हिमनदीचे कार्य

हिमनदीचे क्षरणकार्य
सिद्धांत – डी, मार्तोनी हिमानी क्षरण सिद्धांत
ज्या वेळेस खडकांना भिग पडल्या नदीतून वाहणारे खडकाचे तुकडे तेथे पडते तेथे मोठ्या प्रमाणत क्षरण कार्य होते.

क्षरणकार्याचे स्वरूप

०१. अपघर्षण
०२. उत्पादन (कमहिमक्षरण)
भेगांमध्ये पाणी जाऊन ४०० नंतर प्रसरण पावतो व तेथील खडक उखडला जातो.

क्षरणकार्यातून निर्माण होणारी भूरूपे

०१. हिमगर्त / cirque (हिमगव्हर)पर्वतावर एक आरमखुर्चीचा आकार प्राप्त होतो. रंगमंचासारखा अर्धगोलाकार असा खोलगट भाग जेथे हिमाचे संचयन होते त्यास हिमागार असे म्हंटले जाते.
हिमगव्हरचा माथा व त्यातील बर्फ यांच्यात जी भेग असते त्याला ‘शीर्षभेग’ म्हणतात.
देशहिमगर्ताचे नाव
स्कॉटलंडकोरी
जर्मनीकार
पेल्सस्विम
स्कॅन्डेनोव्हियाकॅसेल
नॉर्वेबोटन
फ्रांससर्क

पिरनिज पर्वतातील गेव्हर्नी गर्त जगात सर्वात मोठी गर्त म्हणून ओळखली जाते.
चेंबर्लिन आणि सलेसबरी यांनी सांगितले की हिमनदी क्षरण कार्यामुळे हिमगर्ताची निर्मिती होत नाही .
हिमगर्ताचे निर्मितीसाठी आवशकता

  • पहिल्यापासूनच थोडाशा वक्राचा आहे.
  • मोठ्या प्रमणावर बर्फ
  • खडकाचा एकाच प्रकार

०२. हिमानी सरोवर (पिटनास्टर सरोवर)हिमगर्ताच्या उंबरठ्याशी जे पाणी साचते त्यास सर्क सरोवर
उदा.english lake district मध्ये स्प्रिंटलीन आणि रेडमध्ये या दोन हिमानी सरोवर आहेत.

०३. अरेट/तीक्ष्ण कटक /फणी कटक /शुष्क कुट (Arete)हिमगव्हर निर्मितीची साखळी तयार होते.
उदा.आल्प्स पर्वतात आढळतात

०४. खिंड (ग्रीवा) हिमगव्हराचेच मोठ्या प्रमाणत क्षरण होऊन, खिंडीचा प्रकार तयार होतो.

०५. गीरीश्रुंग (horn)हिमगव्हर चारही बाजूने तयार होते. त्या भागाला गिरिर्श्रुंग म्हणतात. पर्वतासारखाच शिंगासारखाच भाग दिसतो.
उदा.आल्प्स पर्वतात मटर हॉर्न,हिमालयात बद्रीनाथजवळ शिवलिंग.

०६. हिमगर्तमालिका (tanden cirque)दोनपेक्षा अधिक हिमगर्त एकाच पर्वतउतारावर तयार होतात. त्यांची एक मालिका तयार होते.

०७. U आकाराची दरी या दऱ्या निसर्गनिर्मित असतात.

०८. लोंबती दरी (hanging valley)/टांगती दरी मुख्य नदीला ज्या ठिकाणी उपनदी भेटते त्यावेळी उपनदी टांगल्यासारखी दिसते.

०९. रॉफ बेसिन्स (rock basins)हिमनदीच्या पत्रात मोठे खडे तयार होतात. तेथे बर्फ साचून सरोवरे तयार होतात.
उदा. उत्तर अमेरिकेतील पंच महासरोवर

१०. मेषशिला नदी वाहत असताना एखादा मोठा खडक तुकडा मध्ये येऊन हिमनदी त्यावरून वाहते. पृष्ठभाग घासला जातो व उतार तीव्र होतो. मेंढीचा आजार प्राप्त होतो.
उदा.आल्प्स पर्वतात आढळतात

‘आटोफलकीजर’ यांनी सर्वप्रथम मेषशिले बद्दल मत व्यक्त केले. १८०४ मध्ये डि-पॉसा या शास्त्रज्ञाने या टेकड्यांचे ‘शंख मुरली’ हे नाव दिले.

११. दैत्या सोपान /प्रस्तर पायऱ्या (glater stairways)पायऱ्याचा आकार प्राप्त होतो.इज पायरी दुसऱ्या पायरीशी वेगळी होते. काही मीटर पासून कित्येक किमी पर्यंत ३० मी पासून ३०० मी उंची उन्हाळ्यात प्रत्येक पायरीखाली सरोवर निर्मिती होते. (peter malta lake)

१२. हिमविदर नद्यांना समान तडे जाऊन नदीचा पृष्ठभाग दिसू लागतो.

१३. फीयॉर्ड (fiord) फीयॉर्डची निर्मिती हिमनदीच्या क्षरणकार्यातून होतो.मोठ्या प्रमाणात मासेमारीसाठी उपयोग होतो. बंदराच्या विकासासाठी योग्य ठिकाण
उदा. नॉर्वे, British colombia, south chilli, alazka, New Zealand, Greenland

हिमनदीचे संचयन कार्य दोन प्रकार पडतात

०१. हिमानी गाळ/ हिमानी संचयन/ हिमनदीचे संचयन
०२. हिम जलोड निक्षेप/ संचयन/ हिमनंदोदभूत संचयन.

हिमनदीच्या संचयन कार्यातून निर्माण होणारी भूरूपे

०१. हिमोड

हिमनद्यानद्वारे वाहणारे लहान खडक,तुकडे ,माती ,गाळ यांना हिमोड च्या ठिकाणावरून पुढील प्रकार पडतात.

  • पार्श्ववर्ती हिमोड :– नदीच्या दोन पार्श्ववर्ती काठा (उंची ४० ते ५० मी) (लांबी १ ते ५० km)
  • मध्य हिमोड :- दोन नद्यांच्या मध्ये
  • पृष्ठ हिमोड :- हिमनदीच्या तळभागाशी पडलेले खडकाचे तुकडे.
  • प्रणोद हिमोड :– पृष्ठभागाशी वळ्खा किंवा घड्या पडल्यासारखा आकार निर्माण होतात
  • क्रमपसारी हिमोड :- टेकड्या पुढे पुढे पसरत जाणे.
  • अंत्य हिमोड :- ज्या ठिकाणी हिमनदीचा शेवट होतो त्या ठिकाणी मोठे ढीग टेकड्यांची निर्मिती होते. त्यांच्यात दलदली निर्माण होतात.

०२. धोंड मातीचे मैदान/ हिमानी गाळाचे मैदान  (till plain)क्रमापसारी हिममोड मुळे पुढे सरकत गेल्यामुळे मागील पूर्ण भाग सपाट होऊन यांची निर्मिती होते. Sag and swell topographyवाळू आणि गारगोटीचे प्रमाण जास्त हजारो चौ.की.मी.क्षेत्र

०३. हिमोडगिरी (drumlin)पर्वतासारखे उंच गोलाकार भाग उंची ६० ते ९० m एखाद्या टोपलीत ठेवलेल्या अंड्याप्रमाणे दिसणाऱ्या भूमिस्वरुपात असतात. (Basket of Egg Topography)

उदा.उत्तर irelar,स्कॉटलैंड, मिडलैंड,उत्तर इंग्लंड समतलप्राय मैदानात नदीमुळे झिजलेल्या टेकड्या अवशिष्टप्राय टेकड्या दिसतात. त्या टेकड्यांना मोनॅडनॉक्स म्हणतात.

०४. धुलीकुंप (dust wells)खडकांचा तुकडा सूर्याची उष्णता शोषूण घेते. तेथे विहिरीच्या आकाराचा गोलाकार खडा निर्माण होतो.

०५. बर्फाची चबुतरे खडकाच्या खाली सूर्याची किरणे पोचू शकत नाही.

०६. नुनाटक मार्गात निसर्गनिर्मित टेकड्या असतात. टेकड्यांची मालिका निर्माण होते. उदा बर्फावरील टेकड्या

०७. पाहुणा खड (Erraitic rock)(विदेशक खडक) आजूबाजूच्या खड्कांपेक्षा हिमनदीमध्ये असणारा वेगळा खडक आहे.

हिमजलोड/हिमनोदभूत संचयन कार्यातून निर्माण होणारे भूरूप.

०१. हिमोड कटक (eskers)पाणी आणि हिम यांच्या संचयन कार्यातून निर्माण होतात.लांबी-२० ते २५किमी.माळ गुफल्यासारखा आकार.उंची-६० ते ९०मि.

०२. कंकतगिरी (kames)अनियमित आकारचे मोठे मोठे भाग व उंच अशा टेकड्या निर्माण होतात. उंची ३०ते ६०मि.

०३. उल्मालिक मैदान (Outwash Plain)उष्ण कटीबंधात पश्चिमेकडे वाळवंट आढळते.समतोष्ण कटीबंधात खंडांच्या पूर्वेकडे वाळवंट.