ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांचे निधन 
पत्रकारिता आणि साहित्याच्या क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांचे आज (सोमवार) पहाटे निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. साधू यांच्या अखेरच्या इच्छेनुसार जेजे रुग्णालयात देहदान करण्यात येणार आहे 


अरुण साधू यांनी केसरी, माणूस, इंडियन एक्स्प्रेस अशी विविध वृत्तपत्रे व साप्ताहिकांतून पत्रकारिता केली होती. सहा वर्षे ते पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख होते. 

८० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा मानही त्यांना मिळाला होता. साधू यांनी झिपर्‍या, तडजोड, त्रिशंकू, बहिष्कृत, मुखवटा, मुंबई दिनांक, विप्लवा, शापित, शुभमंगल, शोधयात्रा, सिंहासन, स्फोट या कादंबऱ्या लिहिल्या



अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात भारत तिसर्‍या क्रमांकावर
‘वर्ल्ड न्यूक्लियर इंडस्ट्री स्टेटस रीपोर्ट २०१७’ अहवालानुसार, अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात भारत ६ अणुभट्ट्यासह जगात तिसर्‍या क्रमांकावर आहे. चीन हा या यादीत २० अणुभट्ट्यासह प्रथम क्रमांकावर आहे

२०१६ साली जागतिक स्तरावर अणुऊर्जेत १.४% ने वाढ झाली आणि वीज निर्मितीमध्ये अणुऊर्जेचा वाटा १०.५% होता. तसेच जागतिक स्तरावर पवन ऊर्जा उत्पादन १६% आणि सौर ऊर्जा ३०% पर्यंत वाढले. जागतिक नविकरणीय ऊर्जा निर्मिती क्षमता ६२% एवढी आहे.



मॅराडोना लिखित ‘टच्ड बाय गॉड: हाऊ वी वोन द मेक्सिको 86 वर्ल्ड कप’ पुस्तक प्रकाशित
फूटबॉलपटू दिएगो आर्मंडो मॅराडोना आणि डॅनियल आकुर्ची यांनी लिहिलेले ‘टच्ड बाय गॉड: हाऊ वी वोन द मेक्सिको 86 वर्ल्ड कप’ पुस्तक प्रकाशित झाले. पेंग्विन बुक्स हे या पुस्तकाचे प्रकाशक आहेत.

अर्जेंटिनाचा मॅराडोना हा इतिहासातला सर्वांत श्रेष्ठ फूटबॉलपटूंपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याने अर्जेंटिना राष्ट्रीय संघ, अर्जेंटिना जूनियर्स, बोका, बार्सिलोना, नॅपल्ज़, सेविले, आणि नेवेल्स ओल्ड बॉइज या संघांकरिता खेळले होते. 

डॅनियल आकुर्ची हा अर्जेंटिनामध्ये फुटबॉल सामान्यांवर लिहिणारा एक पत्रकार आहे.



पंतप्रधानांच्या हस्ते ‘सर्वांसाठी वीज’ योजनेच्या शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २५ सप्टेंबर २०१७ रोजी ‘सर्वांसाठी वीज (Power for all)’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेला ‘सौभाग्य’ योजना म्हणून ओळखले जाईल आणि ज्यामधून ट्रान्सफॉर्मर, मीटर आणि तारा अश्या उपकरणांवर अनुदान प्रदान केले जाणार.

या योजनेच्या माध्यमातून डिसेंबर २०१७ च्या अखेरपर्यंत सर्व गावांचे विद्युतीकरण करून सर्व ग्रामीण कुटुंबांना वीज उपलब्ध करून दिले जाण्याचे अपेक्षित आहे.

याशिवाय, राजीव गांधी उर्जा भवन हे नाव बदलून दीनदयाल उपाध्याय उर्जा भवन या नावाने ONGC च्या नवीन कॉर्पोरेट कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.



२०००-२०१५ दरम्यान भारतात बालमृत्यू दरात घट 
वैद्यकीय क्षेत्रातले नियतकालिक ‘लॅन्सेट’ ने नवजातांच्या मृत्युदरासंदर्भात त्यांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालासाठी विशिष्ट कारणांस्तव नवजात (१ महिन्याहून कमी वयाचे) आणि १-५९ महिन्यांच्या वयोमर्यादेत मृत्यूदराचे सर्वेक्षण केले गेले. 

सर्वेक्षणानुसार, सन २००० ते सन २०१५ या काळात भारतात बालमृत्यू दरात प्रचंड घट झाल्याचे दिसून आले आहे.

भारतात नवजातांच्या मृत्युदरात वार्षिक सरासरी ३.४% आणि १-५९ महिन्यांच्या वयोमर्यादेत मृत्यूदरात ५.९% इतकी घट नोंदवली गेले. २००५ सालापासून प्रथमच या स्वरुपात घट दिसून आलेली आहे, ज्यामुळे २०००-२००५ च्या परिणामांच्या तुलनेत एक दशलक्षापेक्षा अधिक बालमृत्यू टळलेले आहेत.


मेरी कोम IOC अॅथलिट्स फोरम येथील AIBA प्रतिनिधी
भारतीय महिला मुष्टियोद्धा मेरी कोम ही आगामी IOC अॅथलिट्स फोरमसाठी आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध महामंडळ (AIBA) प्रतिनिधी म्हणून निवडण्यात येणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

११ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर २०१७ या काळात स्वीत्झर्लंडच्या लॉसेनमध्ये इंटरनॅशनल ऑलम्पिक कमिटी (IOC) अॅथलिट्स फोरमची ८ वी बैठक आयोजित करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध महामंडळ (AIBA) ही मुष्टियुद्ध या क्रीडाप्रकारासाठी एक क्रीडा संघटना आहे, जी जगभरात मुष्टियुद्ध सामने आयोजित करते आणि जागतिक आणि अधीनस्थ विजेतेपद बहाल करते. 

AIBA ची स्थापना १९४६ साली करण्यात आली. याचे मुख्यालय स्वीत्झर्लंडच्या लॉसेन शहरात आहे.



जर्मनीची सूत्रे पुन्हा मर्केल यांच्याकडेच
जर्मनीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज झालेल्या मतदानानंतर विद्यमान चॅन्सलर अँजेला मर्केल यांच्यावरच नागरिकांनी विश्‍वास दर्शविल्याचे स्पष्ट झाले आहे. चॅन्सलरपदाचा मर्केल यांचा हा चौथा कार्यकाल असणार आहे. 

मर्केल यांच्या ख्रिश्‍चन डेमोक्रॅट पक्षाला सर्वाधिक ३२ टक्‍क्‍यांहून अधिक मते मिळाली आहेत.



इराणकडून क्षेपणास्त्राची चाचणी
उत्तर कोरियानंतर आता इराणने अमेरिकेला आव्हान दिले असून इराणने मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी केली. हे क्षेपणास्त्र दोन हजार किलोमीटर अंतरावरील लक्ष्य भेदू शकते. 

अमेरिकेच्या इशाऱ्यानंतरही इराणने क्षेपणास्त्राची चाचणी केल्याने दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. 
इराणने नियमाला अनुसरुनच क्षेपणास्त्र चाचणी केल्याचा दावा केला आहे. तर इराणने अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी केला असा अमेरिकेचा दावा आहे. 

जुलै २०१५ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेचे पाच कायम सदस्य, युरोपियन युनियन आणि इराण यांच्यात अणुप्रश्नाविषयी सर्वसहमती झाली होती. यानंतर इराणवरील आर्थिक आणि राजकीय बंधने उठवण्यात आली होती. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच इराणवर निर्बंध घालणाऱ्या विधेयकावर स्वाक्षरी केली होती. यानुसार इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमात मदत करणारे आणि या क्षेपणास्त्र कार्यक्रमाशी आर्थिक हितसंबंध असलेल्यांना आर्थिक दंड ठोठावण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला होता



अण्वस्त्रांच्या संपूर्ण निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस २६ सप्टेंबर 
दरवर्षी २६ सप्टेंबरला जगभरात ‘अण्वस्त्रांच्या संपूर्ण निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस ‘ (International Day for the Total Elimination of Nuclear Weapons) पाळला जातो. हा दिवस जगाला अण्वस्त्रापासून मुक्त करण्यासाठी समर्पित आहे, हे की संयुक्त राष्ट्रसंघाचे खूप जुने उद्दिष्ट आहे.

१९७८ साली, संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने आपल्या प्रथम विशेष सत्रात पुष्टी केली की अण्वस्त्राच्या निर्मूलनासाठी प्रभावी उपाययोजनांना सर्वोच्च प्राधान्य आहे. १९७५ सालापासून, न्यूक्लियर नॉन-प्रोलीफरेशन ट्रिटी (NPT) हा जवळपास प्रत्येक आढावा बैठकीचा एक प्रमुख विषय आहे.