ज्येष्ठ अभिनेत्री शकिला यांचे निधन
कृष्णधवल चित्रपटांच्या काळात गुरुदत्त यांच्या ‘सीआयडी’ आणि ‘आरपार’ चित्रपटांसह, राज कपूर, शम्मी कपूर यांच्यासोबतच्या भूमिकांतून बॉलिवूड गाजविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शकिला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या. 


‘आरपार’ चित्रपटातील त्यांचे ‘बाबुजी धीरे चलना’ गाणे ५० च्या दशकात खूप गाजले. बॉलिवूडमधील ‘एव्हरग्रीन’ गाण्यांपैकी हे एक आहे. 

‘अलिबाबा और ४० चोर’, ‘हातिम ताई’, ‘आरपार’, ‘श्रीमान सत्यवादी’, ‘चायना टाउन’ यासारख्या ५० चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. ‘उस्तादो के उस्ताद’ या १९६३ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील त्यांची भूमिका शेवटची ठरलीनवी दिल्लीत देशातल्या पहिल्या ‘पेंशन अदालत’ चे उद्घाटन
नवी दिल्लीत २० सप्टेंबर २०१७ रोजी प्रधानमंत्री कार्यालय,कार्मिक, सार्वजनिक तक्रारी व निवृत्तीवेतन, अणुऊर्जा व अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते देशातल्या पहिल्या ‘पेंशन अदालत’ चे उद्घाटन करण्यात आले.

निवृत्तीवेतन विभागाकडून ‘पेंशन अदालत’ ची एक श्रृंखला सुरू केली जात आहे. हे व्यासपीठ निवृत्‍त कर्मचार्‍यांना एकल सुविधा प्रदान करून त्यांच्या तक्रारींचे उपशमन करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात येत आहे. 

यात संबंधित विभाग बँक तसेच केंद्रीय आरोग्य सेवा योजनाचे प्रतिनिधी यांचादेखील सहभाग असणार आहे.कझाकिस्‍तानच्या अस्‍ताना येथे आंतर-सरकारी आयोगाची १३ वी बैठक संपन्न
१९ आणि २० सप्टेंबर २०१७ ला कझाकिस्‍तानची राजधानी अस्‍ताना येथे आंतरसरकारी आयोग (Inter-Governmental Commission IGC) ची १३ वी बैठक संपन्न झाली.

भारताच्या वतीने केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू तसेच कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान या बैठकीला उपस्थित होते.


जुलै २०१५ आणि जून २०१७ या काळात भारत आणि कझाकिस्‍तान यांच्यात मान्य करण्यात आलेल्या ऊर्जा, व्‍यापार, आर्थिक अश्या अनेक बाबींचा आढावा घेणे हा या बैठकीचा उद्देश होता. 

कझाकिस्‍तान आणि भारत यांच्यातल्या द्वैपक्षीय करारांची अंमलबजावणी करण्यासाठी हे आंतर-सरकारी आयोग कार्यरत आहे.नवी दिल्‍लीत भारत खनिज व धातू मंचची ६ वी बैठक संपन्न
२० सप्टेंबर २०१७ रोजी नवी दिल्लीत ‘भारत खनिज व धातू मंच (India Minerals and Metals Forum)’ ची ६ वी बैठक संपन्न झाली.

ही बैठक कोलकाता स्थित भारतीय वाणिज्‍य मंडळ (Indian Chamber of Commerce -ICC) द्वारा आयोजित केली गेली. याचे उद्घाटन पोलाद मंत्री चौधरी बिरेंद्र सिंह यांनी केले.

बैठकीत सन २०२५ पर्यंत भारतीय पोलाद उद्योगासाठी कार्यमार्गिका तसेच खनिकर्म, उत्पादन, मागणी व वितरण अश्या विषयांवर भर देण्यात आला.

भारत हा जागतिक स्तरावर तीसरा सर्वात मोठा पोलाद उत्‍पादक देश आहे, जो देशाच्या सकल स्थानिक उत्‍पादन (GDP) मध्ये जवळपास २% चे योगदान देत आहे. भारताने विक्रीसाठी पोलाद उत्पादनात 100MT चा आकडा पार केलेला आहे.
भारत सरकार मुद्रणालयाच्या विलीनीकरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी
केंद्रीय मंत्रिमंडळाने १७ भारत सरकार मुद्रणालयांना इतर ५ भारत सरकार मुद्रणालयांमध्ये सुसूत्रीकरण व विलीनीकरण आणि त्यांच्या आधुनिकीकरणाला मंजुरी दिली.

या ५ मुद्रणालयांमध्ये Government of India Press, नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन, मिंटो रोड मायापुरी, नाशिक (महाराष्ट्र) आणि टेंपल स्ट्रीट कोलकाता (पश्चिम बंगाल) ययांचा समावेश आहे.

आधुनिकीकरणामुळे मुद्रणालयांना केंद्र सरकारच्या कार्यालयांची महत्त्वाची गुप्त आणि बहुरंगी मुद्रीत कार्ये हाती घेता येईल. त्यासाठी कोणताही खर्च येणार नाही.ब्रिटीश मार्क ब्युमोंट याने ७८ दिवसांत जगाला प्रदक्षिणा घातली
ब्रिटिश सायकलस्वार मार्क ब्युमोंट याने ७८ दिवस, १४ तास आणि ४० मिनिटे इतक्या कालावधीत जगाला प्रदक्षिणा घालून नवा गिनीज विक्रम केला आहे.

त्याने २०१५ साली न्यूझीलंडच्या अँड्र्यू निकोल्सनचा १२३ दिवसांचा विक्रम मोडला. ८० दिवसांमध्ये १८००० मैल (२९००० किलोमीटर) सायकलने प्रवास करून ग्रहाला प्रदक्षिणा घालण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा विक्रम मोडला.

मार्क दिवसातून १८ तास सायकल चालवीत होता आणि प्रवासादरम्यान त्याने पोलंड, रशिया, मंगोलिया, चीन, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका पालथे घातले.जगातील सर्वश्रेष्ठ उद्योजकांमध्ये तीन भारतीयांचा समावेश
‘फोर्ब्स’ या जगप्रसिद्ध नियतकालिकाने जगातील १०० सर्वश्रेष्ठ उद्योजकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारताच्या तीन उद्योजकांनी स्थान पटकावले आहे. 100 Greatest Living Business Minds या नावाने ही विशेष यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

लक्ष्मी मित्तल, रतन टाटा आणि विनोद खोसला अशी या तीन व्यावसायिकांची नावे आहेत. हे तीनही व्यवसायिक फोर्ब्सच्या यादीनुसार लिविंग लिजेंड्स आहेत. 

यापैकी लक्ष्मी मित्तल हे ‘आर्सेलो मित्तल’चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. रतन टाटा हे टाटा समूहाचे मानद अध्यक्ष आहेत. तर विनोद खोसला हे सन मायक्रोसिस्टमचे सह-संस्थापक आहेत.

या यादीत अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचाही समावेश आहे.