या प्रकरणातील नोट्स विशेषतः राज्यसेवा परीक्षेसाठी आहेत

वॉरसेस्टर यांच्या मते “ज्वालामुखी सामान्यत: एक गोल किंवा जवळ जवळ गोलाकार छिद्र् असून यातून पृथ्वीच्या अंतर्गत भागातील तप्त वायू, द्रव्य, लाव्हारस आणि खडकांचे तुकडे बाहेर पडतात.”

ज्वालामुखी क्रियेतून बाहेर पडणारे पदार्थ.
घन पदार्थ
०१. राख – Ash 

०२. टफ – राखेच्या संघटीत तुकडयास

०३. स्कोरिया 
हरभऱ्याच्या आकाराच्या खडकांच्या तुकड्यांना स्कोरिया असे म्हणतात. 

०४. ब्रेसिया
स्कोरियाच्या संघटीत रुपासच ब्रेसिया असे म्हणतात. 

०५. झमक (प्युमिक)
ब्रेसियाला जर बुडबुड्याचा आकार प्राप्त झाला असेल तर अशा खडकांच्या संघटीत रुपास झमक किंवा प्युमिक असे म्हणतात. 

०६. लेपिली 
सुपारीसारख्या मोठ्या तुकड्यांना लेपिली (लेपिली) म्हणतात. 

०७. ज्वालामुखी बॉंब (Volcano Bomb)

काही मी व्यासाच्या खडकांच्या तुकड्यांना ज्वालामुखी बॉंब म्हणतात. 

द्रव पदार्थ 
ज्वालामुखी चिखल 

लाव्हा
०१. ऍसिड लाव्हा – यात जवळपास ६० ते ७०% सिलीकाचे प्रमाण असते. 
०२. बेसिक लाव्हा – यात सिलीकाचे ३० ते ४०% प्रमाण असते. यात लोह व मग्नेशिअमचे प्रमाण जास्त असते. हा लाव्हा तरल प्रकारचा असतो. 

वायू पदार्थ

वायू
०१. कार्बन डायऑक्साईड
०२. गंध
०३. अमोनिअम क्लोराईड 
०४. हायड्रोजन
०५. ऑर्गन
०६. हायड्रो क्लोराईड
०७. अल्प प्रमाणात अमोनिया,नत्र व मिथेन 

जलबाष्प

एकूण वायू पदार्थापैकी ६० ते ९०% प्रमाण या जलबाष्पाचे असते. ज्वालामुखीचे वर्गीकरण.
लॉक्रॉईकसने केलेले वर्गीकरण 
ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या स्थानावरून प्रकार 
लैक्रोईकसने ज्वालामुखीचे एकूण चार प्रकार पाडले आहेत.
विसुवियस प्रकारचा ज्वालामुखी यात येत नाही. 

०१. हवाईयन प्रकार

शांत प्रकारचा असतात.
विस्फोटक प्रकारचा उद्रेक होत नाही.
शिलारस अतिशय पातळ असतो. 
वायू जास्त प्रमाणात बाहेर पडत नाही. 

०२. स्ट्रोम्बोलियन प्रकारचा

भूमध्य समुद्रात सिसिलियन बेटाच्या उत्तरेकडे. 
विस्फोटक स्वरूपाचा असतो. 
जागृत ज्वालामुखी म्हणून ओळखला जातो. 
शिलारस बेसिक प्रकारचा असतो. 
शिलारसासोबत लहान खडकाचे तुकडे वायू जास्त प्रमाणात. 
स्ट्रेंम्बोली ज्वालामुखीला भूमध्ये सागराचा प्रकाराग्रह असे म्हणतात. 

०३. व्होल्केनिक प्रकार

स्ट्रेंम्बोलियन बेटाच्या जवळ असलेल्या लिपाली बेटावरील वोलकॅनो  यावरून हा ज्वालामुखी ओळखला जातो. 
यातून बेसिक आणि ऍसिडचे प्रकारचे काळ्या रंगाचे ढग आढळतात. विस्फोटक स्वरूपाचा ज्वालामुखी घट्ट स्वरूपाचा शिलारस. 

०४. पिलियन प्रकारचा ज्वालामुखी

जगातील सर्वाधिक विस्फोटक प्रकारचा ज्वालामुखी.
या ज्वालाचे प्रतिबिंब सभोवतालच्या ढगावर पडून भयानक देखावा दिसतो. 

०५. विसुवियस प्रकार

या प्रकारचा ज्वालामुखीस लिनियनतुल्य उद्रेक असेही म्हणतात.
याची आकृती गोबीच्या फुलासारखी असते.
इटलीमधील माउंट सोमाचा ज्वालामुखी.
इटलीचा विसुवियस प्रकार. 


उद्रेकाच्या कालावधीनुसार वर्गीकरण

०१. जागृत ज्वालामुखी
जागृत ज्वालामुखीची संस्था जगात ५०० आहे. 
सिसिलीचा एटना व स्ट्रोम्बोली 

०२. निद्रिस्त ज्वालामुखी

इटलीचा विसुवियस
इक्वेडोरचा चिम्बोरेंजो 

०३. मृत ज्वालामुखी

एकदा विस्फोट झाल्यानंतर परत होत नाही. 
खोलगट भागात ‘लेक’ ( सरोवर )तयार होतो. 
त्याला ‘क्रेंटर लेका’ असे म्हणतात. 
अलास्कामधील ऑनीऑंकचक आणि माउंट पोपा. 


उद्रेक स्वरूपानुसार वर्गीकरण
०१. केंद्रीय उद्रेक/ विस्फोटक उद्रेक.
सिसिलीचा एटना
जपानचा फ्युजियामा
इटलीचा विसुवियस
इंडोनेशियाचा क्रक्राटोआ
पिली ज्वालामुखी (इंडोनेशिया) 

०२. अपस्थायी उद्रेक / शांत

दख्खनचे पठार
यूएसए मधील स्केन नदी प्रदेश

०३. निस्तृत किंवा दारारी उद्रेक
अगोदर असलेल्या तड्यातून लाव्हा बाहेर पडतो.
समोआ महाद्विपावरील ज्वालामुखी.
आईस लैंड मधील ज्वालामुखी ज्वालामुखी प्रक्रियेमुळे निर्मित भूरूपे व परिणाम 
ज्वालामुखी प्रक्रियेतून बाह्य भागात निर्माण होणारे भूरूपे व परिणाम

०१. ज्वालामुखी शंकू
या ज्वालामुखी शंकुचे दोन प्रकार पडतात.
a. लाव्हा शंकू 
यांचे दोन प्रकार
  • ऍसिड लाव्हा शंकू 
  • बेसिक लाव्हा शंकू. उदा.दख्खन पठार 

b.राख व सिंडर शंकू
किंवा राख व अंगारक शंकू
वायू, खडकांचे तुकडे, राख
उदा. मेक्सिकोमधील पॉराक्यूटीस सिंडर
इटली मध्ये नेपल्स येथील माउंट गोवा.दख्खन च्या पठारावर २९ ज्वालामुखी झाले.
५०० मी चा थर व बेसिक प्रकारचा लाव्हा

c. संमिश्र शंकू
पाहिल्यादा विस्फोट होऊन लाव्हाचे संचयन राख व खडकांचे संचयन (संमिश्र)
सिसिली बेटावरील माउंट एटना
जपान – फुजीयाया
फिलिपाईन्स – लमेयॉन 

d. परीकजीवी शंकू (दुय्यम शंकू)

शंकूच्या उतारावर बऱ्याच ठिकाणी लहान लहान शंकुंची निर्मिती होते. उदा.सिसिली बेटावरील माउंट एटना यावर १०० पेक्षा जास्त दुय्यम शंकू आहेत. 

०२. ज्वालामुखी भेगा


०३. लाव्हा पठार
दख्खन पठार.
यूएसए  मधील कोलंबियाचा पठार. 

०४. बेटांची निर्मिती

उदा. १८१८ साली काक्रोटोआ ज्वालामुखी उद्रेकाच्या वेळी सागरतळ उंचावून ‘कलमेकर’ या नवीन बेटाची निर्मिती झाली. 

०५. ज्वालामुखी कुंड (क्रेटर) 
केंद्रपाशी खोलगट वृत्ताकार खड्डा पडून पाणी साचते.
उदा.
-अलास्कामधील कटमाई
– इंडोनेशियामधीला काक्राटोआ
– जपानमधील ऐरा.
– न्यू मेक्सिकोमधील वेलिस 

०६. ज्वालामुखी महाकुंड (काल्डेरा)

क्रेटेरच्या विस्तृत खड्ड्यांना काल्डेरा म्हणतात. 
उदा. हवाई बेटावरील मोनालोवा. व्यास ३.४ किमी. 

०७. नीडाभ कुंड (नेस्टेड क्रेटर)

फिलिपाईन्स मधील माउंट  विसूवियस ज्वालामुखी. 

०८. व्होल्केनिक स्पाईन्स

उदा. १९०२ मध्ये माउंट पिली ज्वालामुखीतून ३०० मी. लांबीचा शिलाखंड बाहेर आला. 

०९. गॅसर्स (उष्णोदकाचे फवारे) (कारंजा)

उदा.आयरलँड मध्ये मोठ्या प्रमाणात
यूएसए मधील  गेसर्स मधून दर तासाने ४५ M उंचीची कारंजे उडतात. 

१०. फ्युमरोल (धुआरे)

वाफेचे लोट, बाहेर पडतात.
अत्यत उष्ण.
बाहेर पडणाऱ्या वाफेपासून विद्युत निर्माण केली जाते.
उदा. इटलीमध्ये टस्कनी येथे जलविद्युत वाफेवरून बनवली. जाते. न्युझीलंड व बलुचस्तान येथेही फ्युमरोल्स आहेत.
अलास्कामध्ये काठमाई ज्वालामुखी क्षेत्रात दश सहस्र धुरांची दरी आहे. 
Valley of 10000 Smokes 

११. उष्ण पाण्याचे झरे

या पाण्यात कॅल्शियम कार्बोनेट व सिलिका हे खनिजे विरघळलेली असतात.
या पाण्याची उष्णता २०० से. ते १०००  से .
उदा.कॅलिफोर्नियातील लासन पार्क
आइसलँड, ठाणे अंकलेश्वरी व वज्रेश्वरी, सिमला तप्त पाणी. 

१२. सोल्फ टारा

ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या मुखातून जर फक्त गंधक निघत असेल तर त्यास सोल्फ टारा म्हणतात.
उदा.इटली मधील प्ले – ग्राईयान क्षेत्र. 

१३. मृदा निर्मिती

लाव्हापासून रेगुर प्रकारची मृदा निर्माण होते. 

१४. खनिजाचा शोध

१५. भूउठावात बदल

१६. तापमानात वाढ 

१७. हवेचे प्रदूषण होते. 

१८. पाऊस पडतो. 

१९. जीवित व वित्तहानी.

इटलीमध्ये सन १८०२ च्या उद्रेकात सुमारे १ लाख लोक मेले. 
१८४५ मध्ये कोलंबिया येथील उद्रेक, आर्मोशी शहर संपूर्ण नष्ट.


पृथ्वी अंतर्गत भागात होणारे परिणाम 
अंतर्गत भागात ज्वालामुखी प्रक्रियेत निर्मित भूरूपे 

०१. डाईक
पृथ्वीच्या अंतर्गत भागात ज्वालामुखी विस्फोट होतो व ज्वालामुखी नलिकेत काही भाग साचल्यास त्यांना डाईक म्हणतात.
उदा. स्कॉंटलंडच्या वायव्य भागात 

०२. सील आणि शीट

पृथ्वीच्या अंतर्गत भागात स्थरित खडकात आडव्या संधी निर्माण होतात. या संधीत जेव्हा लाव्हा पसरून घट्ट होतो तेव्हा पातळ थर लाव्हा चा तयार होतो.  त्याला सील असे म्हणतात.
जर थर जाड असेल तर त्याला शीट म्हणतात.
शीट चा विस्तार १ ते ४० मी
सील चा विस्तार २४०० किमी
उत्तर अमेरिकेत हडसन नदी पश्चिम . 

०३. लॉकोलिथ

ज्यावेलेस ज्वालामुखीचा विस्तार होतो.
पोकळीत ज्वालामुखीचे संचयन होते. घुमटाकार भाग तयार होतो. या भागालाच लॉकोलिथ म्हणतात. 

०४. सिडार ट्री लॉकोलीथ.

एकवर एक लॉकोलिथ तयार होतो.
त्यालाच सिडार ट्री लॉकलिथ म्हणतात.
उदा.उत्तर माउंट एलन या पर्वतशिखरांत यूएसए मध्ये उठावमध्ये कोलोरॉडो नदीच्या पश्चिम भागात हेनरि पर्वतात. 

०५. लॉपोलिथ

शिलारसाच्या संचयाने बशीच्या आकाराचा खडक तयार होतात त्याला लॉपोली म्हणतात. 

०६. फॅकोलीथ 

खडकांना जो वळ्याचा आकार प्राप्त होतो. त्यात वरच्या व खालच्या भागात शिलारस संचयन होतो त्याला फॅकोलीथ म्हणतात.
उदा.थॉर्पशायर मधील कार्नडॉन टेकड्या मध्ये हे फॅकोलीथ मोठ्या प्रमाणात आढळतात. 

०७. बॅथोलिथ

खडकांत प्रचंड असा अवाढाव्य प्रकारचा घुमटाकार खडक असतो.
उदा. जगातील सर्वात मोठा बॅथोलिथ ब्रिटीश कोलंबियामध्ये आढळला आहे. याचा विस्तार २४०० किमी आणि जाडी आहे १६० किमी.
उदा. सिसिली बेट, ब्रिटीश कोलंबिया ज्वालामुखीचे जागतिक वितरण 
०१. पॅसिफिक सभोवतालचा पट्टा
या मध्ये जवळपास ६६% ज्वालामुखी होतात. याला अग्निकंपन म्हणतात. या प्रदेशात सेफर यांच्या मते ३५३ ज्वालामूखी संख्या आहे. उदा. जापान, फिलिपाईन्स, न्युझलंड 

०२. महाद्वीपीय खंडांचा मध्यवर्ती भाग

०३. अटलांटिक पट्टा 
याच्या दक्षिण भागात २ ज्वालामुखी केंद्र आहेत.
– लेसर अँटिलीस
– दक्षिण अँटिलीस 
उत्तर भागात एजेओ, एथेशेसन, सेंट एलेना 

०४. इतर क्षेत्रे
हिंदी महासागरातील मॉंरीशस, थोपोटो, रीयनियन आणण्यासाठी या बेटावर मृत ज्वालामुखी आढळतात. 
अंटालंटीका खंडाच्या रॉस सागराजवळ डारबेस व टेरर हे जागृत ज्वालामुखी आहेत.