राज्यातील २५ शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार 

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील २५ शिक्षकांची निवड झाली आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. 

यात १७ प्राथमिक, आठ माध्यमिक आणि दोन शिक्षक विशेष श्रेणीचे आहेत. पदक, प्रमाणपत्र आणि पन्नास हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.



ले.जनरल झा यांनी आयएमएची सूत्रे स्वीकारली
भारतीय लष्करी अकादमीचे (आयएमए) ४८ वे प्रमुख (कमांडंट) म्हणून लेफ्टनंट जनरल संजय कुमार झा यांनी सोमवारी सूत्रे हाती घेतली.

ले.जनरल झा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि ‘आयएमए’चे माजी विद्यार्थी आहेत. १३ डिसेंबर १९८० रोजी १७ व्या शीख रेजिमेंटमध्ये त्यांची नियुक्ती झाली. 

३६ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक पदे भूषविली. राष्ट्रीय रायफल्स बटॅलियन, आसाम रायफल्स आणि ईशान्येकडील माउंटन विभागाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे.



आरोग्य मंत्रालयाने ‘विकास परिवार’ अभियानाला सुरूवात केली
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ५ सप्टेंबर २०१७ रोजी ‘मिशन परिवार विकास’ नावाचे एक केंद्रीय कुटुंब नियोजन अभियान सुरू केले आहे. 

या अभियानाचे मुख्य लक्ष्य म्हणजे अधिकाधिक चांगल्या सेवा प्रदान करणे तसेच गर्भनिरोधक उपलब्ध होण्यास सुधारणा करणे, यासंबंधी सुरक्षा सुनिश्चित करणे आणि उच्च गुणवत्तापूर्ण कुटुंब नियोजन सेवा चांगल्या करणे, हे आहे.

अभियानाचा मुख्य उद्देश्य वर्ष २०२५ पर्यंत एकूण प्रजनन दर २.१ पर्यंत खाली आणणे हा आहे.

अभियानात उच्च प्रजनन दर असणार्‍या देशातल्या १४६ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. 
हे जिल्हे उच्च प्रजनन दर असलेल्या उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, छत्तीसगढ आणि आसाम या सात राज्यांमधील आहेत, जेथे देशातल्या एकूण लोकसंख्येपैकी ४४% लोकसंख्या वास्तव्य करते. 



देशात ५ सप्टेंबरला ‘शिक्षक दिन’ साजरा
आज ५ सप्टेंबर २०१७ रोजी देशभरात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रध्दांजली वाहिली गेली.

या दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन स्तरावर कार्यरत शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी शिक्षक पुरस्कार दिले गेले.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक उत्कृष्ट शिक्षक आणि मुत्सद्दी राजकारणी होते. १९६२ सालापासून दरवर्षी ५ सप्टेंबरला भारतात शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिवशी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी केली जाते. 

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला. भारतरत्न (१९५४) प्राप्तकर्ता डॉ. राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती (१९५२-६२) आणि दुसरे राष्ट्रपती (१९६२-६७) होते. 



स्टार इंडियाकडे पाच वर्षांसाठी IPL मिडिया अधिकार
पाच वर्षांसाठी इंडियन प्रिमियर लीग (IPL) च्या मिडिया अधिकारांना स्टार इंडियाने प्राप्त केले आहे. १६३४७.५० कोटी रुपयांच्या या करारानुसार, स्टार इंडिया हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ला क्रिकेटसाठी पुढच्या पाच हंगामात होणार्‍या प्रत्येक सामन्याला ५४.५ कोटी रुपये देय करणार आहे.


IPL ही भारतातली एक व्यावसायिक ट्वेंटी-20 क्रिकेट लीग आहे, जी भारतीय शहरांचे प्रतिनिधित्व करणार्‍या संघांदरम्यान दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात आयोजित केली जाते. लीगची स्थापना २००७ साली BCCI ने केली



धोनी ODI मध्ये १०० यष्टिचित करणारा पहिला यष्टीरक्षक
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये (ODI) १०० यष्टिचित करणारा पहिला यष्टीरक्षक (wicketkeeper) बनला आहे.धोनीने श्रीलंकेच्या कुमार संगकाराचा ९९ यष्टिचितचा विक्रम मोडत आघाडी घेतलेली आहे. 
२००४ साली बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात धोनीने पहिल्यांदा यष्टिचित केले. त्यावेळी त्याने रजिन सालेह आणि मशर्रफ मोर्तझा यांना यष्टिचित केले आणि सचिन तेंडुलकर हा गोलंदाज होता. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील यष्टिरक्षक म्हणून धोनीचा सर्वाधिक १६० यष्टिचित करण्याचा विक्रम देखील आहे. संगकाराने १३९ यष्टिचित केले आहे.



मोदी-जिनपिंग यांचा सहकार्याचा नारा
आर्थिक विकास साधण्यासाठी ब्रिक्‍स देशांनी एकमेकांमध्ये सशक्त भागीदारी निर्माण करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘ब्रिक्‍स’ परिषदेत केले. ‘ब्रिक्‍स’ने गुणांकन पद्धत सुरू करण्याचा सल्ला मोदींनी दिला. 

‘संशोधन आणि डिजिटल अर्थव्यवस्था या क्षेत्रात “ब्रिक्‍स’ देशांनी सहकार्य वाढविल्यास विकास आणि पारदर्शकता वाढण्यास मदत होईल. सदस्य देशांच्या मध्यवर्ती बॅंकांनी आपल्या क्षमता वाढवून जागतिक अर्थ संस्थाबरोबरील सहकार्य वाढवावे,’ असे मोदी म्हणाले.

‘ब्रिक्‍स’ देशांनी आर्थिक सहकार्य वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहन चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज परिषदेच्या उद्‌घाटनावेळी केले.

ब्रिक्‍स देशांदरम्यान आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य वाढविण्यासाठी चीन योजना तयार करेल आणि यासाठी ७.६ कोटी डॉलर मदत देईल, असे जिनपिंग यांनी आज जाहीर केले. आर्थिक क्षेत्रामध्ये धोरण साहाय्य आणि सहकार्य वाढविण्यासाठी या निधीचा वापर केला जाईल, असे ते म्हणाले



५ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय दानधर्म दिवस साजरा
संयुक्त राष्ट्रसंघ आज 5 सप्टेंबरला ‘आंतरराष्ट्रीय दानधर्म दिवस (International Charity Day)’ साजरा करीत आहे. हा दिवस जागतिक स्तरावर एकजुटीची भावना व्यक्त करते आणि विशेषत: गरीब आणि सर्वात असुरक्षित लोकांच्या गरजा पूर्ण करण्यावर भर देते.

हा दिवस सूक्ष्म उपक्रमे ते सहकारी संस्था ते बहुराष्ट्रीय कंपन्या आणि नागरी समाज संस्था आणि लोकोपकारी संस्था अश्या विविध खाजगी क्षेत्रांची नव्या कार्यक्षेत्राच्या अंमलबजावणीमध्ये भूमिका दर्शवते. 

तसेच १९७९ साली नोबेल शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या कोलकाता (भारत) येथे सेवा देणार्‍या मदर टेरेसा यांची पुण्यतिथी साजरी करण्याकरिता ५ सप्टेंबर या तारखेची निवड करण्यात आली.

मदर टेरेसा या एक अल्बेनियन-भारतीय रोमन कॅथोलिक साध्वी आणि मिशनरी होत्या. त्यांचा जन्म स्कोप्जे (आता मॅसिडोनिया) येथे झाला होता. १८ वर्षे मॅसिडोनिया मध्ये वास्तव्यानंतर, त्या आयर्लंड मध्ये आल्या आणि तेथून मग त्या भारतात आल्या, येथे त्यांनी त्यांचे उरलेले आयुष्य घालविले. ५ सप्टेंबर १९९७ रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

मानवतावादी संकटात आणि मानवी दु:ख कमी करण्यासाठी आणि यासाठी होणार्‍या देशांमधील धर्मादाय संस्था आणि व्यक्तींच्या प्रयत्नांच्या सन्मानार्थ आणि मदर टेरेसा यांच्या स्मरणार्थ संयुक्त राष्ट्रसंघाने ठरावामधून ५ सप्टेंबर या तारखेला ‘आंतरराष्ट्रीय दानधर्म दिवस’ म्हणून पाळण्याचे स्वीकारले.



BRICS देशांच्या नेत्यांनी ‘झियामेन घोषणापत्र’ अंगिकारले
४ सप्टेंबर २०१७ रोजी चीनच्या झियामेन शहरात ‘BRICS: स्ट्रॉंगर पार्टनरशीप फॉर ए ब्राइटर फ्युचर’ या संकल्पनेखाली पार पडलेल्या नवव्या BRICS शिखर परिषदेत BRICS (ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण अफ्रिका) देशांच्या नेत्यांनी ‘झियामेन घोषणापत्र’ अंगिकारले.

प्रदेशातल्या सुरक्षाविषयक परिस्थितीसंदर्भात आणि तालिबान, ISIL/DAISH, अल-कायदा आणि त्यांच्याशी संलग्न संस्था यांच्याद्वारा केल्या जाणार्‍या हिंसाचाराविषयी आपले विचार मांडले आहेत.

२००६ साली स्थापन केलेल्या BRICS ने परस्पर संबंध, समजूत, समानता, एकता, मोकळेपणा, सर्वसमावेशकता आणि परस्पर लाभकारी सहकार्य दाखविलेले आहे

विकासाला चालना देण्यासाठी व्यावहारिक सहकार्य वाढवणे, अधिक न्यायसंगत आंतरराष्ट्रीय आर्थिक आचारसंहिता वाढवण्यासाठी जागतिक आर्थिक प्रशासन सुधारणे, आंतरराष्ट्रीय आणि क्षेत्रीय शांतता आणि स्थिरतेचे रक्षण करण्यासाठी न्याय कारवाई करण्यावर भर देणे. याशिवाय, विभिन्न क्षेत्रात सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी प्रोत्साहन देण्यास सहमती दर्शवलेली आहे.

BRICS देशांच्या विकासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्वाने सहकार्य करण्यासाठी वित्तमंत्र्यांनी आणि केंद्रीय बँकेच्या गव्हर्नरांनी केलेल्या कराराबाबत चर्चा करण्यात आली.