तुकड्यात रूपांतरण होते. याचे परत दोन उपप्रकार पडतात.

०१. खंड विघटन
मूळ खडकाला उभ्या व आडव्या भेगा पडतात. व त्याचे तुकड्यात रुपांतर होते. ही क्रिया शुष्क प्रदेशात मोठ्या प्रमाणात चालते.

०२. कणीदार विघटन
खडकांचे प्रसरण आणि आकुंचन कणाच्या स्वरुपात जागच्या जागी फुटून तुकडे पडतात.

अपघटन (वियोजन)
यांच्यात रासायनिक कारकांचा समावेश होतो.खडकातील खनिजद्रव्य विरघळतात.

अपदलन ( दलविघटन /अपपर्णन)
भौतिक आणि रासायनिक यांच्या संयुक्त कारकामुळे घडणारी क्रिया पापुद्र्याच्या स्वरुपात असतात.

खडक विखंडन (अनियमित विखंडन/तुकडीकरण)
खडकांचे वेडे वाकडे तुकडे तयार होतात.

अपक्षय नियंत्रण करणारे घटक.

०१. जमिनीच्या उताराचे स्वरूप

०२. खडकाचे प्रकार आणि संरचना

०३. हवामान बदल उष्ण कटीबंधीय प्रदेशात रासायनिक क्रियेतून विदारण होते.वाळवंटी प्रदेशात कायीथ प्रकार चालतो.

०४. वनस्पतीचा परिणामविदारण कमी प्रमाणात होते.

०५. काळ/वेळकाळ जास्त विदारण जास्त.

अपक्षयाचे प्रकारकायीक विदारणखडकाची रासायनिक गुणधर्म बदलत नाही.जागच्या जागी तुकडे होतात.बाह्यकारकांमुळे

कायीक अपक्षयाचे घटक

०१. औष्णिक प्रसरणवाळवंटात जास्त,तापमानात वाढ

२. दाबमुक्ती
ग्रॅनाईट आणि संगमरवर याच्यातून दाबमुक्तीमुळे.

०३. तुषारपात किंवा हिमीभवन

पाण्याचे तापमान कमी होत असताना ४० से. पर्यंत आकुंचन होते. ४० से. नंतर कमी होताना प्रसरण होते. खडकांच्या भेगा रुंदावतात. दर चौमी ला ९०००० किग्र. इतका दाब पडतो.
उदा. शीत कटीबंद.

०४. स्फटिकीभवण
आकारमान खनिजांचे वाढते.स्फटिकीभवन क्रियेला ‘Salt Crystal Growth’ असे म्हणतात.

०५. पर्जन्य
ज्या ठिकाणी पाऊस जास्त विदारण जास्तउदा. shell व वाळूचे खडक.

०६. वारा
वारा जास्त विदारण जास्त.

०७. वनस्पती
कायीक सोबत रासायनिक सुद्धा असते.

रासायनिक अपक्षयन

खडकातील तुकड्यांत रुपांतर होत असतात. खडकाची रासायनिक घटना बदलते.
उदा.आर्द्र हवामानाच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर असते.

रासायनिक अपक्षयचे प्रकार.

०१. Oxidation (भस्मीकरण)
ज्या ठिकाणी बेसाल्ट खडक आहेत. हवेतील ऑक्सिजन पाण्याच्या स्वरुपात येतात. खडकांतील लोहाशी संयुग पावतो. रासायनिक प्रक्रियेतून खडकाचे तुकडे पडतात.

०२. Carbonation
वातावरणातील कार्बन डायऑक्साईड पाण्यात मिसळून कार्बोलिक आम्ल निर्माण होते. गॅब्रो गटातील अग्नीजन्य खडका सोबत प्रक्रिया होऊन Na, Mg, Si हे घटक वेगळे होतात. चुनखडी,संगमरवर,डोलामाईट खडकाची मोठ्या प्रमाणात ही प्रक्रिया.

०३. Hydration (सजलन)
खडकातील फेल्प्स पाथ या खनिज द्रव्यावर पाण्याची अभिक्रिया होऊन खनिजांचा आकार वाढतो.याला हायड्रेशन असे म्हणतात.त्यामुळे खडक ठिसूळ होतात.

०४. Solution (द्रवीकरन)
खडकाची पूर्ण रासायनिक क्रिया बदलते मूळ खडकाचे लहान लहान क्षारांत रुपांतर होते.

०५. De Silication (डी सिलीकेशन)
सिलीकाचे पृथक्करणग्रेनाइट मध्ये Si चे प्रमाण जास्त असते. पाण्याने रासायनिक क्रिया होऊन हे Si वेगळे होतात.

०६. वनस्पतीच्या मुळाशी असलेले आम्लधर्मी पाणी निर्माण होते. कैप्स रूटमधून रासायनिक द्रव्य बाहेर पडतात.

जैविक अपक्षय (विदारण)

वनस्पती प्राणी आणि मानव यांमुळे विघटन आणि अपघटन क्रिया होऊन खडक कमकुवत होतात.याला जैविक विदारण म्हणतात.

०१. वनस्पतीत जलयुक्त बैक्टरिया असतात.हे खडकातील खनिज द्रव्य वेगळे करतात.

०२. प्राणीकीटक,घूस,गांडूळ यांसारखे प्राणी विदारण करतात.

०३. मानव